भारतीय संविधानास ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने संविधान अमृत महोत्सव “घर घर संविधान” या कार्यक्रमांतर्गत दि.२६ नोव्हेंबर, २०२५ ते दि. २६ जानेवारी, २०२६ या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करणेबाबत Samvidhan Amrit Mahotsav Ghar Ghar Samvidhan Activities

Samvidhan Amrit Mahotsav Ghar Ghar Samvidhan Activities

Samvidhan Amrit Mahotsav Ghar Ghar Samvidhan Activities

Samvidhan Amrit Mahotsav “Ghar Ghar Samvidhan” activities organized

On the occasion of the completion of 75 years of the Indian Constitution, various activities will be organized under the program “Ghar Ghar Samvidhan” from 26th November, 2025 to 26th January, 2026

भारतीय संविधानास ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने संविधान अमृत महोत्सव “घर घर संविधान” या कार्यक्रमांतर्गत दि.२६ नोव्हेंबर, २०२५ ते दि. २६ जानेवारी, २०२६ या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करणेबाबत…

दिनांक : १८ नोव्हेंबर, २०२५.

संदर्भ: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्र. बीसीएच-२०२४/प्र.क्र.२५९/शिक्षण-२,दि.१४ ऑक्टोबर, २०२४.

प्रस्तावना :
भारतीय संविधानास ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा, सर्व प्रकारची व्यावसायिक महाविद्यालये, शैक्षणिक संकुले, शासकीय वसतिगृहे, शासकीय निवासी शाळा त्याचबरोबर शासन मान्यता प्राप्त अनुदानित/विनाअनुदानित/स्वयंअर्थसहाय्यित शाळा/आश्रमशाळा व वसतिगृहे तसेच ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्था तसेच महाराष्ट्र विधानपरिषद, विधानसभा अशा सर्व ठिकाणी भारतीय राज्यघटनेबाबत जागरूकता, घटनात्मक अधिकार व कर्तव्यांबदल सर्व नागरिकांमध्ये जागरूकता वाढविण्यासाठी सन २०२४-२५ या अमृत महोत्सवी वर्षात संविधान अमृत महोत्सव सन २०२४-२५ “घर घर संविधान” हा कार्यक्रम वर्षभर साजरा करण्याच्या मार्गदर्शक सूचना संदर्भाधीन शासन निर्णय, दिनांक १० ऑक्टोबर, २०२४ अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.

“माझे संविधान, माझा अभिमान” उपक्रमांतर्गत प्रश्न मंजुषा सोडवा आपल्या ज्ञानात भर घाला आणि आकर्षक प्रमाणपत्र लगेचच प्राप्त करा.

२. भारतीय संविधान अमृत महोत्सव “घर घर संविधान” या कार्यक्रमाची सांगता करत असताना सदर कार्यक्रमांतर्गत भारतीय संविधानाविषयी जनजागृती करण्यासाठी दि.२६ नोव्हेंबर, २०२५ ते दि. २६ जानेवारी, २०२६ या कालावधीत राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा, सर्व प्रकारची व्यावसायिक महाविद्यालये, शैक्षणिक संकुले, शासकीय वसतिगृहे, शासकीय निवासी शाळा त्याचबरोबर शासन मान्यता प्राप्त अनुदानित/विनाअनुदानित/स्वयंअर्थसहाय्यित शाळा / आश्रमशाळा व वसतिगृहे तसेच ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्था अशा सर्व ठिकाणी खालीलप्रमाणे विविध उपक्रम व कार्यक्रम राबविणे आवश्यक आहे.

३. राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा, सर्व प्रकारची व्यावसायिक / बिगर व्यावसायिक महाविद्यालये, शैक्षणिक संकुले, शासकीय व अनुदानित वसतिगृहे व शासकीय निवासी शाळा, शासन मान्यता प्राप्त अनुदानित/ विनाअनुदानित/ स्वयंअर्थसहाय्यित शाळा/ आश्रमशाळा व वसतिगृहे ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्था अशा सर्व ठिकाणी भारतीय राज्यघटनेबाबत जागरूकता, तसेच उपेक्षित

समुदायांमध्ये घटनात्मक अधिकार व कर्तव्यांबदल जागरुकता वाढविण्यासाठी संविधान अमृत महोत्सव “घर घर संविधान” या कार्याक्रमांतर्गत दि.२६ नोव्हेंबर, २०२५ ते दि. २६.०१.२०२६ या कालावधीत खालीलप्रमाणे स्पर्धा/उपक्रम / कार्यक्रमांचे विशेष आयोजन सर्व स्तरावर करण्यात यावे अशा सूचना देण्यात येत आहेत –

२६ नोव्हेंबर “संविधान दिन” साजरा करणेबाबत..महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

शाळा/महाविद्यालये/ वसतिगृहे यांच्या दर्शनी भागात संविधानाची उद्देशिका लावणे.

१) शालेय परिपाठात तसेच वसतिगृह प्रार्थनेत दररोज संविधान प्रास्ताविका/उद्देशिकेचे वाचन विद्यार्थ्यांकडून करवून घेणे.

३) शालेय वाचनालयात संविधानाच्या किमान पाच प्रती विद्यार्थ्यांना वाचनासाठी उपलब्ध करून देणे.

४) भारतीय संविधान बाबत सर्वसाधारण माहिती देणे, जसे, संविधान सभा निर्मिती, निर्मिती समिती, अनुच्छेद, विशेषता, मुलभूत कर्तव्ये यावर व्याख्यान (किमान ६० ते ९० मिनिटे).

५) विद्यार्थ्यांना भारतीय संविधानातील प्रमुख प्रकरणे, मुलभूत हक्क, आणि मुलभूत कर्तव्ये यांवर मार्गदर्शन करणे.

६) कार्यशाळांद्वारे विद्यार्थ्यांना संविधानाचे तत्त्वज्ञान आणि मूल्ये समजावून सांगणे.

७) संविधान दिन कार्यक्रम आयोजित करणे, ज्यात पथनाट्य आणि पोस्टर प्रदर्शन याचा समावेश करावा.

८) संविधानावर आधारित निबंध लेखन, भाषण, वादविवाद, चित्रकला स्पर्धा इत्यादी उपक्रमांचे आयोजन करणे,

९) प्रजासत्ताक दिनी संविधानातील मुल्यांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन व सादरीकरण करणे. (जसे देशभक्तिपर गाणी, नाटक, आणि नृत्य)

१०) राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये संविधानाचे प्रबोधन होण्याकरिता संविधान संमेलनाचे आयोजन करावे.

४. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक सांकेतांक २०२५१११८१४३९१२६०२२ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकीत करून काढण्यात येत आहे.

शासन परिपत्रक पीडीएफ प्रत लिंक

प्रधान सचिव, महाराष्ट्र शासन

Samvidhan Amrit Mahotsav Ghar Ghar Samvidhan Activities
Samvidhan Amrit Mahotsav Ghar Ghar Samvidhan Activities


महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
शासन परिपत्रक क्रमांक: बीसीएच-२०२४/प्र.क्र.२५९/शिक्षण-२
मंत्रालय विस्तार, मुंबई

Leave a Comment

error: Content is protected !!