शासन सेवेत सरळसेवेने नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादेत दिनांक ३१ डिसेंबर २०२७ पर्यंत शिथिलता देणेबाबत Relaxation In Upper Age Limit GR

Relaxation In Upper Age Limit GR

Relaxation In Upper Age Limit GR

WhatsApp Channel Follow US
Telegram Group Join Now
whatsapp Group Join Now

शासन सेवेत सरळसेवेने नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादेत दिनांक ३१ डिसेंबर २०२७ पर्यंत शिथिलता देणेबाबत…

दिनांक : ०५ नोव्हेंबर २०२६.
संदर्भ :-
१) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र. एसआरव्ही-२०१५/प्र.क्र.४०४/का.१२, दि. २५.०४.२०१६.
२) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र. मलोआ-११२६/ प्र.क्र.२३९/मलोआ, दि. ०४.०९.२०२६.

प्रस्तावना
राज्यातील विद्यमान भरती परीक्षा पद्धतीचा सर्वकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी उच्चस्तरीय सचिव समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने केलेल्या शिफारशींच्या अनुषंगाने विहित कमाल वयोमर्यादेत शिथिलता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

	शासन निर्णय.

या शासन निर्णयाद्वारे खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत:-

१) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक ०१ जानेवारी, २०२६ ते या शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत पदभरतीकरिता ज्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत आणि ज्या जाहिरातींच्या निवड प्रक्रियेचा कोणताही टप्पा पार पडलेला नाही, अशा जाहिरातींकरिता संदर्भ क्र. (१) मधील सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक २५.०४.२०१६ च्या शासन निर्णयान्वये विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेत एक वर्ष इतकी शिथिलता देण्यात येत आहे; आणि,


२) या शासन निर्णयाच्या दिनांकापासून दिनांक ३१ डिसेंबर, २०२७ पर्यंत पदभरतीकरिता ज्या जाहिराती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नव्याने प्रसिद्ध होणार आहेत, अशा जाहिरातींकरिता अर्ज केलेल्या उमेदवारांना संदर्भ क्र. (१) मधील सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक २५.०४.२०१६ च्या शासन निर्णयान्वये विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेत एक वर्ष इतकी शिथिलता देण्यात येत आहे.

३) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाव्यतिरिक्त भरती परीक्षा आयोजित करणाऱ्या अन्य यंत्रणांमार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांकरिता देखील वरील अ.क्र. (१) आणि (२) येथे नमूद केलेल्या तरतुदी लागू राहतील.

४) ज्या पदांसाठी संबंधित पदांच्या सेवाप्रवेश नियमात विवक्षित कारणास्तव संदर्भाधीन दिनांक २५.०४.२०१६ च्या शासन निर्णयामध्ये विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेपेक्षा भिन्न कमाल वयोमर्यादा विहित केली आहे, अशा पदांसाठी विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेत देखील सदर एक वर्ष इतकी शिथिलता देय राहील.

५) यामुळे वरील अ.क्र. (१) अनुसार जे उमेदवार अशा जाहिरातींकरिता अर्ज करण्यास पात्र होत आहेत, त्यांना अर्ज सादर करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी विहित कार्यवाही करावी.

६) सदर शिथिलता ही केवळ एक वेळची विशेष बाब म्हणून लागू करण्यात येत असून, दिनांक १ जानेवारी, २०२८ रोजी किंवा त्यानंतर प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता संबंधित पदांच्या सेवाप्रवेश नियमात अथवा संदर्भाधीन क्र. (१) येथील दिनांक २५.०४.२०१६ च्या शासन निर्णयात विहित केलेली कमाल वयोमर्यादाच लागू राहील.

२. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२६११०५१४३४१२८७०७ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
LEENA ASHISH SANKHE
(लिना संखे) शासनाच्या उपसचिव.
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांकः एसआरव्ही-२०२६/प्र.क्र.६४/सेवा-१ (का. १२) मंत्रालय,मुंबई

शासन निअर्णय पीडीएफ लिंक

Relaxation In Upper Age Limit GR
Relaxation In Upper Age Limit GR

Relaxation in Upper Age Limit GR

शासन सेवेत सरळसेवेने नियुक्तीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत दि.३१ डिसेंबर २०२३ पर्यंत शिथिलता देणेबाबत…..
Relaxation of upper age limit for direct recruitment in Government service till 31st December, 2023

Relaxation of upper age limit for appointment

महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांकः सनिव २०२३/प्र.क्र.१४/कार्या १२, मुंबई

तारीख: ०३ मार्च, २०२३

संदर्भ :- सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. एसआरव्ही-२०१५/प्र.क्र.४०४/का-१२, दि.२५.०४.२०१६

प्रस्तावना :-
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून राज्य शासनाने ७५ हजार पदभरतीची प्रक्रीया सुरु करण्याचे घोषित केले असून, याकरीता पदभरतीवरील निर्बंध काही कालावधीकरीता शिथिल करण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने भरती प्रक्रीया सुरु झाली आहे. दरम्यानच्या कालावधीत काही लोकप्रतिनिधींकडून निवेदने प्राप्त झाली आहेत. सदर निवेदनांद्वारे अशी मागणी करण्यात आली आहे की, विविध कारणांमुळे (उदा. कोरोना, सदोष मागणीपत्रे व मागणीपत्र न पाठविणे इ.) पुरेशा जाहिराती प्रसिध्द न झाल्याने, ज्या उमेदवारांना परिक्षांना बसण्याची संधी प्राप्त झाली नाही आणि त्यांची कमाल वयोमर्यादा संपुष्टात आली आहे, अशा उमेदवारांना परिक्षांना बसण्याची संधी प्राप्त व्हावी, यास्तव शासनाने कमाल वयोमर्यादेत सवलत देण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा. या पार्श्वभूमीवर उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत शिथिलता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

प्रस्तावनेत नमूद कारणांचा साधकबाधक विचार करुन, या शासन निर्णयाद्वारे खालीलप्रमाणे सुचना देण्यात येत आहेत.

१) या शासन निर्णयाच्या दिनांकापासून ते दि.३१ डिसेंबर, २०२३ पर्यंत शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरातींकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी संदर्भाधीन दि.२५.०४.२०१६ च्या शासन निर्णयात विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेत (खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्षे व मागास प्रवर्गासाठी ४३ वर्षे) दोन वर्षे इतकी शिथिलता (खुल्या प्रवर्गासाठी ४० वर्षे व मागास प्रवर्गासाठी ४५ वर्षे) देण्यात येत आहे.

२) ज्या पदांसाठी संबंधित पदांच्या सेवाप्रवेश नियमात विवक्षित कारणास्तव संदर्भाधीन दि.२५.०४.२०१६ मध्ये विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेपेक्षा भिन्न कमाल वयोमर्यादा विहित केली आहे, अशा पदांसाठी देखील या शासन निर्णयाच्या दिनांकापासून ते दि.३१ डिसेंबर, २०२३ पर्यंत शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्तीसंदर्भात प्रसिध्द होणाऱ्या सर्व जाहिरातींकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी संबंधित पदाच्या सेवाप्रवेश नियमात विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेत दोन वर्षे इतकी शिथिलता देय राहील.

३) सदर शासन निर्णयाच्या दिनांकापूर्वी जाहिराती प्रसिध्द झालेल्या आहेत तथापि अद्याप उमेदवारांनी अर्ज सादर करण्याची मुदत संपलेली नाही, अशा सर्व जाहिरातींसाठी देखील वरील (१) व (२) नुसार कमाल वयोमर्यादेतील शिथिलता लागू राहील. त्यानुसार संबंधितजाहिरातीच्या अनुषंगाने कमाल वयोमर्यादेत शिथिलता दिल्याने पात्र ठरलेल्या उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी आवश्यकतेनुसार पुरेशी मुदतवाढ देण्यात यावी. ४) दि.३१ डिसेंबर, २०२३ नंतर प्रसिध्द होणाऱ्या जाहिरातींसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरीता संदर्भाधीन दि.२५.०४.२०१६ च्या शासन निर्णयात अथवा संबंधित पदांच्या सेवाप्रवेश नियमात विहित केलेली कमाल वयोमर्यादाच लागू राहील.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२३०३०३१८०२१४६५०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(गीता कुलकर्णी)

उप सचिव,
महाराष्ट्र शासन

Leave a Comment

error: Content is protected !!