Permanent identity card for family pensioners
Permanent identity card for family pensioners
कुटुंबनिवृत्तिवेतनधारकांना कायमस्वरूपी ओळखपत्र देणेबाबत……
महाराष्ट्र शासन
वित्त विभाग
शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण २०२५/प्र.क्र.४४/२०२५/कोषा प्रशा ५ मंत्रालय, मुंबई
दिनांक: १६ जुलै, २०२५
वाचा
१. शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: संकीर्ण १०९९/१२२०/१८ (र. व का.), दि. २८.०७.२०००
२. शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक संकीर्ण २०१६/प्र.क्र.१८३/१८ (र. व का.), दि. २३.०२.२०१७
३. शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक संकीर्ण २०१६/प्र.क्र.१८३/१८ (र. व का.), दि. २३.०६.२०१७
४. संचालनालय लेखा व कोषागारे कार्यालयाचे पत्र क्र. संलेवको २०२५/व.ले./निवृत्तीवेतन (संणकीकरण)/१३६/१११/२०२५/२७२४ दि.२६ जून, २०२५.
प्रस्तावनाः-
शासन सेवेत असताना शासकीय कर्मचाऱ्यांना ओळखपत्रे देण्यात येतात. शासन सेवेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर वाचा येथे नमूद परिपत्रकांतील तरतूदीनुसार सेवानिवृत्त अधिकारी /कर्मचारी यांना कायमस्वरूपी ओळखपत्रे देण्यात येतात व त्याबाबत सूचना, कार्यपध्दती व ओळखपत्राचा नमुना विहित करण्यात आला आहे.
त्या धर्तीवर मयत शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचे कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांना शासकीय रुग्णालयातील औषधोपचार, ज्येष्ठ नागरिक म्हणून रेल्वे, बँका, इ. ठिकाणी उपयोग करण्याबरोबरच शासकीय सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांचे कुटुंबनिवृत्तिवेतनधारक म्हणून त्यांना समाजात सन्मानाची वागणूक मिळण्याच्या दृष्टीने ओळखपत्र देणे आवश्यक आहे. तसेच सर्वसाधारण वापराकरीता कुटुंबनिवृत्तिवेतनधारकांना कायमस्वरूपी ओळखपत्र देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. यासंदर्भात काही सेवानिवृत्तीवेतनधारकांच्या संघटना, संस्थांनी सुध्दा मागणी केली आहे. त्यास अनुसरुन खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहेत.
शासन परिपत्रक
१. कुटुंब निवृत्तिवेतनधारक ज्या जिल्हा कोषागार कार्यालयामधून कुटुंब निवृत्तिवेतन घेत आहेत अथवा घेण्याकरीता कार्यवाही सुरू आहे, त्या संबंधित जिल्हा कोषागार कार्यालय यांनी कुटुंब निवृत्तीवेतन सुरू झाल्यानंतर सदर कायमस्वरूपी ओळखपत्र फोटोसह जोडपत्र “अ” येथील विहीत नमुन्यात देण्याची कार्यवाही करावी.
२.कुटुंबनिवृत्तिवेतनधारकांनी लिखित मागणी सादर केल्यानंतर सदर ओळखपत्र देण्यात यावे.
३. जिल्हा कोषागार कार्यालयाने ओळखपत्र दिल्याबाबत स्वतंत्र नोंदवहीत नोंद घेऊन निवृत्तिवेतनवाहिनी प्रणालीमध्ये तशी नोंद घ्यावी.
४.कुटुंबनिवृत्तिवेतनधारक यांनी जिल्हा कोषागार कार्यालय, बैंक शाखा, इ. बदलण्याची मागणी केल्यास म्हणजेच अन्य जिल्ह्यामध्ये कुटुंबनिवृत्तिवेतन घेण्यासाठी अर्ज केल्यास यापूर्वी दिलेले ओळखपत्र परत घेण्यात यावे.
५. अन्य जिल्ह्यामध्ये कुटुंबनिवृत्तिवेतन सुरू झाल्यानंतर त्या जिल्हा कोषागार कार्यालयाने कुटुंबनिवृत्तीवेतनधारकाच्या लिखित मागणीनुसार नव्याने ओळखपत्र द्यावे आणि ओळखपत्र दिल्याबाबत स्वतंत्र नोंदवहीत नोंद घेऊन निवृत्तिवेतनवाहिनी प्रणालीमध्ये नोंद घ्यावी.
६. ओळखपत्र निर्गमित करण्यापूर्वी ओळखपत्राच्या मागील बाजूस महाराष्ट्र शासनाच्या गोल शिक्क्याची मोहोर उमटवावी.
७. उक्त प्रयोजनार्थ ओळखपत्र तयार करुन वितरीत करण्याकरीता शासनास येणाऱ्या खर्चाची प्रतिपूर्ती संबंधित कुटुंब निवृत्तिवेतनधारकांकडून करण्याची विनंती बृहन्मुंबई पेन्शनर्स असोसिएशन या संस्थेने केली आहे. त्याबाबतची रितसर पावती संबंधित कोषागार कार्यालयाकडून घेण्यात यावी. यासंदर्भात सविस्तर कार्यपध्दती संचालक, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य हे विहित करतील.
८. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संकेतांक २०२५०७१६११३५१०७३०५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
शासन निर्णय या ओळीला स्पर्श करून पीडीएफ मध्ये प्राप्त करा
शासनाचे उप सचिव,