Samuh Sadhan Kendra Samnvyak Adhikar Karya Kartavye

Samuh Sadhan Kendra Samnvyak Adhikar Karya Kartavye

Samuh Sadhan Kendra Samnvyak Adhikar Karya Kartavye

Powers and duties of Group Resource Center Coordinators

Samuh Sadhan Kendra Samnvyak Adhikar Karya Kartavye

शासन निर्णय क्र. केंद्रप्राशा-२०२३/प्र.क्र.५६०/टिएनटि-१, दि. २१.०८.२०२५ सोबतचे
प्रपत्र क

समूह साधन केंद्र समन्वयकांचे अधिकार व कार्य-कर्तव्येः-

१. समूह साधन केंद्रातील शाळा व वरीष्ठ यंत्रणा तसेच स्थानिक प्राधिकरण यामधील दुवा म्हणून काम करताना केवळ संदेश वहनाचे काम न करता समूह साधन केंद्र समन्वयक म्हणून सल्लागार, मदतनीस व प्रेरक ही भूमिका पार पाडणे.

२. समूह साधन केंद्रातील शाळांमधील पटनोंदणी, उपस्थित वाढविणे व विद्यार्थ्यांची संपादणूक पातळी याबाबत मासिक व वार्षिक उद्दीष्टे ठरवून देणे व ठराविक कालावधीनंतर त्याबाबतचा आढावा घेणे.

३. समूह साधन केंद्रातील शाळांचे शैक्षणिक व प्रशासकीय सनियंत्रण तसेच या शाळांना या शासन निर्णयातील परि. ३ मध्ये नमूद उद्दीष्टांच्या पूर्ततेसाठी सर्वप्रकारचे शैक्षणिक व प्रशासकीय सहाय्य उपलब्ध करुन देणे.

४. समूह साधन केंद्राचा प्रमुख समन्वयक या नात्याने समूह साधन केंद्रातील शाळांकरीता किमान आवश्यक संसाधने उपलब्ध असतील यासाठी प्रयत्न करणे,

केंद्रीय प्राथमिक शाळा केंद्र केंद्रप्रमुख या व्यवस्थेची पुनर्रचना करण्यास मान्यता देणेबाबत शासन निर्णय क्र. केंद्रप्राशा-२०२३/प्र.क्र.५६०/टिएनटि-१, दि. २१.०८.२०२५ वाचा या ओळीला स्पर्श करून

५. उपलब्ध साधनसामुग्रीतून सहज-सोप्या व स्थानिक भाषेतील अध्यापनासाठी समूह साधन केंद्रातील शिक्षकांनी प्रतिमाने तयार करावीत, यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे.

६. नियतकालिक मुल्यांकन चाचण्यांचे परिणाम विचारात घेऊन, बहुस्तरीय अध्यापन कौशल्य विकसित करण्यासाठी शिक्षक प्रशिक्षणावर विशेष भर देऊन यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे किंवा सक्षम अशासकीय संस्था यांची आवश्यकतेनुसार मदत घेणे.

७. शाळा व्यवस्थापन समित्या व समूह साधन केंद्र शाळा शिक्षण सल्लागार समित्यांच्या नियमित बैठका व कामकाजाचा आढावा घेणे,

८. समूह साधन केंद्रातील प्रत्येक शाळेतील विद्यार्थी गळतीचे प्रमाणे शुन्यावर आणणे. प्रत्येक विद्यार्थी त्या शाळेत वरच्या इयत्तेत प्रवेशित व्हावा याची दक्षता घेणे. विशेषतः शैक्षणिक स्तर बदलताना म्हणजे प्राथमिक स्तरावरुन उच्च प्राथमिक स्तरावर व उच्च प्राथमिक स्तरावरुन माध्यमिक स्तरावर प्रवेश करताना गळतीचे प्रमाणे अधिक असल्याने (नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पायाभूत स्तर पूर्वतयारी स्तर-पूर्व माध्यमिक स्तर-माध्यमिक स्तर) हे प्रमाण रोखण्यासाठी स्वयंप्रेरणेने तसेच यासंदर्भातील धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने आवश्यक ते प्रयत्न करणे.

९. शाळाबाह्य मूलांचे सर्वेक्षण तसेच संभाव्य स्थलांतरीत मूलांचे सर्वेक्षण यासाठी आवश्यक उपाययोजना करणे.

१०. केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत योजना व उपक्रम इत्यादींचा आढावा घेऊन त्यांची उपयोगिता वाढविण्यासाठी प्रेरक म्हणून काम करणे,

११. समूह साधन केंद्रातील शाळांची SQAAF नुसार प्रतवारी वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे.

