Preparatory Implementation of Maha AASTHA e HRMS System Instructions महा आस्था ई एचआरएमएस प्रणाली राबविण्याची पूर्वतयारी सूचना

Preparatory Implementation of Maha AASTHA e HRMS System Instructions

IMG 20250621 155542
Preparatory Implementation of Maha AASTHA e HRMS System Instructions

Preparatory Implementation of Maha AASTHA e HRMS System Instructions

Regarding Preparatory Implementation of Maha-AASTHA (e-HRMS) Pranali – Instructions

महा-आस्था (Maha-AASTHA) (ई-एचआरएमएस) प्रणाली राबविण्याची पूर्वतयारीबाबत – सूचना

महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग
शासन परिपत्रक क्र. संकीर्ण-२०२५/प्र. क्र. २७/मआस्था,मंत्रालय, मुंबई

दिनांक : २० जून, २०२५

प्रस्तावना :-

मा. मुख्यमंत्री महोदयांच्या १५० दिवसांच्या सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत सेवाविषयक बाबींच्या डिजीटल पोर्टलवर सेवापुस्तके अद्ययावत करणे व अधिकारी/कर्मचारी यांच्या सेवाविषयक तपशीलवार माहितीचे ऑन बोर्डिंग करणे यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे.

२. शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत प्रदान करण्यात येणारे सेवाविषयक लाभ (उदा. स्थायित्व प्रमाणपत्र, सेवेतील नियमित दिनांक, वेतनविषयक लाभ इ.) तसेच सेवानिवृत्तीविषयक लाभ(उदा. सेवानिवृत्ती वेतन, उपदान, रजा रोखीकरण इ.) वेळेवर व सुलभरित्या देणे शक्य व्हावे, याकरिता शासकीय कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती ते सेवानिवृत्ती पर्यंतच्या सेवा एकाच प्रणालीशी संलग्न करण्याचा मानस आहे. याकरीता राज्य शासकीय कर्मचारी हा केंद्रीभूत ठरवून, कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबीसंदर्भात येणाऱ्या विविध कार्यवाहींच्या प्रक्रियेचे स्वयंचलन होण्याच्या दृष्टीने, सामान्य प्रशासन विभागामार्फत ई-मानव संसाधन व्यवस्थापन प्रणाली (e-HRMS) [महा-आस्था (Maharashtra Advanced Administrative System for Transparent Human Resource Administration Maha-AASTHA)] विकसित करण्यात येत आहे. त्या अंतर्गत शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबींच्या नोंदी असणारे ई-सेवापुस्तक तयार करण्याचे नियोजित आहे. याकरीता पूर्वतयारी करणे आवश्यक असून त्यामध्ये खालील बाबी महत्त्वाच्या आहेत:-

महा-आस्था कक्षाची स्थापना करणे

महा-आस्था कक्षाने करावयाची कामे

सेवापुस्तकातील नोंदी अद्ययावत करणे

केलेल्या कामाचा अहवाल सामान्य प्रशासन विभागास वेळोवेळी सादर करणे

३. सदर प्रणाली प्रथमतः मंत्रालयीन विभाग (खुद्द) करीता विकसित करण्यात येऊन तद्नंतर ती क्षेत्रीय पातळीवर राबविण्याचे नियोजित आहे. महा-आस्था प्रणाली पूर्णपणे कार्यान्वित होण्यासाठी प्रशासकीय विभागांनी पूर्वतयारी करणे आवश्यक असून त्यासाठी पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत :-

         परिपत्रक

महा-आस्था प्रणाली सुलभरित्या व कालमर्यादेत राबविण्याकरीता मंत्रालय (खुद्द) स्तरावरावरील सर्व प्रशासकीय विभागांनी करावयाच्या कामकाजाचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे आहे :-

१. महा-आस्था कक्ष स्थापन करणे :-

महा-आस्था प्रणालीद्वारा शासकीय कर्मचाऱ्यांना सेवाविषयक लाभ वेळेवर व सुलभरित्या देण्याकरीता, मंत्रालयीन (खुद्द) विभागांनी महा-आस्था कक्ष स्थापन करुन त्याद्वारे सामान्य प्रशासन विभागाशी समन्वय, प्रणालीशी संलग्न बाबींची विभागांतर्गतची पूर्वतयारी व तद्संबंधित कामे पुढील काळात कक्षाकडून करणे अपेक्षित आहेत.

