Procedure for implementing Pre-Matric Scholarship Merit Scholarship Scheme for students of class 1st to 10th in VJNT OBC SBC Online on MahaDBT Portal
Procedure for implementing Pre-Matric Scholarship Merit Scholarship Scheme for students of class 1st to 10th in VJNT OBC SBC Online on MahaDBT Portal
Procedure for implementing the Pre-Matric Scholarship/Quality Scholarship Scheme for students of class 1st to 10th in the state’s Vijabhaj, Emaw and Vimapra categories from the year 2025-26 online on the MahaDBT system
सन २०२५-२६ पासून राज्यातील विजाभज, इमाव व विमाप्र या प्रवर्गातील इयत्ता १ ली ते इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती/गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना महाडीबीटी प्रणालीवर ऑनलाईन पध्दतीने राबविण्याची कार्यपध्दती…….
महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग
शासन परिपत्रक क्रमांक: शिवृत्ती-२०२१/प्र.क्र.१०३/शिक्षण-२,मुंबई
दिनांक : १० नोव्हेंबर, २०२५
वाचा :-
१) शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक: संकीर्ण-२०२२/प्र.क्र.२७/अर्थबळ, दि.०८.०६.२०२२
२) इतर मागास बहुजन कल्याण विभाग पत्र क्रमांक शिवृत्ती २०२३/प्र.क्र.१०३/शिक्षण-२, दि.२०.०३.२०२५
प्रस्तावना:-
वित्त विभागाने त्यांच्या संदर्भ क्र.१ येथे नमूद दिनांक ०८.०६.२०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये वैयक्तिक लाभाच्या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत सुचना दिलेल्या आहेत. वैयक्तिक लाभाच्या योजनांपासून कोणीही वंचित राहू नये म्हणून शिष्यवृत्तीशी संबंधित सर्व विभागांच्या योजना आधारशी संलग्नीकृत करुनच दि.१०.०१.२०२३ पासून DBT मार्फत शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याबाबत सदर शासन निर्णयान्वये सुचित केले आहे. त्याअनुषंगाने DBT मार्फत शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना Online करण्याकरिता व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र इन्फॉरमेंशन टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन लि., यांस संदर्भ क्र.२ येथे नमूद दिनांक २०.०३.२०२५ रोजीच्या पत्रान्वये सुधारित कार्य आदेश देण्यात आले आहे.
सन २०२५-२६ पासून राज्यातील विजाभज, इमाव व विमाप्र या प्रवर्गातील इयत्ता १ ली ते इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती/गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना महा-आयटी, मुंबई यांचेमार्फत महाडीबीटी प्रणालीद्वारे ऑनलाईन पध्दतीने राबविण्याकरिता सदर योजना महाडीबीटी प्रणालीवर ऑनबोर्ड केली असून सदर योजना महाडीबीटी प्रणालीद्वारे ऑनलाईन पध्दतीने राबविण्याच्या कार्यपध्दती निश्चीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन परिपत्रक
सन २०२५-२६ पासून राज्यातील विजाभज, इमाव व विमाप्र या प्रवर्गातील इयत्ता १ ली ते इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती/गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना महा-आयटी, मुंबई यांचेमार्फत महाडीबीटी प्रणालीद्वारे ऑनलाईन पध्दतीने राबविण्याकरिता सदर योजना महाडीबीटी प्रणालीवर ऑनबोर्ड केली असून सदर योजना
महाडीबीटी प्रणालीद्वारे ऑनलाईन पध्दतीने राबविण्याकरिता परिशिष्ट “अ” मध्ये नमूद केलेली कार्यपध्दती विहित करण्यात येत आहे.
सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेताक २०२५१११०१७०००९९९३४ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन निर्गमित करण्यात येत आहे.