१२. समूह साधन केंद्रातील शाळांतील शिक्षक व विद्यार्थी यांचेसाठी उत्कृष्ट व नावाजलेल्या शाळांचा अभ्यास दौरा आयोजित करणे. नियमित अंतराने कार्यप्रेरणा प्रशिक्षण आयोजित करणे. शिक्षकांची मासिक गट संमेलने आयोजित करणे,

१३. जादुई पिटारा, आयसीटी लॅब, टिंकरिंग लॅब इत्यादी शैक्षणिक साहित्य समग्र शिक्षा, पीएमश्री योजना, स्टार्स प्रकल्प इत्यादी विविध योजनांमधून शाळांना प्राप्त होत असते. या साहित्याचा समूह-साधन केंद्रातील शाळांमध्ये प्रभावी उपयोग करण्यासाठी आवश्यक ते नियोजन व मार्गदर्शन करणे.

१४. समूह साधन केंद्रातील सर्व मुख्याध्यापकांचे / शाळा प्रमुखांचे वार्षिक गोपनीय अहवाल लिहिणे व शिक्षकांचे मुख्याध्यापक / शाळा प्रमुख यांनी लिहिलेले गोपनीय अहवालांचे त्याना विहित केलेल्या वार्षिक लक्ष्यांच्या संदर्भात पुनर्विलोकन करणे.

१५. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या अध्यापनासाठी प्रत्येक समूह साधन केंद्रासाठी एक विशेष शिक्षक नेमण्यात येत आहे. समूह साधन केंद्रशाळेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमधील दिव्यांग विद्यार्थ्यांना अध्यापन करता यावे, यासाठी त्या त्या शाळेतील विद्यार्थी संख्या विचारात घेऊन अध्यापनाचे काटेकोर नियोजन करणे व या नियोजनाच्या अंमलबजावणीकडे लक्ष देणे.

१६. समूह साधन केंद्र स्तरावर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत कला व क्रीडा शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. केंद्रातील सर्व शाळांसाठी त्यांच्या कामाचे काटेकोर नियोजन व अंमलबजावणी करणे

१७. इयत्ता ५ वी ते ८ वी या इयत्तांमध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा व अनुषंगिक बाबींचे नियोजन करणे.

१८. समूह साधन केंद्रातील विविध शाळांमध्ये आठवड्यातून किमान चार तासिका अध्यापन करणे, १९. समूह साधन केंद्रातील शाळांची ऑनलाईन संचमान्यता व विद्यार्थी पडताळणी याअनुषंगाने सोपविण्यात आलेली कामे.

२०. समूह साधन केंद्रातील एखाद्या शाळेत शिक्षकाच्या अल्पावधीच्या रजेमुळे अध्यापनाचे कामकाज ठप्प होणार असल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून समूहातील अन्य शाळेतील शिक्षकाची त्या कालावधीसाठी नियुक्ती करणे.

२१. प्राथमिक व माध्यमिक शाळांचा दर्जा गुणवत्तापूर्ण उंचविण्यासाठी समूह साधन केंद्रांतर्गत सर्व शिक्षकांची दरमहा केंद्रस्तरीय शिक्षण परिषद आयोजित करुन त्याद्वारे शिक्षकांच्या शैक्षणिक समस्याचे निराकरण, शाळानिहाय उपक्रमाची देवाण घेवाण करणे, अशा उपक्रमांची विशेष नोंद घेऊन त्यांचे दस्तऐवज तयार करणे आणि ते सर्वांना उपयोगी ठरविण्यासाठी सार्वत्रिक करणे, यासाठी समूह साधन केंद्र समन्वयक सुलभक, समुपदेशक, मेंटॉरच्या भूमिकेतून शिक्षकांना शैक्षणिक सहाय्य प्रदान करतील.

२२. उपरोक्त कामे ही जिल्हा परिषदांच्या शाळांसंदर्भात विशेषत्वाने नमूद करण्यात आली असली तरी, प्रसंगपरत्वे व वरिष्ठांच्या आदेशानुसार समूह साधन केंद्रातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिपत्याखालील शाळा तसेच स्वयंअर्थसहाय्यीत तत्वावर स्थापन करण्यात आलेल्या शाळा वगळता इतर व्यवस्थापनांच्या शाळांसाठी देखील अशी कामे करणे आवश्यक असेल. या अन्य प्राथमिक/उच्च प्राथमिक व माध्यमिक/उच्च माध्यमिक शाळांबाबत शालेय प्रशासनातील समूह साधन केंद्र स्तरावरील महत्वाचा घटक म्हणून सोपविण्यात आलेली कामे पार पाडणे. शासनाच्या विविध योजना, धोरण, आदेश इत्यादींच्या अंमलबजावणीकरीता विस्तार अधिकारी (शिक्षण) व त्यावरील वरिष्ठ यंत्रणेने दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी करणे.

पीडीएफ प्रत लिंक

IMG 20250821 202358
Samuh Sadhan Kendra Samnvyak Adhikar Karya Kartavye

Leave a Comment

error: Content is protected !!