Opening Zero Balance Savings Bank Account For Students
Opening Zero Balance Savings Bank Account For Students
Opening Zero Balance Savings Account for scholarship holders
Regarding opening a zero balance savings account for scholarship holders
महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
जा.क्र. मरापप/शिष्यवृत्ती/२०२५/4522
दिनांक :-१७/९/२५
विषय :- शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे झिरो बॅलन्स बचत खाते उघडण्याबाबत…
महोदय,
उपरोक्त विषयानुसार राज्यातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती देण्याची योजना, महाराष्ट्र राज्य शासनाने सन १९५४-५५ या शैक्षणिक वर्षापासून सुरु केली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वीतील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन केले जाते.
शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना शिक्षण संचालनालय (योजना) कार्यालयामार्फत शिष्यवृत्तीची रक्कम अदा करण्यात येते. सदर शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम अदा करण्यासाठी विद्यार्थ्यांचे नवीन बैंक खाते उघडणे आवश्यक आहे. त्याशिवाय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम त्यांना हस्तंतरित करता येत नाही.
तथापि बऱ्याच वेळा झिरो बॅलन्स खाते उघडण्यास बैंका टाळाटाळ करतात. त्यामुळे शिष्यवृत्तीची अल्प रक्कम प्राप्त करुन घेण्यासाठी पालकांना स्वतःचे पैसे गुंतवून पाल्याचे बँक खाते उघडावे लागते. अशा परिस्थितीत पालक जर आपल्या अल्पवयीन पाल्याचे बैंक खाते उघडण्यास असमर्थ ठरले तर तो विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या रक्कमेपासून वंचित राहतो.
सदर शिष्यवृत्तीधारक ठरलेल्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची रक्कम बँक खात्यात जमा होण्यासाठी विद्यार्थ्यांचे किंवा विद्यार्थ्यांचे आई / वडील / पालक यांचे संयुक्त बैंक खाते विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक बैंक खात्याशी संलग्न असलेले झिरो बॅलन्स बचत खाते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत उघडविण्यास सहकार्य करावे. याबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील तालुकास्तरीय जिल्हा मध्यर्ती सहकारी बँकांचे अधिकारी यांना कळविण्यात यावे, जेणेकरुन तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी यांना त्यांचे कार्यक्षेत्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधून जिल्हा मध्यवती सहकारी बँकामध्ये खाते उघडणेबाबत कळविणे सोईचे होईल. बैंक खाते नसलेल्या सर्व विद्यार्थ्यांची यादीची Soft Copy त्यांच्याकडे उपलब्ध आहे.
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे – ०४.
प्रत माहितीस्तव व पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी –
शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक), जिल्हा परिषद सर्व यांना उपरोक्त पत्रात नमूद केल्यानुसार आपल्या कार्यक्षेत्रातील तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे अधिकारी /समन्वयकांशी संपर्क साधण्याचे निर्देश देण्यास्तव अग्रेषित.
प्रति,
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक, सर्व.
Opening a zero balance savings account for students