PM POSHAN Funds Distribution
PM POSHAN Funds Distribution
पंतप्रधान पोषण निधी वितरण
PM Poshan Nidhi Vitaran
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण (PM-POSHAN) योजनेतंर्गत सर्वसाधारण घटकांतर्गत निधी वितरणाबाबत… (सन २०२४-२५)
Regarding the distribution of funds under the general component under the Pradhan Mantri Poshan Shakti Nirman (PM-POSHAN) scheme… (Year 2024-25)
दिनांक: १८ मार्च, २०२५
वाचा:-
१) केंद्र शासनाचे आदेश क्र.प्र. क्र.३-४/२०२३-Desk (PMP) दि.२२ मार्च, २०२४.
२) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. शापोआ-२०२३/प्र.क्र.१८४/एस.डी.३. दि.२२ मार्च, २०२४.
३) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. शापोआ-२०२३/प्र.क्र.१८४/एस.डी.३. दि.०८ मे, २०२४.
४) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. शापोआ-२०२३/प्र.क्र.९२/एस.डी.३. दि.१४ ऑगस्ट, २०२४.
५) केंद्र शासन आदेश क्र.F.No.३-४/२०२४-PMP-५, दि.२७ सप्टेंबर, २०२४.
६) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. शापोआ-२०२४/प्र.क्र.१२५/एस.डी.३. दि.०७ ऑक्टोंबर, २०२४.
७) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. शापोआ-२०२४/प्र.क्र.१२५/एस.डी.३, दि.१० ऑक्टोंबर, २०२४.
८) वित्त विभाग, शासन परिपत्रक क्र. अर्थसं २०२४/प्र.क्र.१०८/अर्थ-३. दि.०८ जानेवारी, २०२५.
९) वित्त विभाग, शासन परिपत्रक क्र.अर्थसं २०२४/प्र.क्र. ८०/अर्थ -३. दि.१२ फेब्रुवारी, २०२५.
१०) केंद्र शासन आदेश क्र.F.No.३-४/२०२४-PMP-५, दि. १७ फेब्रुवारी, २०२५.
११) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.शापोआ-२०२४/प्र.क्र.१२५/एस.डी.३. दि.२० फेब्रुवारी, २०२५.
१२) केंद्र शासन आदेश क्र.F.No.३-४/२०२४-PMP-५, दि.१५ मार्च, २०२५.
प्रस्तावना :
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत केंद्र शासनाने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातील मंजूर केंद्र हिस्स्याच्या निधीमधील पहिल्या हप्त्याचा रु.११६२२.२८ लक्ष इतका निधी दि.२७ सप्टेंबर, २०२४ रोजीच्या आदेशान्वये तसेच, दुसऱ्या हप्त्याचा रु.११६२२.२८ लक्ष इतका निधी दि.१७ फेब्रुवारी, २०२५ रोजीच्या आदेशान्वये राज्य शासनास उपलब्ध करुन दिला होता. सदरप्रमाणे केंद्र व राज्य हिस्स्याचा घटकनिहाय निधी वितरीत करण्यात आला आहे. सद्यस्थितीत सदर योजनेंतर्गत दि.१५ मार्च, २०२५ रोजीच्या आदेशान्वये केंद्र शासनामार्फत तिसऱ्या हप्त्याचा केंद्र हिस्स्याचा रु.२८९८५.८६ लक्ष इतका निधी राज्य शासनास उपलब्ध करुन दिला आहे. सदर निधीची विगतवारी सर्वसाधारण आणि अनुसूचित जाती या घटकांतर्गत केली आहे. उपरोक्त केंद्र हिस्स्याच्या निधीपैकी सर्वसाधारण घटकांतर्गत केंद्र हिस्स्याचा रु.२५३३३.६४ लक्ष इतका निधी आहे. त्यानुषंगाने सर्वसाधारण घटकांतर्गत केंद्र हिस्स्याचा रु.२५३३३.६४ लक्ष व राज्य हिस्साचा रु.१४९८३.२४ लक्ष असा एकूण रु.४०३१६.८८ लक्ष इतका निधी वितरणाची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णयः-
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेसाठी सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पिय तरतूदीमधून सर्वसाधारण घटकांतर्गत केंद्र व राज्य हिस्सा मिळून रु.४०३१६.८८ लक्ष (रुपये चारशे तीन कोटी सोळा लक्ष अठ्ठयाऐंशी हजार फक्त) इतका निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
२. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या शासन परिपत्रक दि.०८ जानेवारी, २०२५, दि.१२ फेब्रुवारी, २०२५ व दि.१७ मार्च, २०२५ अन्वये दिलेल्या सूचनांनुसार निर्गमित करण्यात येत आहे.
