RTE 25 Persent Online Admission Process Date Schedule Registration Link
RTE 25 Persent Online Admission Process Date Schedule Registration Link
महाराष्ट्र शासन
प्राथमिक शिक्षण संचालनालय
जा. क्र. आरटीई २५%/२०२४/८०१/७८१६
दि. २०-१२-२०२४
प्रति,
१. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व
२. शिक्षणाधिकारी बृहन्मुंबई मनपा/ शिक्षण निरीक्षक मुंबई उत्तर/दक्षिण/पश्चिम.
३. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि.प. सर्व
४. प्रशासन अधिकारी म.न.पा./ न.पा. सर्व
५. गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती, सर्व
विषय :- सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरीता २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया शाळा नोंदणीची कार्यवाही करणेबाबत.
संदर्भ :-
१. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९
२. शासनाचे पत्र क्र. संकीर्ण-२०२४/प्र.क्र.१४१/एस.डी.१, दि. ११-१२-२०२४
३. मा. शिक्षण संचालक (प्राथमिक) यांचे दि. १३-१२-२०२४ रोजीची V.C.
उपरोक्त विषयान्वये आपणास कळविण्यात येते की, मा. शिक्षण संचालक (प्राथमिक) यांनी दि. १३-१२-२०२४ रोजी घेण्यात आलेल्या V.C. तील निर्देशानुसार सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया सुरु करण्याच्या अनुषंगाने दि. १८-१२-२०२४ ते दि. ३१-१२-२०२४ या कालावधीत शाळा नोंदणी (School Registration) आणि शाळा व्हेरिफिकेशन ची लिंक सुरु करण्यात आली आहे. शाळा नोंदणीनंतरचा अत्यंत महत्वाचा टप्पा शाळा व्हेरिफिकेशन असतो. तरी या अनुषंगाने सर्व संबंधितांनी शाळा व्हेरिफिकेशन करताना, बंद करण्यात आलेल्या शाळा, अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शाळा, अनधिकृत शाळा तसेच स्थलांतरीत झालेल्या शाळा व्हेरिफिकेशन करताना योग्य ती खबरदारी घेण्यात यावी. याबाबत सर्वस्वी जबाबदारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांचेवर निश्चित करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
तसेच शाळा मान्यता ज्या मंडळाची आहे तेच मंडळ शाळेने नोंदणी करताना निवडले आहे का याची खात्री करण्यात यावी. (उदा. शाळा मान्यता राज्य मंडळाची आहे व शाळेने नोंदणी करताना केंद्रीय मंडळ निवडले आहे.) तरी उपरोक्त सूचनांचे पालन करुन दिलेल्या कालावधीमध्ये शाळा नोंदणी व शाळा व्हेरिफिकेशनची कार्यवाही पूर्ण करावी.
(शरद गोसावी) शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे
ALSO READ 👇
RTE 25 Persent Online Admission Process Date Schedule Registration Link
RTE 25 Percent Online Admission Process Date Schedule Registration Link
RTE 25 Pravesh Prakriya Velapatrak
महाराष्ट्र शासन
प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे
जा. क्र. आरटीई २५%/२०२४/८०१/7738
दि. १३-१२-२०२४
प्रति,
श्रीम. आदिती एकबोटे, वरिष्ठ तांत्रिक संचालक, एन.आय.सी., पुणे
विषय :- आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०२५-२६ बाबत.
संदर्भ :- १. शासन निर्णय क्र. आरटीई-२०१७/प्र.क्र.३१५/एसडी-१, दि. १६-०१-२०१८
२. शासनपत्र क्र. संकीर्ण २०२४/प्र.क्र.१४१/एसडी-१, दि. ११-१२-२०२४
उपरोक्त विषयी संदर्भाधीन शासनाच्या पत्रान्वये आपणास कळविण्यात येत आहे की, सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी आर.टी.ई. २५ टक्के प्रवेश प्रक्रिया पूर्व तयारी कार्यशाळा दि. १५ जानेवारी ऐवजी दि. १५ डिसेंबर व अंतिम प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचा दि. १० एप्रिल ऐवजी दि. १० मार्च असा बदल करण्यास शासनाची मान्यता निकाली आहे.
RTE 25 Percent online admission student portal registration Link
तरी सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी आर.टी.ई. २५ टक्के प्रवेश प्रक्रिया सुरु करण्याचे अनुषंगाने दि. १८-१२-२०२४ पासून शाळा नोंदणीची लिंक उपलब्ध करुन देण्यात यावी.
RTE 25 % Online Admission Process Date Schedule School Registration Link
(शरद गोसावी)
शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे
At po anvi,tq Sillod dist ch.sambhajinagar -431112