Participation of D El Ed Students In ULLAS Nav Bharat Saksharta Abhiyan
Participation of D El Ed Students In ULLAS Nav Bharat Saksharta Abhiyan
Participation of D El Ed Students For Effective Implementation Of ULLAS Nav Bharat Saksharta Abhiyan
Participation of D El Ed Trainee students for effective implementation of ULLAS Nav Bharat Literacy Program
Regarding the participation of D.El.Ed. Chatradhyapak for the effective implementation of ULLAS- Nav Bharat Literacy Program
जा.क्र. राशैसंप्रपम/SCL/ असाक्षर स्वयंसेवक नोंदणी/२०२५-२६
विषय :- ‘ULLAS- नव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या’ प्रभावी अंमलबजावणीसाठी D.El.Ed. छात्राध्यापकांचा सहभाग घेणेबाबत…
संदर्भ :- १. शिक्षण संचालनालय (योजना) येथे आयोजित ‘ULLAS- नव भारत साक्षरता कार्यक्रम’ अंमलबजावणी कामकाज आढावा बैठकीचे प्राप्त इतिवृत्त दि.०३-०७-२०२५.
उपरोक्त संदर्भीय विषयान्वये, ‘ULLAS’ नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत, १५ वर्षापुढील असाक्षर व्यक्तींना साक्षर करण्याचे राष्ट्रीय कार्य सुरु आहे. या कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी, सर्व अध्यापक विद्यालयातील D.EL.Ed. छात्राध्यापकांचा सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
या कार्यक्रमांतर्गत छात्राध्यापकांनी, प्रतिवर्षी किमान ३ असाक्षरांची माहिती संकलन करणे व नजीकच्या शाळेत स्वतःची ‘स्वयंसेवक’ म्हणून नोंदणी करून, असाक्षरांना साक्षर करण्याच्या, या राष्ट्रीय कार्यात योगदान द्यावे,
यासंदर्भात आपल्या स्तरावरून बैठकीचे आयोजन करून, आपल्या अधिनस्त सर्व प्राचार्य, अध्यापक विद्यालय यांना आवाहन करण्यात यावे, तसेच असाक्षरांच्या अध्ययन अध्यापनाबाबत मार्गदर्शन करावे व उपलब्ध अध्ययन-अध्यापन साहित्याच्या वापराबाबत माहिती द्यावी. D.El.Ed. छात्राध्यापकांना, ‘स्वयंसेवक’ म्हणून काम करताना आवश्यक असणारे सर्व अध्ययन-अध्यापन साहित्य’ राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे या कार्यालयाच्या maa.ac.in संकेतस्थळावरील ‘राज्य साक्षरता केंद्र’ विभागाच्या टॅबवर उपलब्ध असल्याबाबत अवगत करावे आणि D.EL.Ed. च्या छात्राध्यापकांद्वारे करण्यात आलेले असाक्षरांचे माहिती संकलन व असाक्षरांसाठीच्या अध्ययन अध्यापन कामकाजाचा आढावा घेण्यात यावा.
यासंदर्भात, आपल्या स्तरावरून प्राचार्य, अध्यापक विद्यालय यांना द्यावयाच्या सूचना व असाक्षर, स्वयंसेवक माहिती संकलनासाठीचे प्रपत्र अ व ब सोबत जोडले आहे. तसेच छात्राध्यापकांना, ‘स्वयंसेवक’ म्हणून काम करताना आवश्यक असणारे सर्व अध्ययन-अध्यापन साहित्याच्या links सोबत दिल्या आहेत, तरी ‘ULLAS’ नव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी, D.EL.Ed. छात्राध्यापकांचा सहभाग घेणेबाबत, आपल्या स्तरावरून आपल्या अधिनस्त सर्व अनुदानित, विनाअनुदानित अध्यापक विद्यालयांना आवाहन करून, संबंधित सूचना निर्गमित कराव्यात.
सोबत : १. प्राचार्य, अध्यापक विद्यालय यांना द्यावयाच्या सूचना व प्रपत्रे
२. अध्ययन-अध्यापन साहित्याच्या links.
राहूल रेखावार (भा.प्र.से.) संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे.
