Punyashlok 300 LOGO
Punyashlok 300 LOGO
Use of Punyashlok Ahilyadevi Holkar Logo
Regarding the use of the emblem on government correspondence on the occasion of the 300th birth anniversary of “Punyashlok Ahilyadevi Holkar”…
“पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर” यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त शासकीय पत्रव्यवहारावर बोधचिन्ह वापरण्याबाबत…
दिनांक : ६ मे, २०२५
प्रस्तावना :-
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या भारतीय इतिहासातील एक तेजस्वी, कर्तबगार व दूरदृष्टी असणाऱ्या स्त्रीशक्तीचे प्रतीक आहेत. त्यांनी धार्मिक सहिष्णुता, समाजकल्याण, सार्वजनिक बांधकाम, न्यायनिष्ठ प्रशासन आणि स्त्री शिक्षणाच्या माध्यमातून आदर्श राज्यकारभाराची उभारणी केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त त्यांचे कार्य, विचार आणि प्रेरणादायी जीवनगाथा जनसामान्यांपर्यत प्रभावीपणे पोहचविणे, राज्यातील तसेच देश विदेशातील समाजमनात त्यांच्याविषयी पुन्हा नव्याने जाणीव निर्माण करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने, पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त “पुण्यश्लोक ३००” या बोधचिन्हाचा (LOGO) राज्य शासनाच्या शासकीय पत्रव्यवहारात वापर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय
“पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त त्यांचे कार्य, विचार आणि प्रेरणादायी जीवनगाथा पुन्हा नव्याने जनसामान्यांपर्यत प्रभावीपणे पोहचविणे, राज्यातील तसेच देश-विदेशातील समाजमनात त्यांच्याविषयी पुन्हा नव्याने जाणीव निर्माण होण्यासाठी परिशिष्ट -“अ” मध्ये सुनिश्चित केलेल्या “पुण्यश्लोक ३००” विशेष बोधचिन्हाचा (LOGO) राज्य शासनाच्या शासकीय पत्रव्यवहारात वापर करण्यास मान्यता देण्यात येत आहे. त्यासाठी, सदर बोधचिन्हाचा क्यू आर कोड (QR code) सोबत जोडला आहे.
सदर बोधचिन्हाचा सर्व शासकीय कार्यालयाच्या पत्रावर, परिपत्रकावर वापर व्हावा.
सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी त्यांच्या अधिनस्त क्षेत्रीय कार्यालयांना. महामंडळांना व स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या स्तरावरून पत्रावर या बोधचिन्हाचा योग्य उपयोग व्हावा, यानुषंगाने योग्य त्या सूचना प्रसारीत कराव्यात.
शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण ८२२५/प्र.क्र.२२३/सां.का.४
०२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०२५०५०६१३०९२४६३२३ असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने सांक्षाकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,
अवर सचिव, महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण ८२२५/प्र.क्र.२२३/सां.का.४, मंत्रालय, मुंबई