Implementation of Road Safety Initiative Circular GR

Implementation of Road Safety Initiative Circular GR

IMG 20240621 200224
Implementation of Road Safety Initiative Circular GR

Implementation of Road Safety Initiative Circular GR

रस्ता सुरक्षा उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबत….

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण-२०२४/प्र.क्र.३६/प्रशिक्षण मादाम काम मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२, दिनांक: २१ जून, २०२४

परिपत्रक:-

आजच्या युगात लोकांच्या राहणीमानाचा दर्जा वाढला असून, प्रत्येक कुटुंबात सरासरी एक तरी वाहन आहे. रस्त्यांवर वाहनांची वर्दळ झाल्याने व रस्ता सुरक्षेबाबत आवश्यक ती जनजागृती नसल्याने पर्यायाने दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण देखील वाढत आहे. अपघातांमुळे मोठया प्रमाणावर जिवीत व वित्त हानी तर होतेच तसेच परिणामी संबंधित कुटुंब पुर्णपणे उद्धवस्त देखील होते.

२. शालेय विद्यार्थ्यांना दिलेल्या माहिती/ज्ञान व प्रशिक्षणाचा फायदा त्यांना वैयक्तिक तर होतोच तसेच ते त्यांच्याकडील ज्ञानाचे प्रसारण कुटुंब व समाजामध्ये करण्यास अतिशय उत्सुक असल्याने जनजागृती करणे सोपे जाते हे लक्षात घेऊन शालेय विद्यार्थ्यांना वाहतूक सुरक्षा व नियंत्रण, पद कवायत, अग्निशमन, नागरी संरक्षण, प्रथमोपचार व बचाव कार्य याबाबत ज्ञान तसेच प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाते. ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षेबद्दल जागरुकता तर निर्माण होतेच तसेच सेवाभावीवृत्ती, बंधुता, शिस्त हे गुण देखील अंगी बाणवले जातात. शालेय विद्यार्थ्यांमध्ये तदनुषंगाने प्रशिक्षित केल्यास विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेबद्दल अधिक माहिती प्राप्त होऊन, जागरुकता वाढण्यास तसेच पर्यायाने अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.

🙋‍♂️

👉 रस्ता सुरक्षा वर आधारित प्रश्नमंजुषा सोडविण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा 👈

३. सबब, रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण ऑगनायझेशन (RSP & CD), कोल्हापूर या संघटनेस रस्ता सुरक्षा उपक्रम राज्यातील शाळांमध्ये व्यापक स्वरुपात राबविण्याकरिता विचारसभा, चर्चासत्र, शिक्षक व विद्यार्थी प्रशिक्षण, शिबीरे इत्यादीचे आयोजनाकरिता सहकार्य करण्यास शिक्षण विभागांतर्गत सर्व संचालक, सह संचालक, उप संचालक व शिक्षणाधिकारी यांनी त्यांच्या स्तरावरुन आपल्या कार्यक्षेत्रातील अधिकारी व शाळा व्यवस्थापनास पत्राने सूचना दयाव्यात.

४. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा सांकेतांक २०२४०६२११८००४१७९२१ असा आहे. सदर शासन परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सदर शासन निर्णय / परिपत्रक पीडीएफ मध्ये हवे असल्यास फक्त या ओळीला स्पर्श करा

(टि. वा. करपते)
सह सचिव, महाराष्ट्र शासन

Leave a Comment

error: Content is protected !!