  1. प्रत्येक मंत्रालयीन (खुद्द) विभागांनी त्यांच्या उपलब्ध मनुष्यबळातून “महा-आस्था” हा स्वतंत्र

कक्ष कायमस्वरुपी स्थापन करावा.

॥. महा-आस्था कक्षाची रचना :-

सदर कक्षाची सर्वसाधारण रचना खालीलप्रमाणे असावी :-

सह / उप सचिव (आस्थापना)

अवर सचिव/ कक्ष अधिकारी (आहरण व

संवित्तरण अधिकारी)

सहायक कक्ष अधिकारी

लिपिक-टंकलेखक

शिपाई

Ⅲ. महा-आस्था कक्षात मंत्रालयीन (खुद्द) विभागाची आस्थापना हाताळणारे सह सचिव/उप सचिव यांची नोडल अधिकारी म्हणून तसेच इतर आवश्यक कर्मचारी यांची उपरोक्तप्रमाणे नेमणूक करण्यात यावी. नोडल अधिकारी हे सामान्य प्रशासन विभागाकरीता Single Point of Contact (SPOC) म्हणून कामकाज पाहतील.

नियुक्त केलेल्या नोडल अधिकारी यांचे नाव, पदनाम, ई-मेल व भ्रमणध्वनी क्रमांकासह कक्षाच्या स्थापनेचे आदेश सामान्य प्रशासन विभागास

gad.maha aastha@mah.gov.in

या ई-मेलवर ” (विभागाचे नाव) महा-आस्था कक्षाचे गठनाचे आदेश”, असा विषय नमूद करुन दि. ३० जून, २०२५ पर्यंत पाठवावेत.