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
प्रत – शिक्षण संचालक, शिक्षण संचालनालय (योजना) महाराष्ट्र राज्य तथा सदस्य सचिव, राज्य साक्षरता अभियान प्राधिकरण, पुणे.
प्राचार्य, अध्यापक विद्यालय यांना द्यावयाच्या सूचना व प्रपत्रे-
प्राचार्य, अध्यापक विद्यालय यांनी आपल्या अध्यापक विद्यालयातील सर्व D.El.Ed. च्या छात्राध्यापकांना, पुढील प्रमाणे सूचना देऊन ‘ULLAS – नव भारत साक्षरता कार्यक्रम’ या राष्ट्रीय कार्यात योगदान देण्याचे आवाहन करावे.
- आपल्या अध्यापक विद्यालयातील सर्व D.EL.Ed. च्या छात्राध्यापकांना सूचित करावे की, त्यांनी आपल्या विद्यालयाच्या कार्यक्षेत्रातील, आपल्या कुटुंबातील किंवा शेजारच्या कुटुंबातील असाक्षर असणाऱ्या किमान 3 व्यक्ती यांची माहिती सोबत जोडलेल्या विहीत नमुना प्रपत्र अ मध्ये संकलित करावी. संकलित माहितीची एक प्रत नजीकच्या शाळेतील मुख्याध्यापकांकडे जमा करावी व दुसरी प्रत आपल्या अध्यापक विद्यालयातील वर्गशिक्षकांकडे जमा करावी.
- आपल्या अध्यापक विद्यालयातील सर्व D.El.Ed. च्या छात्राध्यापकांना, स्वयंसेवक म्हणून ‘ULLAS – नव भारत साक्षरता कार्यक्रम’ या राष्ट्रीय कामात सहभागी होण्यासाठी प्रेरित करावे. स्वयंसेवक म्हणून, छात्राध्यापकांनी स्वतःची माहिती सोबत जोडलेल्या विहीत नमुना प्रपत्र अ मध्ये भरून, त्याची एक प्रत नजीकच्या शाळेतील मुख्याध्यापकांकडे जमा करावी व दुसरी प्रत आपल्या अध्यापक विद्यालयातील वर्गशिक्षकांकडे जमा करावी.
प्रपत्र अ असाक्षर व स्वयंसेवक व्यक्तींच्या नोंदणीसाठी आवश्यक माहितीचा तक्ता
४. प्राचार्य, अध्यापक विद्यालय यांनी विहीत नमुना प्रपत्र ब मध्ये संकलित केलेली माहिती, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) यांच्याकडे जमा करावी.
प्रपत्र ब – प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांना सादर करावयाचा संख्यात्मक अहवाल
५. प्राचार्य, अध्यापक विद्यालय यांनी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) व प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई या यांचेकडून वेळोवेळी आयोजित केलेल्या बैठकीस उपस्थित राहून, असाक्षरांच्या अध्ययन अध्यापनासाठी उपलब्ध साहित्याच्या वापराबाबत माहिती घेऊन, आपल्या अध्यापक विद्यालयातील सर्व D.El.Ed. च्या छात्राध्यापकांना अवगत करावी. तसेच असाक्षर, स्वयंसेवक नोंदणीचा संख्यात्मक अहवाल सादर करावा.
६. प्राचार्य, अध्यापक विद्यालय यांनी वर्गशिक्षकांमार्फत, आपल्या अध्यापक विद्यालयातील सर्व D.El.Ed. च्या छात्राध्यापकांना, ‘स्वयंसेवक’ म्हणून काम करताना आवश्यक असणारे सर्व अध्ययन अध्यापन साहित्य, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे या कार्यालयाच्या maa.ac.in संकेतस्थळावरील ‘राज्य साक्षरता केंद्र’ विभागाच्या टॅबवर उपलब्ध असल्याबाबत माहिती द्यावी व त्या साहित्याचा वापर असाक्षरांच्या अध्ययन अध्यापनासाठी करण्याबाबत आवाहन करावे.
७. ‘ULLAS नव भारत साक्षरता कार्यक्रम’ या राष्ट्रीय कार्यात D.El.Ed. छात्राध्यापकांनी दिलेल्या योगदानासाठी छात्राध्यापकांना अध्यापक विद्यालयामार्फत प्रमाणपत्र देण्यात यावे.
प्रति, उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व).