Providing Benefits To Students As Per Newly Determined Recipes Under Pradhan Mantri Poshan Shakti Nirman Yojana

Providing Benefits To Students As Per Newly Determined Recipes Under Pradhan Mantri Poshan Shakti Nirman Yojana

IMG 20240626 101122 1
Providing Benefits To Students As Per Newly Determined Recipes Under Pradhan Mantri Poshan Shakti Nirman Yojana

Providing Benefits To Students As Per Newly Determined Recipes Under Pradhan Mantri Poshan Shakti Nirman Yojana

विषयः- प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत नवीन निश्चित केलेल्या पाककृतीनुसार विद्यार्थ्यांना लाभ देणेबाबत
Providing Benefits To Students As Per Newly Determined Recipes Under Pradhan Mantri Poshan Shakti Nirman Yojana

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण (पूर्वीची शालेय पोषण आहार) योजना राज्यामध्ये सन १९९५-९६ पासून राबविण्यात येत आहे. सदर योजनेंतर्गत राज्यातील पात्र शाळांमधील इ.१ ली ते इ.८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यात येतो. योजनेतंर्गत इ. १ ली ते ५ वी च्या प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यासाठी ४५० उष्मांक आणि १२ ग्रॅम प्रथिने युक्त तसेच इ. ६ वी ते इ.८ वी च्या उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ७०० उष्मांक आणि २० ग्रॅम प्रथिने युक्त आहार देण्यात येतो. प्रस्तुत योजनेतंर्गत केंद्र शासनाकडून सवलतीच्या दरामध्ये प्रति दिन प्रति विद्यार्थी प्राथमिक वर्गासाठी १०० ग्रॅम आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी १५० ग्रॅम तांदूळ पुरविण्यात येतो. शासन निर्णय दिनांक ०२ फेब्रुवारी, २०११ मधील तरतूदीनुसार तांदूळापासून बनविलेल्या पाककृतीच्या स्वरुपात पोषण आहाराचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यात येत होता.
केंद्र शासनाने योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना आहाराचा लाभ देण्यासाठी स्थानिक स्तरावर उपलब्ध होणाऱ्या अन्नपदार्थांचा व तृणधान्याचा समावेश करण्याबाबतच्या शक्यता पडताळून पाहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुषंगाने प्रस्तुत योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या आहारामध्ये स्थानिक स्तरावर उपलब्ध अन्नधान्य, तृणधान्य व अन्य पदार्थांचा समावेश करुन आहाराचा दर्जा व पौष्टिकता वृध्दींगत
करणे व आहारात वैविधता आणण्याच्या उद्देशाने आरोग्य, आहार, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचीव्यक्तींची समिती गठीत करण्यात आली होती. सदर समितीने योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना आहाराचा लाभ देण्यासाठी वेगवेगळ्या पाककृतीसह योजनेमध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने शिफारशी सादर केल्या आहेत. योजनेंतर्गत राज्यातील सर्व पात्र शाळांमध्ये परसबागा निर्माण करण्यात येत आहेत. शालेय परसबागेतील उत्पादित भाजीपाला व फळे यांचा समावेश विद्यार्थ्यांच्या आहारात होत असल्याने विद्यार्थ्यांना ताजा सकस आहार मिळण्यास मदत होत आहे.

Also Read 👇

शाळांमध्ये परसबाग उपक्रम प्रभावीपणे राबविण्याबाबत शासन परिपत्रक दिनांक – १०/६/२०२४
संपूर्ण शासन निर्णय वाचण्यासाठी किंवा पीडीएफ मध्ये डाऊनलोड करण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा


प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत नवीन पाककृती निश्चित करणे बाबत शासन निर्णय दिनांक – ११/६/२०२४ संपूर्ण शासन निर्णय वाचण्यासाठी किंवा पीडीएफ मध्ये डाऊनलोड करण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा

सदर सर्व बाबींचा विचार करुन विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात वैविध्यता आणून विद्यार्थ्यांना तीन संरचित आहार (Three Course Meal) दिल्यास विद्यार्थी शालेय पोषण आहार आवडीने खातील. तीन संरचित पध्दतीमध्ये तांदूळ, डाळी/कडधान्यापासून तयार केलेला आहार मोड आलेले कडधान्य (स्प्राउट्स) आणि गोड पदार्थ म्हणून तांदळाची खीर/नाचणीसत्व यांचा समावेश करून नविन पाककृती शासनाने संदर्भिय शासन निर्णयान्वये निश्चित केली आहे.

१) प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून पाककृती सुधारणा समितीने सुचविलेल्या १५ प्रकारच्या पाककृर्तीच्या स्वरुपात पोषण आहाराचा लाभ देण्यास शासनाने संदर्भिय शासन निर्णयान्वये मान्यता दिलेली आहे.

२) केंद्रीय स्वयंपाकगृहांतर्गत येणाऱ्या शाळा वगळून उर्वरित सर्व शाळास्तरावर सद्यस्थितीत ज्या डाळी व कडधान्य उपलब्ध आहेत. त्या डाळी व कडधान्यापासून उक्त शासन निर्णयामध्ये दिलेल्या परिशिष्टात नमूद असलेल्या पाककृतीनुसार विद्यार्थ्यांना योजनेचा तात्काळ लाभ देण्यात यावा.