शासन परिपत्रक पीडीएफ प्रत लिंक
कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

शासन परिपत्रक क्रमांक शिवृत्ती २०२१/प्र.क्र.१०३/शिक्षण-२, दिनांक १० नोंव्हेंबर, २०२५ चे
"परिशिष्ट-अ"
अ) संबंधित शाळेचे मुख्याध्यापक यांनी करावयाची कार्यवाही :-
१. संबंधित मुख्याध्यापकांनी महाडीबीटी प्रणालीवर सदरहू शाळेचे लॉगीन करावे.
२. विजाभज, इमाव व विमाप्र या प्रवर्गातील इयत्ता १ ली ते ७ वी व इयत्ता ८ वी ते १० वी मध्ये शिक्षण घेत
असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मॅट्रीकपुर्व शिष्यवृत्ती / गुणवत्ता शिष्यवृत्ती बाबतच्या विविध योजना ऑनलाईन पध्दतीने राबविताना सरल प्रणालीवर / UDISE प्रणालीवर भरण्यात आलेली सर्व विद्यार्थ्यांची सर्व माहिती अचुक असल्याची खात्री मुख्याध्यापकांनी करावी.
३. विजाभज, इमाव व विमाप्र या प्रवर्गातील इयत्ता १ ली ते ७ वी व इयत्ता ८ वी ते १० वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती / गुणवत्ता शिष्यवृत्ती बाबतच्या विविध योजनेचे अर्ज भरण्याची कार्यवाही दरवर्षी माहे नोव्हेंबर अखेरपर्यंत पूर्ण करावी.
४. महाडीबीटी प्रणालीवर भरण्यात आलेले अर्ज अनुक्रमांकानुसार (First-cum-First) वेळोवेळी संबंधित तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती यांच्याकडे छाननी करीता पुढे पाठवावे.
ब) संबंधित गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती यांनी करावयाची कार्यवाही :-
१. विजाभज, इमाव व विमाप्र या प्रवर्गातील इयत्ता १ ली ते ७ वी व इयत्ता ८ वी ते १० वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मॅट्रीकपुर्व शिष्यवृत्ती/गुणवत्ता शिष्यवृत्ती बाबतच्या विविध योजनेंचे महाडीबीटी प्रणालीवर भरण्यात आलेले अर्ज छाननी करीता संबंधित शाळेचे मुख्याध्यापक यांच्याकडून गटशिक्षणाधिकारी यांच्या लॉगीनला (Desk-१) प्राप्त झाल्यानंतर अनुक्रमांकानुसार (First-cum-First) वेळोवेळी अर्जाची छाननी करण्यात यावी.
२. महाडीबीटी प्रणालीवर प्राप्त झालेले अर्ज अपूर्ण / चुकीचे असल्यास सदरचे अर्ज संबंधित शाळेचे मुख्याध्यापक यांच्या लॉगिनला परत पाठविण्यात यावे.
३. तद्नंतर प्राप्त झालेले अर्ज अचुक / बरोबर असल्याची खात्री झाल्यानंतर सदरचे अर्ज सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण यांच्या लॉगिनला मंजूरी करीता पाठविण्यात यावे.
क) संबंधित सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण यांनी करावयाची कार्यवाहीः-
१. संबंधित गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती (Desk-१) या कार्यालयाकडून महाडीबीटी प्रणालीवर प्राप्त झालेले मॅट्रीकपुर्व शिष्यवृत्तीचे विविध योजनेचे अर्ज सहाय्यक संचालक, इतर मगास बहुजन कल्याण जिल्हा कार्यालय यांच्या (Desk-२) लॉगिनला प्राप्त झाल्यानंतर सदर आर्जाची संबंधित जिल्हयाचे कार्यालयात कामकाज हाताळणारे लिपीक निरीक्षक यांनी छाननी करावी. अर्जा सोबत उत्पन्नाचे प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र व फी रिसिट अचूक आहेत, याबाबतची खात्री करावी. तसेच मुख्यध्यापक यांनी भरलेले फी स्ट्रक्चर योग्य आहे का, हे तपासावे. सदरहू बाबी चूकीच्या असल्यास सदरचे अर्ज परत संबंधित शाळेचे मुख्याध्यापक यांच्या लॉगिनला परत पाठविण्यात यावे.