३. सदर निधी खर्च करताना केंद्र शासनाच्या दि.१५ मार्च, २०२५ रोजीच्या निधी वितरण आदेशामध्ये नमूद केलेल्या अटी व शर्तीचे तंतोतंत पालन करण्यात यावे. तसेच, सदर आदेशामधील अनु.क्र.३(v) मध्ये नमूद केलेली माहिती तात्काळ केंद्र व राज्य शासनास पाठविण्याची दक्षता शिक्षण संचालक (प्राथ.), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी घ्यावी.
४. सदर निधी केंद्र व राज्य शासनने वेळोवळी दिलेले निर्देश/आदेश/शासन निर्णय/परिपत्रक/सूचना यांना अनुसरुन विहित कालावधीत खर्च करण्याची दक्षता शिक्षण संचालक (प्राथ.) महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी घेण्यात यावी. तसेच, सदर निधी खर्च केल्यानंतर याबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र शासनास सादर करावे.
५. प्रस्तुत निधीच्या उपयोजनाकरीता आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांना नियंत्रण अधिकारी तसेच, राज्य समन्वय अधिकारी, प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजना, स्वतंत्र कक्ष, पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.
६. प्रस्तुत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५०३१८१५०४५९५०२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
अवर सचिव, महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांकः शापोआ-२०२४/प्र.क्र.१२५/एस.डी.३, मंत्रालय, मुंबई
योजनेतंर्गत अनुसूचित जाती उपयोजनांतर्गत
निधी वितरणाबाबत… (सन २०२४-२५)
दिनांक: १८ मार्च, २०२५
वाचा:-
१) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. शापोआ-२०२३/प्र.क्र.१८४/एस.डी.३. दि.०८ मे, २०२४.
२) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. शापोआ-२०२३/प्र.क्र.९२/एस.डी.३, दि. १४ ऑगस्ट, २०२४.
३) केंद्र शासन आदेश क्र.F.No.३-४/२०२४-PMP-५, दि.२७ सप्टेंबर, २०२४.
४) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. शापोआ-२०२४/प्र.क्र.१२६/एस.डी.३. दि.०७ ऑक्टोंबर, २०२४.
५) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. शापोआ-२०२४/प्र.क्र.१२६/एस.डी.३, दि.१० ऑक्टोंबर, २०२४.
६) वित्त विभागाचे परिपत्रक क्र. अर्थसं २०२४/प्र.क्र.१०८/अर्थ-३, दि.०८ जानेवारी, २०२५.
७) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन परिपत्रक क्र.बीयुडी-२०२५/ प्र.क्र.५/अर्थसंकल्प, दि.२० जानेवारी, २०२५.
८) वित्त विभागाचे परिपत्रक क्र. अर्थसं २०२४/प्र.क्र.८०/अर्थ-३, दि.१२ फेब्रुवारी, २०२५.
९) केंद्र शासनाचे आदेश क्र. प्र. क्र.३-४/२०२४-Desk (PMP-५) दि.१७ फेब्रुवारी, २०२५.
१०) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. शापोआ-२०२४/प्र.क्र.१२६/एस.डी.३, दि.२० फेब्रुवारी, २०२५.
११) केंद्र शासनाचे आदेश क्र. प्र. क्र.३-४/२०२४-Desk (PMP-५) दि. १५ मार्च, २०२५.
