शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा मधील माहिती सुधारित अद्यावत करण्यासाठी उच्च माध्यमिक शाळामधील तज्ज्ञ शिक्षकांची ऑनलाइन कार्यशाळा आयोजित करणेबाबत Online Workshop for teachers to revise update SQAAF

Online Workshop for teachers to revise update SQAAF

Online Workshop for teachers to revise update SQAAF

SQAAF UUPDATE INFORMATION SCERT GUIDELINES

Regarding organizing an online workshop for expert teachers from higher secondary schools to revise/update the information in the School Quality Assessment and Assurance Framework (SQAAF)

शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा (SQAAF) मधील माहिती सुधारित/अद्यावत करण्यासाठी उच्च माध्यमिक शाळामधील तज्ज्ञ शिक्षकांची online कार्यशाळा आयोजित करणेबाबत

महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

प्रति,
प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)

विषयः शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा (SQAAF) मधील माहिती सुधारित/अद्यावत करण्यासाठी उच्च माध्यमिक शाळामधील तज्ज्ञ शिक्षकांची online कार्यशाळा आयोजित करणेबाबत

संदर्भ :

१. शासन निर्णय क्र. संकीर्ण २०२४/प्र. क्र.०९/ एसडी-६ मंत्रालय मुंबई दि.१५ मार्च, २०२४ (SSSA)

२. शासन निर्णय क्र. संकीर्ण २०२४/प्र.क्र.१०/एसडी-६ मंत्रालय मुंबई दि.१५ मार्च, २०२४ (SQAAF)

३. शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा बाबतची माहिती लिंकमध्ये भरण्याबाबत पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/मूल्यमापन/SQAAF/२०२४-२५/००५८२ दिः ०३.०२.२०२५

उपरोक्त संदर्भ क्र. ०१ च्या शासन निर्णयान्वये राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे येथे राज्य शाळा मानक प्राधिकरण (SSSA) कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. संदर्भ क्र. ०२ च्या शासन निर्णयान्वये शाळा गुणवत्ता आणि आश्वासन आराखडा (SQAAF) तयार करण्यात आला आहे. संदर्भ क्र. ०२ व ०३ ला अनुसरून सन २०२४-२५ मध्ये राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या (शासकीय, खाजगी अनुदानित व खाजगी विनाअनुदानित किंवा स्वयं-अर्थसहाय्यीत), सर्व माध्यमाच्या शाळांचे स्वयं-मूल्यांकन दि. ३ फेब्रुवारी २०२४ ते दिः ३० जून, २०२५ या कालावधीत पूर्ण करून घेण्यात आले.

SQAAF अधिक माहिती जाणून घ्या या ओळीला स्पर्श करून

उपरोक्त संदर्भ क्र. ०२ च्या शासन निर्णयान्वये सन २०२५-२६ मध्ये राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमांच्या शाळांचे स्वयं-मूल्यांकन पूर्ण करणे आवश्यक आहे.

सन २०२४-२५ मध्ये स्वयं-मूल्यांकनाची प्रक्रिया सुरु असताना उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटनाकडून प्राप्त झालेल्या पत्रान्वये उच्च माध्यमिक शाळांच्यासाठी काही मानके लागू होत नाहीत असे कळविण्यात आले होते. त्यानुसार शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा (SQAAF) मधील मानकांबाबत चर्चा करण्यासाठी जिल्हांचे गट तयार करण्यात आले आहेत. SQAAF मधील क्षेत्र, उपक्षेत्र, मानक, वर्णनविधानाबाबत माहिती सुधारित/अद्यावत करण्याची जबाबदारी संबंधित गट प्रमुख प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांची राहील.

