Partition Horrors Remembrance Day
Partition Horrors Remembrance Day
दिनांक १४ ऑगस्ट, २०२५ हा दिवस “फाळणी दुःखद स्मृती दिन” (Partition Horrors Remembrance Day) म्हणून पालन करण्याबाबत.
दिनांक:- १४ ऑगस्ट, २०२५.
परिपत्रक
भारत सरकारतर्फे दरवर्षी १४ ऑगस्ट हा दिवस, सन १९४७ मध्ये भारताच्या फाळणीदरम्यान लाखो लोकांनी अनुभवलेल्या दुःख, आघात व विस्थापनाचे स्मरण करण्यासाठी “फाळणी दुःखद स्मृती दिन’ म्हणून पालन करण्यात येतो. हा दिवस फाळणीच्या प्रचंड मानवी नुकसानाची आठवण करून देतो आणि शांतता, एकता आणि सलोखा या मूल्यांना प्रोत्साहन देण्याचा उद्देश ठेवतो. संस्कृती मंत्रालय, भारत सरकार देशभरात अर्थपूर्ण आणि सहभागी उपक्रमांद्वारे हा दिवस पालन करत आहे.
भारत सरकारने गेल्या तीन वर्षात देशभरात राष्ट्रीय चर्चासत्रे, चित्रपट प्रदर्शन, मूक मोर्चा आणि विभाजन पीडीतांच्या संवाद सत्रांचे आयोजन केले आहे. यासर्व उपक्रमांना लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे आणि आपली सामूहिक वचनबद्धता अधोरेखित झाली आहे की आपण या विभाजनाच्या बारशाचे स्मरण ठेवतो आणि त्याला सन्मान देतो.
२. यानुषंगाने भारत सरकारने दि. १४ ऑगस्ट २०२५ रोजी देशभरात अनेक स्मरणार्थ उपक्रम राबवून “फाळणी दुःखद स्मृती दिन २०२५” पालन करण्याचा निर्णय घेतला आहे.
Also Read – महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये विभाजन विभीषिका स्मृती दिन साजरा करणेबाबत परिपत्रक वाचा या ओळीला स्पर्श करून
३ भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने विभाजनग्रस्त लोकांच्या वेदनाचे दर्शन घडवणारे एक डिजिटल प्रदर्शन तयार केले आहे. हे प्रदर्शन
(डाउनलोड मेनू) या बेबसाइटवरून डिजिटल स्वरूपात (इंग्रजी आणि हिंदी दोन्हींमध्ये) डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश जनतेमध्ये, विशेषतः तरुण पिढी आणि विद्यार्थ्यांमध्ये, फाळणीमुळे झालेल्या दुःखद वास्तवांबद्दल आणि मानची दुःखाबद्दल जागरूकता निर्माण करणे आहे.
४. यासंदर्भात राज्य सरकारला दि.१४ ऑगस्ट २०२५ रोजी फाळणी दुःखद स्मृती दिनानिमित्त हे प्रदर्शन सन्मानपूर्वक व संवेदनशीलतेने प्रदर्शित करण्याची विनंती करण्यात आली आहे.
५. यानुषंगाने सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना विनंती करण्यात येते की, सदरचा स्मृती दिवस विभागीय स्तरावर / जिल्हा स्तरावर पालन करण्यात यावा. परिच्छेद 3 मध्ये नमूद माहितीचा उपयोग करुन “फाळणी स्मृती दिना वर आधारित प्रदर्शन महत्वाच्या ठिकाणी ज्याठिकाणी मोठ्या संख्येने लोक सदर प्रदर्शन पाहू शकतील अशा ठिकाणी लावण्यात यावे. सदर प्रदर्शन हे गांभीर्यतापूर्वक व संयमाने प्रदर्शित करावे. विशेषतः समाजातील एखाद्या घटकाच्या/गटाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची विशेषत्वाने काळजी घ्यावी. प्रत्येक जिल्हयाच्या मुख्यालयात दिनांक १४ ऑगस्ट, १९४७ रोजीच्या घडामोडींबाबत वर्तमानपत्रातील कात्रणे/नियतकालिके उपलब्ध करुन घेऊन तसेच दि. १४ ऑगस्ट, १९४७ रोजी झालेल्या घडामोडी व ज्या लोकांचे त्यादिवशी बलिदान झाले आहे त्या व्यक्तींविषयी अथवा समूहाविषयी माहिती प्रदर्शित करुन त्याचे प्रदर्शन भरविण्यात यावेत.
६. उक्त प्रदर्शनाच्या कार्यक्रमाकरिता आदर्श कार्यप्रणाली (Standard Operating Procedure-SOP) निश्चित केली असून त्याची इंग्रजी भाषेतील सूची व परिपत्रक सोबत जोडण्यात आले आहे. त्याची माहिती थोडक्यात खालीलप्रमाणे आहे:-
प्रदर्शनाकरिता महत्वाच्या सूचनाः-
१) सदर प्रदर्शन महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणी उदा. Banks, Post Offices, Railway stations (रेल्वे स्थानके), Airports (विमानतळ), Shopping Mall, Educational Institutes (शैक्षणिक संस्था), Petrol Pump. Skill Development Center (कौशल्य विकास केंद्र) / Vocational Training Institute (व्यावसायिक प्रशिक्षण संस्था) इत्यादी ठिकाणी भरवण्यात यावे.
२) जास्तीत जास्त प्रसिध्दी, दर्शनीयता आणि प्रवर्धन याकरिता अधिकाधिक प्रयत्न करावेत.
३) प्रदर्शन, Digital Media याद्वारे देखील शाळा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये करता येऊ शकेल.
४) कार्यक्रमामध्ये स्वातंत्र्यसैनिक, महत्त्वाचे वरिष्ठ नागरिक, जन प्रतिनिधी यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्याचाबत विनंती करावी.
५) उद्घाटनाच्यावेळी राष्ट्रभक्तीपर गीते लावावी. प्रसार माध्यमांना कळविण्यात यावे. फाळणीने बाधित झालेल्या व्यक्तींना प्रदर्शनात बोलाविण्यात यावे. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात यावा. प्रदर्शनाच्या ठिकाणी आवश्यकतेनुसार सुरक्षा व्यवस्था करावी.
६) सदर प्रदर्शन गांभीर्य व संयमाने आयोजित करावयाचे आहे. अन्य कोणत्याही समुदायाच्या/समाज घटकाच्या अन्य कोणत्याही समुदायाच्या भावनांना न दुखावता फाळणीची शोकांतिका आणि जनसामान्यांचे दुःख प्रकट करण्याच्या दृष्टीने हे परिपत्रक आहे ही बाब लक्षात घ्यावी. तसेच सदरचा कार्यक्रम संपूर्ण राज्यात पाळणे आवश्यक आहे.
वरील सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे व हे प्रदर्शन यशस्वीरित्या राबवावे.
सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२५०८१४१४३०३८२२०७ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,
अवर सचिव, महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्र. सीईआर-२०२५/प्र.क्र. २७३/राशि-१ मंत्रालय, मुंबई. ४०० ०३२.