राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम Rani Lakshmi Bai Self Defense Training Program

Rani Lakshmi Bai Self Defense Training Program

Rani Lakshmi Bai Self Defense Training Program

Rani Lakshmi Bai Self Defense Training

Rani Lakshmi Bai Aatm Raksha Prashikshan Karykram Yojana updates

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
समग्र शिक्षा
निपुण भारत

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई

जा.क्र.मप्राशिप/समग्र शिक्षा/Self Defense Training/२०२५-२६/५९६

दिनांक: 18 FEB 2026

प्रति,

१) आयुक्त, महानगरपालिका, सर्व.

२) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व.

संदर्भ :

१) या कार्यालयाचे कार्यादेश क्र. मप्राशिप/समग्र शिक्षा/Self Defense Training/२०२५-२६/१२० दि.१२/०१/२०२६.

२) या कार्यालयाचे मार्गदर्शक सूचना पत्र क्र. मप्राशिप/समग्र शिक्षा/Self Defense Training/२०२५-२६/३०२ दि.२२/०१/२०२६.

राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये मुलींना स्वसंरक्षणाच्या सर्व पैलूंमध्ये सक्षम करणे, कोणत्याही कठीण परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी मुलींना स्वयंकौशल्यात पारंगत करणे व त्यांच्यामध्ये आत्मविश्वास जागरुकता विकसित करण्यासाठी समग्र शिक्षा अंतर्गत सन २०२५-२६ मध्ये राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत इयत्ता ६ वी ते १२ वीतील मुलींना स्वसंरक्षण प्रशिक्षण व जीवनकौशल्य विकसित करण्यासाठी केंद्रशासनाकडून तरतूद मंजूर करण्यात आली आहे.

मा. मंत्री महोदय, शालेय शिक्षण विभाग यांच्या निर्देशानुसार राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण हे माजी सैनिकांमार्फत करण्याचे नियोजन होते. तथापि, संचालक सैनिक कल्याण विभाग यांनी पुरेसे मनुष्यबळ व यंत्रणा उपलब्ध नसल्याने सदर प्रशिक्षण कार्यक्रम या विभागामार्फत राबविता येणे शक्य नसल्याचे कळविले होते. त्यामुळे शासनाच्या निर्देशानुसार ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात येऊन उक्त संदर्भिय पत्र क्र. १ अन्वये M/s. Indus Edutrain Private Limited यांना कार्यादेश निर्गमित करण्यात आलेला आहे. यास्तव सदर प्रकल्प सुरु होण्यास काहीसा विलंब झालेला आहे.

यापूर्वी राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत केवळ स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्यात येत होते. मा. मंत्री महोदय यांच्या निर्देशानुसार आत्मरक्षा प्रशिक्षण कार्यक्रमात स्वसंरक्षण प्रशिक्षणासह योगा प्रशिक्षण, सैनिकी प्रशिक्षण, प्रेरणादायी व्याख्याने इ. प्रशिक्षणाचा समावेश करण्यात आलेला आहे.

mpspmah@gmail.com
samagra-shiksha@mahedu.gov.in

संकेतस्थळ –
https://samagrashiksha.maharashtra.gov.in
https://mpsp.maharashtra.gov.in

मा. मंत्री महोदय, शालेय शिक्षण विभाग यांनी मा. प्रधान सचिव (शालेय शिक्षण), मा. आयुक्त (शिक्षण), राज्य प्रकल्प संचालक यांच्या समवेत दि.१०/०२/२०२६ रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण कार्यक्रमासंदर्भात विभागीय शिक्षण उपसंचालक व जिल्हयातील शिक्षणाधिकारी (प्राथमिक), यांचा आढावा घेतला असता काही जिल्हयातील शाळांमध्ये अल्पप्रमाणात प्रशिक्षणाला सुरुवात झाली असल्याचे निदर्शनास आले आहे. यावर मा. मंत्री महोदय यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

या संदर्भात आपणास सूचित करण्यात येते की, संदर्भिय पत्र क्र.२ अन्वये निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांसोबत ६७ प्रशिक्षण तासिका (67) Training Session) जोडण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार आपल्या जिल्हयात प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जात असल्याची खातरजमा करावी. तसेच, सदर प्रशिक्षण विहित वेळेमध्ये पूर्ण होईल यासाठी सहकार्य करावे.

आर्थिक वर्ष अखेरीस कमी कालावधी शिल्लक असल्याने, प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त तासिका (Session) घेता येतील अशाप्रकारे योग्य नियोजन करावे. जिल्हयातील मुख्याध्यापक व प्रशिक्षक यांनी समन्वय साधून सुट्टीच्या दिवशी देखील प्रशिक्षण आयोजित करावे जेणेकरुन, इ.६वी ते १२ वीच्या सर्व मुलींना सदर प्रशिक्षणाचा जास्तीत जास्त लाभ घेता येईल.

सेवादारास प्रति शाळा पूर्ण केलेल्या प्रशिक्षणानुसार देयक अदा केले जाणार असल्याने तासिकांची नोंद शाळास्तरावर ठेवण्यात यावी. तसेच Online Monitoring साठी MIS Dashboard विकसित करण्यात आला आहे. शाळास्तरावरील नोदी व Dashboard वरील नोंदी इत्यादी बाबींच्या आधारे शिक्षणाधिकारी यांनी प्रमाणपत्र सादर करावे. सदर प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर सेवादारास देयके अदा करण्यात येतील.

सदर प्रशिक्षण कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी.

परिपत्रक व अधिक जाणून घ्या या ओळीला स्पर्श करून

राज्य प्रकल्प संचालक म.प्रा.शि.प., मुंबई

Rani Lakshmi Bai Self Defense Training Program
राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम Rani Lakshmi Bai Self Defense Training Program

प्रत कार्यवाहीस्तव :

१) शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद सर्व

२) शिक्षणाधिकारी/प्रशासन अधिकारी, महानगरपालिका सर्व

३) गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती सर्व

Leave a Comment

error: Content is protected !!