२. महा-आस्था कक्षाने करावयाची कामे :-

  1. कक्षाकरिता ई-मेल आयडी तयार करणे :-
  2. सदर कक्षाकरीता स्वतंत्र ई-मेल आयडी घेण्यात यावा. ई-मेल आयडी तयार करताना सर्व मंत्रालयीन विभागांमध्ये एकसुत्रीपणा राहण्याच्या दृष्टीने प्रत्येक विभागाने maha-aastha@mah.gov.in असा ई-मेल आयडी तयार करावा. यामध्ये विभागाचे नाव संक्षिप्त ठेवण्यात यावे.
    उदा. home.maha-aastha@mah.gov.in, health.maha-aastha@mah.gov.in
    ii. मंत्रालयीन (खुद्द) विभागामधील अधिकारी/कर्मचारी, हे ई-ऑफिस प्रणालीवर कार्यरत आहेत, याची खातरजमा करावी.
    iii. मंत्रालयीन (खुद्द) विभागातील ज्या कर्मचाऱ्यांकडे शासकीय ई-मेल आयडी अद्याप उपलब्ध नाहीत, अशा सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे शासकीय ई-मेल आयडी उपलब्ध करुन घेण्यात यावेत. याचा उद्देश प्रामुख्याने महा-आस्था प्रणालीचा वापर करण्यासाठी होणार आहे.
    iv. मोठया प्रमाणात ई-मेल आयडी घेण्याकरीता सविस्तर मार्गदर्शन एनआयसीच्या https://palghar.gov.in/govmail/ या URL वर उपलब्ध करण्यात आले आहे.
    ॥. मंत्रालयीन (खुद्द) विभागाच्या प्रशासकीय संरचनेचा तक्ता (Organogram) तयार करणे :-
    प्रत्येक मंत्रालयीन (खुद्द) विभागाने त्यांच्या मंजूर आकृतीबंधानुसार कार्यालय प्रमुखांपासून निम्नतम स्तरापर्यंत गट व संवर्गनिहाय आवश्यक तपशील परिशिष्ट “अ” प्रमाणे Excel Format मध्ये इंग्रजीत तयार करावा. सदर माहिती नोडल अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने सामान्य प्रशासन विभागास gad.maha-aastha@mah.gov.in या ई-मेलवर “……. (विभागाचे नाव) यांचे महा-आस्था कक्षाच्या प्रशासकीय संरचनेचा तक्ता”, असा विषय नमूद करुन दि.३० जून, २०२५ पर्यंत सादर करावी. यासंदर्भातील उदाहरण म्हणून काही नोंदी परिशिष्ट-अ मध्ये दर्शविल्या आहेत.
    सेवापुस्तकातील नोंदी अद्ययावत करणे व सेवापुस्तक सुस्थितीत ठेवणे :-
  3. आहरण व संवितरण अधिकाऱ्यासमवेत (DDO) समन्वय साधून मंत्रालयीन प्रशासकीय विभागातील सर्व अधिकारी/कर्मचारी यांच्या सेवापुस्तकातील दिनांक १५ जुलै, २०२५ पर्यंतच्या सर्व नोंदी अद्ययावत करण्याची कार्यवाही करावी.
    . सेवापुस्तकात नोंदविल्या जाणाऱ्या अनिवार्य व इतर बाबींचा तपशील परिशिष्ट “ब” मध्ये अनुक्रमे भाग-१ व भाग-२ मध्ये नमूद करण्यात
    आला आहे. त्यानुसार, कर्मचारीनिहाय त्यास लागू असणाऱ्या बाबींची माहिती अद्याप सेवापुस्तकात नोंदविलेली नसल्यास, आवश्यक असेल तेथे, विभागाने यथोचित आदेश निर्गमित करुन, आहरण व संवितरण अधिकारी यांनी सेवापुस्तकात त्याची नोंद घ्यावी. तसेच नोंदीच्या अनुषंगाने निर्गमित केलेले आदेश, अभिलेख, प्रमाणपत्र इ. सेवापुस्तकास जोडून ठेवण्यात यावेत.
    iii. परिशिष्ट-ब मधील भाग-१ व भाग-२ मध्ये नमूद नोंदी व अभिलेख कर्मचाऱ्याकडून तपासून त्यांच्याशी संबंधित सर्व नोंदी प्रतिबिंबित झाल्या असल्याबाबत व त्या अभिप्रमाणित (Authentic) असल्याबाबत संबंधित कर्मचाऱ्याकडून खातरजमा करुन घ्यावी व या सर्व नोंदी सेवापुस्तकात झाल्याबाबत आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने प्रमाणित करावे.
    विभागातील एकूण सेवापुस्तकांपैकी पूर्ण झालेल्या सेवापुस्तकाची संख्यात्मक माहिती दर सोमवारी सामान्य प्रशासन विभागास gad.maha-aastha@mah.gov.in या ई-मेलवर पाठविण्यात यावी.
    iv. विभागांनी सद्यस्थितीत सेवापुस्तके स्कॅनिंग करु नयेत. याबाबत स्वतंत्रपणे सूचना निर्गमित करण्यात येतील.
    V. सर्व सेवापुस्तकांचे स्कॅनिंग सुलभ होण्याच्या दृष्टीने सेवापुस्तके सुस्थितीत (उदा. फाटलेल्या अथवा खराब पानांची दुरुस्ती करणे इ.) ठेवण्याची कार्यवाही प्राथम्याने करण्यात यावी.
    ३. केलेल्या कामाकाजाचा नियमित अहवाल सादर करणे :-
  4. महा-आस्था प्रणाली राबविण्याबाबतच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने विभागांनी करावयाच्या कामाचे वेळापत्रक सोबत जोडलेल्या परिशिष्ट “क” मध्ये नमूद केले आहे.
    II. सदर वेळापत्रकानुसार कामाच्या पूर्णत्वाचा नियमित अहवाल नोडल अधिकारी यांनी सामान्य प्रशासन विभागास gad.maha-aastha@mah.gov.in या ई-मेलवर सादर करावा.
    सदर कार्यवाही करताना काही अडचणी/समस्या उद्भवल्यास त्याकरीता संबंधित प्रशासकीय विभागाने नामनिर्देशित केलेल्या नोडल अधिकाऱ्यांनी श्री. प्रशांत बडगेरी, सह सचिव, सामान्य प्रशासन विभाग, यांच्याशी gad.maha-aastha@mah.gov.in या ई-मेल वर संपर्क साधावा.

शासन परिपत्रक क्रमांकः संकीर्ण-२०२५/प्र. क्र. २७/मआस्था
प्रस्तुत परिपत्रक, महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून, त्याचा संकेतांक २०२५०६२०१५१६५८०१०७असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकीत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सह सचिव, महाराष्ट्र शासन

IMG 20250621 154739
Preparatory Implementation of Maha AASTHA e HRMS System Instructions

Leave a Comment

error: Content is protected !!