प्रस्तावना :
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत केंद्र शासनाने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातील मंजूर केंद्र हिस्स्याच्या निधीमधील पहिल्या हप्त्याचा रु.११६२२.२८ लक्ष इतका निधी संदर्भाधिन दि.२७ सप्टेंबर, २०२४ रोजीच्या आदेशान्वये तसेच, दुसऱ्या हप्त्याच्या रु.११६२२.२८ लक्ष इतका निधी दि.१७ फेब्रुवारी, २०२५ रोजीच्या आदेशान्वये राज्य शासनास उपलब्ध करुन दिला होता.
सदरप्रमाणे केंद्र व राज्य हिस्सयाचा निधी वितरीत करण्यात आला आहे. सद्यस्थितीत सदर योजनेंतर्गत संदर्भाधिन दि. १५ मार्च, २०२५ रोजीच्या आदेशान्वये केंद्र शासनामार्फत तिसऱ्या हप्त्याचा केंद्र हिस्स्यचा रु.२८९८५.८६ लक्ष इतका निधी राज्य शासनास उपलब्ध करुन दिला आहे. सदर निधीची विगतवारी सर्वसाधारण आणि अनुसूचित जाती उपयोजना या घटकांतर्गत केली आहे. उपरोक्त केंद्र हिस्स्याच्या निधीपैकी अनुसूचित जाती उपयोजनांतर्गत केंद्र हिस्स्याचा रु.३६५२.२२ लक्ष इतका निधी आहे. त्यानुषंगाने अनुसूचित जाती उपयोजनांतर्गत केंद्र हिस्स्याचा रु.३६५२.२२ लक्ष व राज्य हिस्साचा रु.२१६०.०६ लक्ष असा एकूण रु.५८१२.२८ लक्ष इतका निधी वितरणाची वाव शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णयः-
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेसाठी सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पिय तरतूदीमधून अनुसूचित जाती उपयोजनांतर्गत केंद्र व राज्य हिस्सा मिळून रु.५८१२.२८ लक्ष (रुपये अठ्ठावन्न कोटी बारा लक्ष अठ्ठावीस हजार फक्त) इतका निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
२. सदरचा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन परिपत्रक क्र.बीयुडी-२०२५/प्र.क्र.५/अर्थसंकल्प, दि. २० जानेवारी, २०२५ अन्वये तसेच, वित्त विभागाच्या शासन परिपत्रक दि.०८ जानेवारी, २०२५, दि.१२ फेब्रुवारी, २०२५ व दि.१७ मार्च, २०२५ अन्चये दिलेल्या निर्देशानुसार निर्गमित करण्यात येत आहे..
३. सदर निधी खर्च करताना केंद्र शासनाच्या दि.१५ मार्च, २०२५ रोजीच्या निधी वितरण आदेशामध्ये नमूद केलेल्या अटी व शर्तीचे तंतोतंत पालन करण्यात यावे. तसेच, सदर आदेशामधील अनु.क्र.३(v) मध्ये नमूद केलेली माहिती तात्काळ केंद्र व राज्य शासनास पाठविण्याची दक्षता शिक्षण संचालक (प्राथ.), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी घ्यावी.
४. प्रस्तुत निधीच्या उपयोजनाकरीता आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांना नियंत्रण अधिकारी तसेच, राज्य समन्वय अधिकारी, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना, स्वतंत्र कक्ष, पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.
५. सदर निधी केंद्र व राज्य शासनने वेळोवळी दिलेले निर्देश/आदेश/शासन निर्णय/परिपत्रक/सूचना यांना अनुसरुन विहित कालावधीत खर्च करण्याची दक्षता शिक्षण संचालक (प्राथ.) महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी घेण्यात यावी. तसेच, सदर निधी खर्च केल्यानंतर याबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र शासनास सादर करावे.
६. प्रस्तुत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५०३१८१५०८०९२५२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
अवर सचिव, महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शासन निर्णय क्रमांकः शापोआ-२०२४/प्र.क्र.१२६/एस.डी.३ मंत्रालय, मुंबई