ONLINE INTERNAL GRADE MARKS SUBMISSION HSC SSC EXAM

ONLINE INTERNAL GRADE MARKS SUBMISSION HSC SSC EXAM

IMG 20250110 212722
ONLINE INTERNAL GRADE MARKS SUBMISSION HSC SSC EXAM

ONLINE INTERNAL GRADE MARKS SUBMISSION HSC SSC EXAM

Procedure for SSC HSC EXAM Submission Online Practical Oral Internal Assessment Marks Grades

Procedure for online filling of marks and grades of examinations practical, oral, internal assessment, grade etc.

ONLINE INTERNAL GRADE MARKS
SUBMISSION HSC SSC EXAM Date SHEDULE

Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education , Pune

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे

क्र.रा.मं./परीक्षा-२/120/090 दि. ०९/०१/२०२५

विषय – माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (३.१० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा फेब्रुवारी- मार्च २०२५ चे प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत (Practical & Internal) मूल्यमापनाचे ऑनलाईन पध्दतीने गुण भरणेबाबत…

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सूचित करण्यात येते की, माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (३.१० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (३.१२ वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२५ साठी गणकयंत्र विभागामार्फत सर्व शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना online पध्दतीने प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापनाचे गुण व श्रेणी मंडळाच्या

या अधिकृत संकेतस्थळावर login मधून भरण्याची सुविधा देण्यात येणार आहे. सदर संकेतस्थळावरुन गुण/श्रेणी भरणेसाठीचा दिनांक यथावकाश कळविण्यात येईल.

गतवर्षीप्रमाणेच सर्व विभागीय मंडळांनी फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या परीक्षेसाठी ‘आउट ऑफ टर्न’ ने आयोजित करावयाच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व तत्सम परीक्षा संबंधित शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांमार्फतच आयोजित करण्यात याव्यात. सदर ‘आउट ऑफ टर्न’ परीक्षांचे गुण व श्रेणी ही उपरोक्त प्रमाणे ऑनलाईन पध्दतीने मंडळाकडे पाठवावयाचे आहेत.

त्याअनुषंगाने सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना ऑनलाईन पध्दतीने गुण भरुन मंडळाकडे कशाप्रकारे पाठवावयाचे आहेत याबाबतचा सर्वसाधारण सूचना या पत्रासोचत देण्यात येत आहेत. सदर सर्वसाधारण सूचना सर्व शाळा / कनिष्ठ महाविद्यालय यांना कळविण्याबाबत पुढील उचित कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य मंडळ कार्यालयास सादर करावा.

परिपत्रक पीडीएफ साठी या ओळीला स्पर्श करा

(देविदास कुलाळ) सचिव राज्य मंडळ, पुणे

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी)

फेब्रुवारी-मार्च २०२५

प्रात्यक्षिक, तोंडी, अंतर्गत मुल्यमापन, श्रेणी इत्यादी परीक्षांचे गुण व श्रेणी ऑनलाईन पध्दतीने भरण्याबाबतची कार्यपद्धती.

१. फेब्रुवारी-मार्च २०२५ परीक्षेचे इ. १२ वी व इ. १० वी च्या प्रात्यक्षिक, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन, श्रेणी इत्यादी परीक्षेचे गुण व श्रेणी प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालय/शाळा यांनी मंडळाच्या

या संकेतस्थळावरील Internal/Practical Mark & Grade या Link मधून मंडळाकडे पाठवावयाचे आहेत.

२. गुण नोंदविण्याकरीता Maker-Checker कार्यपद्धती वापरावयाची असून, त्याकरीता सध्याच्या Login Id जसे इ.१२ वी (Jxxxxxxx_1) तसेच ३.१० वी (Sxxxxxxx_1) हा अनुक्रमे प्राचार्य/मुख्याध्यापक यांचेसाठी असून, त्यांनी Checker म्हणून काम करावयाचे आहे. तर इतर शिक्षक/लिपिक यांनी Maker मधून गुण नोंदविण्याचे काम करावयाचे आहे.

