दि ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झालेल्या/होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लगतच्या १ जानेवारी रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्तीवेतन निश्चित करण्याबाबत Retire On December 31st Imaginary Salary Increment

Retire On December 31st Imaginary Salary Increment

Retire On December 31st Imaginary Salary Increment

Regarding the determination of pension for employees who retired/will retire on December 31st, by considering a notional increment effective from the following January 1st.

दि. ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झालेल्या/होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लगतच्या १ जानेवारी रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्तीवेतन निश्चित करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
वित्त विभाग
शासन निर्णय क्रमांकः वेतन-२०२३/प्र.क्र.१३/सेवा-३ मंत्रालय, मुंबई

दिनांक : १९ डिसेंबर, २०२५.

वाचा-
१) शासन परिपत्रक क्रमांक:- वेतन-२०२३/प्र.क्र.१३/सेवा-३, दि. २८.०६.२०२३.

२) केंद्र शासनाचे दि.२०.०५.२०२५ रोजीचे कार्यालयीन ज्ञापन.

प्रस्तावना –

मा. उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद यांनी याचिका क्रमांक १८८१/२०२३ व इतर याचिकांमध्ये दि.१६.०२.२०२३ रोजी दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने दि.३० जून रोजी सेवा निवृत्त झालेल्या/होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगतच्या दि.०१ जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्तीवेतन निश्चित करण्याबाबत वित्त विभागाच्या संदर्भाधीन दि.२८.०६.२०२३ रोजीच्या शासन परिपत्रकान्वये सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.

सातव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आलेले महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारीत वेतन) नियम, २०१९ हे दि.०१.०१.२०१६ पासून लागू करण्यात आले आहेत. सदर नियमातील नियम १० अन्वये दि.०१ जुलै अथवा दि.०१ जानेवारी असे वेतनवाढीचे दिनांक ठरविण्यात आले आहेत. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्र शासनाच्या दि.२०.०५.२०२५ रोजीच्या ज्ञापनाव्दारे दि.३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना दि.०१ जानेवारी रोजीची काल्पनिक वेतनवाढ अनुज्ञेय केली आहे. त्याच धर्तीवर दि.३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना दि.०१ जानेवारी रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्तीवेतन निश्चित करण्याबाबत आदेश निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

    शासन निर्णय

शासन परिपत्रक, वित्त विभाग, दि.२८.०६.२०२३ नुसार दि.३० जून रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दि.०१ जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ अनुज्ञेय केली आहे. त्याच धर्तीवर दि.३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दि.०१ जानेवारी रोजीची काल्पनिक वेतनवाढ अनुज्ञेय करण्यात येत आहे.

त्यानुसार शासन परिपत्रक, वित्त विभाग, दि.२८.०६.२०२३ मधील सूचना, दि.३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनाही लागू करण्यात येत आहेत. सर्व विभागांनी दि.३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत दि.२८.०६.२०२३ रोजीच्या शासन परिपत्रकातील सूचनांप्रमाणे कार्यवाही करावी.

दि.०१ जानेवारी रोजी वेतनवाढ देण्याची तरतूद सातव्या वेतन आयोगात दि.०१.०१.२०१६ पासून अंमलात आली असल्याने, सदर तरतूद केंद्र शासनाच्या धर्तीवर दि.०१.०१.२०१६ पासून लागू राहील.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५१२१९१६३२३८३५०५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

शासन निर्णय पीडीएफ प्रत लिंक

सह सचिव, महाराष्ट्र शासन

दि ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झालेल्या/होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लगतच्या १ जानेवारी रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्तीवेतन निश्चित करण्याबाबत Retire On December 31st Imaginary Salary Increment
दि ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झालेल्या/होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लगतच्या १ जानेवारी रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्तीवेतन निश्चित करण्याबाबत Retire On December 31st Imaginary Salary Increment

Leave a Comment

error: Content is protected !!