मार्च २०२५ पुर्वी सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचे उपदान व अंशराशीकरण यासाठी निधी वितरित करण्याबाबत लेखाशीर्ष क्रमांक २२०२०२०८-०४ निवृत्तिवेतनविषयक खर्च Retired Teacher Gratuity Commutation

Retired Teacher Gratuity Commutation

Retired Teacher Gratuity Commutation

Retired teacher gratuity and Commutation of Pension

Retired teacher gratuity and proration

Teachers’ gratuity and fractionalization

मार्च २०२५ पुर्वी सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचे उपदान व अंशराशीकरण यासाठी निधी वितरित करण्याबाबत. लेखाशीर्ष क्रमांक २२०२०२०८-०४ निवृत्तिवेतनविषयक खर्च

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शासन निर्णय क्रमांक : पूरक-२०२५/प्र.क्र.८०/टीएनटी-६, मुंबई

दिनांक : १८/०२/२०२६

संदर्भ :-

१) आयुक्त (शिक्षण), पुणे यांचे पत्र क्र. अंदाज-१८१/पुरवणी मागणी/२०२५-२६/१५१८३३४ दि.०३.११.२०२५

२) वित्त विभाग, शासन परिपत्रक क्र. पूरक-२०२५/प्र.क्र.७१/अर्थ-३, दिनांक २७.१०.२०२५

३) वित्त विभाग, शासन परिपत्रक क्र. पूरक-२०२५/प्र.क्र.८४/अर्थ-३, दिनांक ०५.०१.२०२६

प्रस्तावना:-

संदर्भ क्र.१ अन्वये आयुक्त (शिक्षण), पुणे यांनी मार्च २०२५ पुर्वी सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचे उपदान व अंशराशीकरण प्रलंबित असून उपदान व अंशदान या बाबीसाठी २२०२०२०८-०४ निवृत्तिवेतनविषयक खर्च या लेखाशिर्षांतर्गत रक्कम रू. १६७ कोटी, ५१ लाख, ५३ हजार इतके अनुदान उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार मार्च २०२५ पुर्वी सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचे उपदान व अंशराशीकरण प्रलंबित असून उपदान व अंशदान यासाठी डिसेंबर २०२५ च्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे मंजूर एकूण १६७.५१५३ कोटी इतका निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

        शासन निर्णयः-

मार्च २०२५ पुर्वी सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचे उपदान व अंशराशीकरण प्रलंबित असून उपदान व अंशदान यासाठी मागणी क्र.ई-०२ मुख्य लेखाशीर्ष २२०२०२०८ २२०२, सर्वसाधारण शिक्षण, ०१ प्राथमिक शिक्षण, १०३, प्राथमिक शिक्षणासाठी स्थानिक संस्थांना सहाय्य (०३) इतर स्थानिक संस्थांना अनुदाने (०३) (०२) इतर स्थानिक़ संस्थाना अनुदाने याखालील ०४ निवृत्तिवेतनविषयक खर्च या लेखाशीर्षाखाली सन २०२५-२६ साठी एकूण १६७.५१५३ कोटी इतका डिसेंबर २०२५ च्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे मंजूर निधी अर्थसंकल्प वितरण प्रणालीवर वितरित करण्यास खालील अटींच्या अधीन राहून मान्यता देण्यात येत आहे.

१. सदरचा निधी ज्या कारणासाठी वितरित केला आहे. त्याच कारणासाठी खर्च करावा.

२. यासाठी आयुक्त (शिक्षण), पुणे यांना “नियंत्रक” अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.

३. “नियंत्रक” अधिकारी यांनी उक्त निधी वितरणाचा, विनियोगाचा तपशील शासनास सादर करावा.

४. वित्त विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय, परिपत्रक, सूचना, मार्गदर्शक तत्वे यांचे तंतोतंत पालन करण्याची जबाबदारी “नियंत्रक” अधिकारी यांची राहील.

५. सदर निधी दि.३१ मार्च २०२६ पूर्वी खर्च होईल याची दक्षता घेण्याची सर्वस्वी जबाबदारी “नियंत्रक” अधिकारी यांची राहील.

६. सदरहू शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. ३५/व्यय-५ दि.२३/०१/२०२६ अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

२. सदर शासन निर्णय, महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून, त्याचा संकेतांक २०२६०२१८११०७३०३९२१ असा आहे. हा शासन आदेश डिजीटल स्वाक्षरीने सांक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

Retired Teacher Gratuity Commutation
Retired Teacher Gratuity Commutation

r

Leave a Comment

error: Content is protected !!