सोबत देण्यात आलेल्या सूचनापत्रकानुसार संबंधित जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, प्राचार्य यांनी online बैठकीचे आयोजन करण्यात यावे. online बैठकीसाठी सर्व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, प्राचार्य यांनी आपल्या जिल्ह्यातील उच्च माध्यमिक शाळांमधील तज्ञ शिक्षकांची निवड करावी व गटातील प्रमुख जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, प्राचार्य यांना तज्ञ शिक्षकांची नावे कळवावीत. online कार्यशाळेतील प्राप्त सूचना राज्यस्तरीय मार्गदर्शन समितीतील सदस्यांच्यामार्फत पडताळणी करून शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा- (SQAAF) मधील योग्य त्या क्षेत्र, उपक्षेत्र, मानकांबाबत माहिती सुधारित/अद्यावत करण्यासाठी दिलेल्या नमुन्यात एकत्रित करावी व आपला अहवाल दि. १५ नोव्हेंबर, २०२५ पूर्वी

sqaafmh@maa.ac.in

या इमेल आयडीवर सादर करावा.

संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.

     शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा- (SQAAF) उच्च माध्यमिक शाळांच्यामधील तज्ञ शिक्षकांची online कार्यशाळा मार्गदर्शक सूचना

१. Online कार्यशाळेसाठी जिह्यांचे एकूण दहा गट तयार करण्यात आले आहेत. गटामध्ये समाविष्ट असणाऱ्या सर्व जिल्ह्यातील तज्ञ शिक्षकांची (उच्च माध्यमिक शाळांच्यामधील) एकत्रित online कार्यशाळा आयोजित करण्यात यावी.

२. प्रत्येक गटातील पहिल्या क्रमांकाच्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य हे online बैठकीचे प्रमुख असतील. त्यांनी त्यांच्या उपस्थितीत online बैठकीचे आयोजन करण्यात यावे. गटातील इत्तर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनी आपल्या SQAAF प्रतिनिधींना आपल्या जिल्ह्यातील सर्व सदस्यांसह (तज्ज्ञ शिक्षक व SQAAF जिल्हा स्तरीय मार्गदर्शन समितीतील सदस्य) उपस्थित राहण्यासाठी आदेशित करावे. आवश्यकतेनुसार सर्व सदस्यांचा What’s App ग्रुप तयार करावा. Online बैठकीची जबाबदारी गटातील सर्व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, प्राचार्य यांची राहील.

३. गटासाठी निश्चित करण्यात आलेल्या अध्यापनाच्या माध्यमानुसार प्रत्येक जिल्ह्यातून किमान वीस तज्ञ शिक्षकांची निवड करण्यात यावी, तज्ञ शिक्षकांची निवड करत असताना सर्व विषयांना समान न्याय मिळेल याची दक्षता घेण्यात यावी. आपल्या जिल्ह्यातील जिल्हास्तरीय मार्गदर्शन समितीतील सर्व सदस्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांचे प्रतिनिधी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांचे प्रतिनिधी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांचे प्रतिनिधी व निवड करण्यात आलेल्या तज्ञ शिक्षकांची माहिती गटातील प्रमुख जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांच्याकडे दिनांक ३० ऑक्टोंबर २०२५ पूर्वी देण्यात यावी.

४. कला, वाणिज्य, विज्ञान आणि व्यवसाय शिक्षण शाखेतील प्रत्येकी ५ तज्ञ शिक्षकांची निवड करण्यात यावी. आपल्या जिल्ह्यात एखाद्या शाखेचे शिक्षक उपलब्ध नसल्यास त्या ऐवजी अन्य शाखेतील इतर विषयांच्या तज्ज्ञ शिक्षकांची निवड करावी. प्रत्येक जिल्ह्यातून किमान २० तज्ञ शिक्षकांची निवड करावी.

५. राज्यस्तरीय मार्गदर्शन समितीतील सदस्यांनी गटातील प्रमुख जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे, प्राचार्य यांच्याशी संपर्क साधून online बैठकीचा दिनांक निश्चित करून घेण्यात यावा.

६. संबंधित जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य व गटासाठी निश्चित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय मार्गदर्शन समितीतील सदस्य यांनी तज्ञ शिक्षकांची online बैठक दिनांक ३ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबर, २०२५ दरम्यान आयोजित करावी. online बैठकीसाठी निवडण्यात आलेल्या सर्व सदस्यांना उपस्थित ठेवण्याची जबाबदारी सर्व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य व त्यांचे SQAAF विभागाचे प्रमुख (प्रतिनिधी) यांची राहील.

