Private Hospitals List for Reimbursement of Medical Expenses
Private Hospitals List for Reimbursement of Medical Expenses
List of Private Hospitals for Reimbursement of Medical Expenses as per Government Hospital
List of private hospitals approved by the government for admissibility of reimbursement of medical expenses as per government hospital
वैद्यकीय खर्चाची शासकीय रुग्णालयाप्रमाणे प्रतिपूर्ती अनुज्ञेयतेसाठी शासन मान्यता दिलेल्या खाजगी रुग्णालयांची यादी
महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग
शासन परिपत्रक क्र. वैखप्र-२०१३/प्र.क्र. २९१/१३/राकावि-२
जी.टी. रूग्णालय आवार, संकुल इमारत, १० मजला, बी.विंग, मंत्रालय, मुंबई
दिनांक: ११ ऑक्टोंबर, २०१३
वाचा :-
१) शासन निर्णय क्रमांक सा.आ.वि.क्र.एमएजी-२००५/९/प्र.क्र.१/आरोग्य-३, दिनांक १९ मार्च, २००५.
२) शासन निर्णय क्रमांकः सा.आ.वि.क्र.वैखप्र-२०११/प्र.क्र.३३३/११/राकावि-२, दिनांक १६ नोव्हेंबर, २०११
३) शासन निर्णय क्रमांकः सा.आ.वि.क्र.वैखप्र-२०११/प्र.क्र.३३३/११/राकावि-२, दिनांक ९ डिसेंबर, २०११.
परिपत्रक
शासकीय कर्मचा-यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीचे अधिकारांबाबत शासन निर्णय क्र. वैखप्र-२०११/प्र.क्र.३३३/११/राकावि-२, दिनांक १६ नोव्हेंबर, २०११ अन्वये सुधारित आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. सदर आदेशासोबत, शासकीय कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांनी खाजगी रुग्णालयात घेतलेल्या गंभीर व विशिष्टोपचारावरील खर्चाची शासकीय रुग्णालयांप्रमाणे प्रतिपूर्ती अनुज्ञेयतेसाठी, शासन मान्यता दिलेल्या खाजगी रुग्णालयांची अद्ययावत यादी तसेच इंडियन कॅन्सर सोसायटीच्या महाराष्ट्रातील संलग्न असलेल्या संस्था / रुग्णालयांची यादी “परिशिष्ट-अ” म्हणून प्रसिध्द करण्यात आली. मात्र सदर आदेश निर्गमित झाल्यानंतर शासनाने अजून काही खाजगी रुग्णालयांना मान्यता दिलेली असून इंडियन कॅन्सर सोसायटीने देखील महाराष्ट्रातील संलग्न असलेल्या संस्था / रुग्णालयांची अद्ययावत यादी शासनास उपलब्ध करुन दिली आहे.
२. आता या परिपत्रकान्वये, शासकीय कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांनी खाजगी रुग्णालयात घेतलेल्या गंभीर व विशिष्टोपचारावरील खर्चाची शासकीय रुग्णालयांप्रमाणे प्रतिपूर्ती अनुज्ञेयतेसाठी,दि.३१.०७.२०१३ पर्यंत शासन मान्यता दिलेल्या खाजगी रुग्णालयांची तसेच इंडियन कॅन्सर सोसायटीच्या महाराष्ट्रातील संलग्न असलेल्या संस्था / रुग्णालयांची अद्ययावत यादी सोबत “परिशिष्ट-अ” म्हणून प्रसिध्द करण्यात येत आहे.
३. या संदर्भात स्पष्ट करण्यात येते की, या शासन परिपत्रकान्वये शासन मान्यता दिलेल्या खाजगी रुग्णालयांची, तसेच इंडियन कॅन्सर सोसायटीशी संलग्न असलेल्या महाराष्ट्रातील संस्था / रुग्णालयांची जोडलेली यादी ही सुलभ संदर्भासाठी जोडण्यात आली असून ही यादी वेळोवेळी अद्ययावत देखील केली जाणार आहे. यापूर्वी उपरोक्त संदर्भाकित क्र. ३ येथील शासन निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभाग, दि. ९ डिसेंबर, २०११ अन्वये स्पष्ट केल्याप्रमाणे, केवळ सदर यादीत नाव समाविष्ट नाही या कारणास्तव शासन मान्यता मिळालेल्या खाजगी रुग्णालयातील वैद्यकीय उपचार वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी सरसकट नाकारणे योग्य होणार नाही. त्यामुळे सदर यादीत नाव समाविष्ट नसलेल्या शासन मान्यता प्राप्त खाजगी रुग्णालयातील व इंडियन कॅन्सर सोसायटीशी संलग्न असलेल्या महाराष्ट्रातील संस्था / रुग्णालयातील, वैद्यकीय खर्चाची देयके देखील प्रतिपूर्तीसाठी विचारात घ्यावीत.
सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या 🌐👉 www.maharashtra.gov.in 👈या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०१३१०११११२८५६६४१७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
(ज्ञा.ल.सुळ)
उपसचिव, महाराष्ट्र शासन
वैखप्र-2013/प्र.क्र.291/13/राकावि-2
शासन परिपत्रक क्र. वैखप्र-२०१३/प्र.क्र.२९१/१३/राकावि-२,दि.१० ऑक्टोबर, २०१३ सोबतचे परिशिष्ट “अ”
शासकीय कर्मचारी व त्यांच्या कुटूंबियांनी खाजगी रुग्णालयात घेतलेल्या गंभीर व विशिष्टोपचारावरील खर्चावरील शासकीय रुग्णालयांप्रमाणे प्रतिपूर्ती अनुज्ञेयतेसाठी शासन मान्यता दिलेल्या खाजगी रुग्णालयांची अद्ययावत यादी.
अ.क्र.
आजाराचे नांव
शासन मान्य संस्थेचे नांव
संदर्भ
शासकीय रुग्णालयानुसार वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती करण्यासाठी खाजगी रुग्णालयांची यादी