प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची सेवाज्येष्ठता नियम परिपत्रक
Prathamik Madhyamik Shikshak Sevajeshthata Niyam
Prathamik Madhyamik Shikshak Sevajeshthata Niyam
महाराष्ट्र शासन
शिक्षण संचालनालय
(माध्यमिक व उच्च माध्यमिक)
महाराष्ट्र राज्य, मध्यवता इमारत,
डॉ. अॅनी बेझंट मार्ग, पहिला मजला,
पुणे ४११ ००१
क्रमांक : शिसंमा/२०२४/७०१/मा.अ./टी-३ | 252 दिनांक : 12 JAN 2024
प्रति,
श्री. भारत सदाशिव पाटणे, विश्वंभर रेसिडेन्सी, अं-१०, माणिकबाग, वाडेकर नर्सिंग होमसमोर, सिंहगड रोड, पुणे-४११०५१.
विषय : माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत मागविलेली माहिती.
उपरोक्त विषयाचे अनुषंगाने आपला माहिती अधिकारातंर्गत अर्ज संदर्भाधीन पत्रान्वये या कार्यालयास दिनांक ०७/१२/२०२३ रोजी प्राप्त झालेला आहे. सदर माहिती अधिकार अर्जान्वये माध्यमिक शाळेतील एसएसी डी.एड. खाजगी अनुदानित शाळेत नियुक्त शिक्षकाला क प्रवर्गात येण्यासाठीच्या अटी / अहंता (शैक्षणिक) धारण करणे आवश्यक आहे याबाबतची माहिती मिळणेबाबत मागणी केली आहे. सदर माहिती अधिकार अर्जान्वये माहितीच्या अनुषंगाने कळविण्यात येतं की, शालेय शिक्षण विभाग, शासन अधिसूचना क्रमांक : संकीर्ण -२०१६/प्र.क्र.३२०/टिएनटि-१, प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची सेवाज्येष्ठता नियम परिपत्रक दि. २४/०३/२०२३ अनुसार बी.ए./बी.एससी/बी.कॉम. डिप. टी. (दोन वर्षाचा जुना पाठ्यक्रम), डी.एड. (दोन वर्षाचा जुना पाठ्यक्रम) ही अर्हता धारण करणारे प्रवर्ग क मध्ये समाविष्ट होतात. तसेच शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण २०१६/प्र.क्र.३२०/ टीएनटी-१, दिनांक ०३ मे २०१९ मधील तरतुदीनुसार खाजगी शाळेतील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची सेवाज्येष्ठता महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१, नियम १२ मधील अनुसूची फ मधील तरतुदीनुसार निश्चित करावी. मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार माध्यमिक शाळांतील शिक्षकांची संवाज्येष्ठता संबंधित शिक्षक त्या त्या प्रवर्गात समावेश झाल्याच्या दिनांकापासून ठरविण्यात यावी असे नमूद आहे.
(नितीन क्षिरसागर)
जनमाहिती अधिकारी
शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक)
महाराष्ट्र राज्य, पुणे