३) तांदुळ व धान्यादी मालाची यापुढील मागणी नोंदविताना संदर्भिय शासन निर्णयाचे पालन होईल यादृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करुन यापुढील मागणी नोंदविण्यात यावी.

४) आपल्या कार्यक्षेत्रातील केंद्रीय स्वयंपाकगृहांतर्गत येणाऱ्या सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना संदर्भिय शासन निर्णयानुसार तात्काळ मध्यान्ह भोजनाचा लाभ देण्यात यावा, याबाबत हलगर्जीपणा होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी.

५) तीन संरचित आहार पध्दतीप्रमाणे विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांना प्रत्येक दिवशी (अंडा पुलाव पाककृती असलेला दिवस वगळून) आहारासोबत मोड आलेले कडधान्य (स्प्राऊटस) व तांदळाची खीर/नाचणी सत्व देण्यात यावेत.

६) ज्या दिवशी विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा अंडा पुलाव (पाककृती क्र.९) या पदार्थाचा लाभ विद्यार्थ्यांना देणार आहे. त्या दिवशी इ. १ ली ते ५ वी करीता १०० ग्रॅम तांदूळ व इ. ६ वी ते ८ वी करीता १५० ग्रॅम तांदूळाचा वापर करुन मध्यान्ह भोजनचा लाभ देण्यात यावा. अंडी न खाणाऱ्या विद्यार्थ्यांना सदर दिवशी व्हेजिटेबल पुलाव या पाककृतीच्या स्वरुपात लाभ देण्यात यावा, तसेच, अंडी न खाणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाने निश्चित केलेल्या खर्च मर्यादेत केळी अथवा स्थानिक फळ देण्यात यावेत. सदर दिवशी तांदळाची खीर, नाचणीसत्व व मोड असलेले कडधान्य (स्प्राऊट्स) देण्यात येऊ नये.

७) गोड खिचडी, नाचणी सत्व व तांदळाच्या खीरीच्या पाककृतीसाठी दुध पावडर, गुळ/साखर व सोयाबीन पुलावासाठी सोयाबीन वडी यांची आवश्यकता आहे. सदर वस्तू पुरवठेदारामार्फत पुरविण्यात येत नसल्यामुळे प्रस्तुत वस्तूंच्या खरेदीसाठी महिन्यातील दोन दिवसांच्या आहार खर्चाची पूर्ण रक्कम शाळा स्तरावर वितरीत करावयाची आहे. त्या रक्कमेतून शालेय व्यवस्थापन समितीने दुध पावडर, गुळ/साखर, सोयाबीन वडी यांची खरेदी करुन विद्यार्थ्यांना लाभ देण्यात यावा.

७.१ केंद्रीय स्वयंपाकगृहांतर्गत येणाऱ्या शाळा वगळून उर्वरित सर्व शाळांतील विद्याथ्यांना सदर शासन निर्णयानुसार लाभ देण्यासाठी उक्त पदार्थाच्या खरेदी करीता आवश्यक निधी शाळास्तरावर वर्ग करण्यासाठी आपल्या कार्यक्षेत्रातील इ. १ ली ते ५ वी व इयत्ता ०६ वी ते ०८ वी च्या विद्याथ्यांच्या दिनांक ०१/०७/२०२४ रोजीच्या पटसंख्येचा तपशिल दिनांक ०२/०७/२०२४ रोजी सकाळी ११:०० वाजेपर्यंत संचालनालयास सादर करण्यात यावा. विहित कालमर्यादेत माहिती सादर न झाल्यास होणाऱ्या विलंबास सर्वस्वी आपण जबाबदार राहाल, याची गांभीर्याने नोंद घ्यावी,

८) नाचणी सत्वासाठी आवश्यक नाचणीची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली आहे. भारतीय अन्न महामंडळातून प्रस्तुत नाचणीचा पुरवठा शासनामार्फत शाळास्तरावर
करण्यात येईल.
९) शासन निर्णयामध्ये दिलेल्या निर्देशांनुसार आपल्या स्तरावरुन आवश्यक ती कार्यवाही करुन विद्यार्थ्यांना तात्काळ योजनेचा लाभ देण्यात यावा.

१०) योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना दोन आठवडे प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या पदार्थाचा लाभ देण्याच्या दृष्टीने पाककृती निर्धारित करण्यात आलेल्या आहेत. आठवड्यातील प्रत्येक दिवशी कोणती पाककृती निश्चित करावयाची याबाबत संबंधित जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखालील समितीव्दारे तात्काळ निर्णय घेण्यात यावा. तसेच, मुंबई महानगरपालिका क्षेत्राकरीता शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तात्काळ निर्णय घ्यावा, प्रस्तुत समितीने घेतलेल्या निर्णयानुसारच विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात यावा.

योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना तीन संरचित आहार (Three Course Meal) चा लाभ देणेकरीता आपल्या स्तरावरुन शासन निर्णयानुसार तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. याबाबत हलगर्जीपणा होणार नाही याची दक्षता आपल्या स्तरावरुन घेण्यात यावी.

(शरद गोसावी)

शिक्षण संचालक (प्राथमिक),

प्राथमिक शिक्षण संचालनालय,
महाराष्ट्र राज्य, पुणे.

Leave a Comment

error: Content is protected !!