७. प्रत्येक गटासाठी SQAAF मधील क्षेत्र, उपक्षेत्र, मानके निश्चित करून देण्यात आली आहेत, त्यानुसारच online बैठकीत चर्चा करण्यात यावी.

८. सर्व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनी आपल्या जिल्ह्यातील सर्व सदस्य व तज्ञ शिक्षकांना ऑनलाइन बैठकीपूर्वी किमान तीन दिवस आधी बैठकीचे आयोजन कळविण्यात यावे. बैठकीपूर्वी सर्व सदस्यांना व तज्ज्ञ शिक्षकांना maa.ac.in या संकेतस्थळावरील SQAAF या टॅब मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले सर्व शासन निर्णय, परिपत्रके, सूचना, मार्गदर्शन पुस्तिका, मार्गदर्शन व्हिडिओ, संदर्भ साहित्य इ. चे वाचन करणेस सूचित करावे.

९. राज्यस्तरीय मार्गदर्शन समितीतील सदस्यांनी online बैठकीत सुचविलेल्या शंका/सूचना/हरकती या NEP-२०२०, सार्थक पुस्तिका, पी.एम.श्री. ३ पुस्तिका, शासन निर्णय इत्यादी संदर्भ साहित्यानुसार पडताळणी करून सर्व शंका/सूचना/हरकर्तीचे निरसन करावे. SQAAF मध्ये बदल करणे/सुधारणा करणे आवश्यक असणाऱ्या योग्य त्या शंका/सूचना/हरकतीचा स्वीकार करून अंतिम अहवाल तयार करावा व आपला अहवाल गटातील प्रथम क्रमांकाचे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांना दि. ८ नोव्हेंबर, २०२५ पर्यंत सॉफ्टकॉपी EXCEL (मराठी व इंग्रजी मध्ये सादर करावी.

१०. online बैठकीचे इतिवृत्त गटातील प्रथम क्रमांकाचे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य व त्यांचे प्रतिनिधी यांच्या स्वाक्षरीने दि. ८ नोव्हेंबर, २०२५ पर्यंत सादर करावे. तर SQAAF मध्ये बदल करणे/सुधारणा करणेबाबतचा अंतिम अहवाल दिलेल्या नमुन्यात सॉफ्टकॉपीमध्ये (EXCEL मराठी व इंग्रजी मध्ये) दि. १५ नोव्हेंबर, २०२५ पूर्वी sqaafmh@maa.ac.in या इमेल आयडी वर सादर करावा,

११. प्राचार्य यांनी आपला अहवाल सादर करताना दिलेल्या नमुन्यातच अहवाल सादर करावा. अहवालामध्ये SQAAF आराखड्यातील कोणत्या क्षेत्रात, कोणत्या उपक्षेत्रात, कोणत्या मानकात, कोणत्या वर्णन विधानांमध्ये बदल करावयाचा आहे याबाबतची स्पष्टता होणे आवश्यक आहे.

१२. आपणाला देण्यात आलेल्या SQAAF आराखड्यातील क्षेत्र, उपक्षेत्र, मानके, वर्णनविधाने यातील बदल / सुधारणा करण्याची जबाबदारी गटातील सर्व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांची राहील.

१३. आवश्यकतेनुसार सर्व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी उपस्थित रहावे.

Online Workshop for teachers to revise update SQAAF
Online Workshop for teachers to revise update SQAAF

   शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा- (SQAAF)

   उच्च माध्यमिक शाळांच्यामधील तज्ञ शिक्षकांची online कार्यशाळा 

    • जिल्हानिहाय (गटनिहाय), माध्यमनिहाय, SQAAF क्षेत्रनिहाय Online कार्यशाळा नियोजन •

संपूर्ण परिपत्रक पीडीएफ प्रत लिंक

Leave a Comment

error: Content is protected !!