२. महाडीबीटी प्रणालीवर प्राप्त झालेले अर्ज अपूर्ण / चुकीचे असल्यास सदरचे अर्ज परत संबंधित शाळेचे मुख्याध्यापक यांच्या लॉगिनला परत पाठविण्यात यावे.
३. तद्नंतर सदरचे अर्ज अचुक / बरोबर असल्याची खात्री झाल्यानंतर सदरहू अर्ज सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण यांच्या लॉगिनला मंजूरी करीता पाठविण्यात यावे.
४. संबंधित जिल्हयाचे सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण यांच्या (Desk-२) लॉगिनला प्राप्त झालेले अर्ज अनुक्रमांकानुसार (First-cum-First) मंजूर करुन पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याकरीता महाडीबीटी प्रणालीवरुन महाआयटी यांना पाठविण्यात यावेत.
ड) संबंधित प्रादेशिक उपसंचालक, इतर मागास बहुजन कल्याण प्रादेशिक विभाग यांनी करावयाची कार्यवाहीः-
१. प्रादेशिक उपसंचालक हे महाडीबीटी प्रणालीवर मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्तीच्या विविध योजनांची जिल्हा निहाय होणाऱ्या प्रक्रियेवर अंमलबजावणी करीता नियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहतील.
ई) इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाने करावयाची कार्यवाही –
१. सदरहू मॅट्रीकपुर्व शिष्यवृत्ती करीता देयक पारित करण्याकरिता संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे हे नियंत्रण अधिकारी व लेखा अधिकारी, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे हे आहरण व संवितरण अधिकारी म्हणून काम पाहतील.
२. मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्तीकरीता शासन स्तरावरुन मंजूर करण्यात आलेली तरतूद सदरहू योजनेकरीता उघडण्यात आलेल्या बँक ऑफ बडोदा, पुणे येथील बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात यावी.
३. तद्नंतर महाडीबीटी प्रणालीवरील मंजूर करण्यात आलेल्या अर्जदार विद्यार्थ्यांना अनुक्रमांकानुसार (First-cum-First) सदरहू योजनेचा लाभ देण्याकरीता पुल अकाऊंटद्वारे निधी वर्ग करण्यात यावा.
४. संबंधित सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण यांचेकडून प्राप्त झालेल्या अर्जासोबत उत्पन्नाचे प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र व फी रिसिट अचूक आहेत, याबाबतची खात्री करावी. तसेच मुख्यध्यापक यांनी भरलेले फी स्ट्रक्चर योग्य आहे का, हे तपासावे. सदरहू बाबी चूकीच्या असल्यास सदरचे अर्ज संबंधित शाळेच्या मुख्यध्यापकांकडून सुधारीत करुन घ्यावेत.
५. संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना महाडीबीटी प्रणालीवर येणाऱ्या तांत्रीक अडचणी महा-आयटी यांचेकडे पाठपुरावा करुन सोडविण्याची कार्यवाही करण्यात येईल.
फ) महाआयटी यांनी करावयाची कार्यवाही:-
१. संबंधित सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण (Desk-२) यानी मंजूर केलल्या अर्जानुसार अनुक्रमांकानुसार (First-cum-First) पुल अकाऊंटमध्ये वर्ग करण्यात आलेल्या निधीतून पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या आधारशी लिंक असलेल्या बँक खात्यावर शिष्यवृत्तीचा थेट लाभ देण्यात यावा.
२. महा-आयटीकडे संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे यांचेकडून प्राप्त होणाऱ्या अडचणी त्यांच्या प्रतिनिधीकडून सोडवल्या जातील.
