Restrictions on participation in public ceremonies in honor of employees कर्मचाऱ्यांच्या सन्मानार्थ सार्वनिक समारंभात सहभागी होणे निर्बंध शासन निर्णय

Restrictions on participation in public ceremonies in honor of employees

Restrictions on participation in public ceremonies in honor of employees

Restrictions on participation in public ceremonies in honor of government employees

शासकीय कर्मचाऱ्यांच्या सन्मानार्थ सार्वनिक समारंभात सहभागी होणे निर्बंध

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग
शासन परिपत्रक सौडोआर-१३०७/प्र.क्र.८/०७/११,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक: २७ जुलै, २००७.

 शासन परिपत्रक 

महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ च्या नियम १३ मध्ये. शासकीय कर्मचाऱ्याच्या सन्मानार्थ सार्वजनिक समारंभ कोणताही शासकीय कर्मचारी, शासनाची पूर्वमंजूरी मिळाल्याखेरील त्याच्या संबंधातील किंवा दुसन्या कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याच्या संबंधातील कोणत्याही गौरवपर भाषण समारंभास किंवा निरोप समारंभास मान्यता देणार नाही किंवा कोणतेही प्रशस्तिपत्रक स्वीकारणार नाही किंवा त्याच्यासाठी अथवा दुसऱ्या कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यासाठी आयोजण्यात आलेल्या मनोरंजनपर कार्यक्रमास किंवा सभेस उपस्थित राहणार नाही, अशी स्पष्ट तरतूद करण्यात आलेली आहे. वरीलप्रमाणे आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमास व त्यात सहभागी होण्याकरीता शासनाच्या पूर्वमान्यतेची आवश्यकता आहे. ही बाब चंगळ्याने सांगण्याची गरज नाही.

२. असे निदर्शनास आले आहे की, राज्यशासकीय अधिकारी/कर्मचारी शासनाच्या पूर्वमान्यतेशिवाय त्यांच्या गौरवपर/निरोप समारंभाच्या कार्यक्रमात सहभागी होतात. तसंच प्रशस्तिपत्रक स्विकारतात व अन्य अधिकारी/कर्मचारी सदर कार्यक्रमाच्या आयोजनात सहभागी होतात व मनोरंजनपर कार्यक्रमास उपस्थित राहतात. त्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील तरतूदीचा भंग होतो.

३. याबाबतीत पुन्हा एकवार असे निदर्शनास आणून देण्यात येत आहे की. कोणताही शासकीय कर्मचारी, शासनाची पूर्वमंजूरी मिळाल्याखेरील त्याच्या संबंधातील किंवा दुसऱ्या कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याच्या संबंधातील कोणत्याही गौरवपर भाषण समारंभास किंवा निरोप समारंभास मान्यता देणार नाही किंवा कोणतेही प्रशस्तिपत्रक स्वीकारणार नाही किंवा त्याच्यासाठी अथवा दुसऱ्या कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यासाठी आयोजण्यात आलेल्या मनोरंजनपर कार्यक्रमास किंवा सभेस उपस्थित राहणार नाही.

४ सर्व विभागप्रमुख व कार्यालय प्रमुख यांनी वरील सुचना त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणाव्यात. या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या अधकारी/कर्मचारी यांच्याविरुध्द शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात यावी.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला

असून त्याचा संगणक संकेतांक २००७०७२७१६२५२४००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

शासन परिपत्रक पीडीएफ मध्ये हवे असल्यास होते यावेळी या स्पर्श करा

उप सचिव, महाराष्ट्र शासन

राज्यपाल यांचे सचिव
मुख्यमंत्र्यांचे र्साचव
मंत्री व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव
प्रबंधक, महाराष्ट्र लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई.
प्रबंधक, उच्च न्यायालय, मुंबई.
प्रबंधक, मूळ न्याय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई.
सर्व विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख सर्व मंत्रालयीन विभाग
निवड फाईल.

IMG 20250818 221718

Leave a Comment

error: Content is protected !!