३. Maker Login मध्ये विषय निहाय / माध्यम निहाय त्या त्या विषयाच्या विद्यार्थ्याची कोरी पृष्ठे (Blank Marksheet) प्रात्यक्षिक परीक्षेदरम्यान गुणांकन करण्यासाठी उपलब्ध होतील तसेच त्या संदर्भातील तारखा स्वतंत्र्यरित्या कळविण्यात येतील.

सुलभ संदर्भासाठी या ओळीला स्पर्श करा

४. विषयनिहाय प्रात्यक्षिक / अंतर्गत मूल्यमापन झाल्यानंतर संबधित विषयाच्या कोऱ्या गुणपत्रकावर (Blank Marksheet) बैठक क्रमांकानुसार (Seat no wise) गुणांच्या / श्रेणीच्या नोंदी घेउन Maker Login मधून त्याची HSC Marks/Grade या Option मधून Online Entry करायची आहे. सदर गुणांची नोंद योग्य झाली आहे का याबाबत Printout काढून खात्री करता येईल. एका विषयाच्या सर्व गुणांची/श्रेणीची Online नोंद झाल्यानंतर त्या विषयाकरीता “Send for Approval to checker” हा option Enable होईल. त्याव्दारे सर्व पृष्ठे ही Checker कडे तपासणीसाठी पाठविता येतील, अशाप्रकारे सर्व विषयांची पृष्ठे Entry पूर्ण करून Checker कडे तपासणीसाठी पाठवावयाची आहेत.

५. Checker User ला इ.१२ ची (Jxxxxxxx_1) तसेच इ.१० वी (Sxxxxxxx_1) त्याचे Login मध्ये Maker User ने पाठविलेली सर्व पृष्ठ HSC Marks/Grade या Option मध्ये तपासणीसाठी उपलब्ध होतील. Checker User ने सर्व विषयाच्या गुणाच्या/श्रेणीच्या नोंदी तपासून पृष्ठनिहाय मान्य (approve) करावयाच्या आहेत सर्व पृष्ठे मान्य (approve) झाल्यानंतर “Send for Board Approval” हा Option Enable होईल. त्या Option मधून सर्व विषयांचे अंतिम गुण व श्रेणी मंडळाकडे पाठवावयाच्या आहेत.


६. आपल्या कनिष्ठ महाविद्यालय/शाळेमधील विद्यार्थ्याचे बैठक क्रमांकनिहाय ऑनलाईन पध्दतीने नोंदविलेल्या गुणांची Final Printout घेवून त्यावर अंतर्गत व बहिस्थ परीक्षकांची स्वाक्षरी (आवश्यक त्या विषयाच्या बाबत) व तोंडी, अंतर्गत मुल्यमापन, श्रेणी इत्यादी गुणतवत्यानुसार संबधित विषय शिक्षकांची स्वाक्षरी घेवून सदर गुणतक्त्यावर प्राचार्य/मुख्याध्यापक यांनी कनिष्ठ महाविद्यालय/शाळेचा शिक्का उमटवून स्वाक्षरी करावयाची आहे व सदरचे गुणतक्ते विभागीय मंडळाकडे निर्धारीत तारखेस प्रचलित पध्दतीप्रमाणे सिलबंद पाकीटामध्ये, पाकिटावर शाळा व कनिष्ठ, महाविद्यालयाचे नाव, Index No घालून जमा करावयाचे आहेत. तसेच गुणतक्त्याची एक प्रत शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात माहितीस्तव जतन करणे आवश्यक आहे.

७. प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी, अंतर्गत मूल्यामापन परीक्षा नियमित कालावधीमध्ये देवू न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी सदरची ऑऊट ऑफ टर्न परीक्षा लेखी परीक्षेनंतर राज्य मंडळाने कळविलेल्या वेळापत्रकानुसार आयोजित करण्यात येईल.

८. नियमित कालावधीमध्ये जे विद्यार्थी गैरहजर राहिलेले आहेत अशाच विद्यार्थ्याचे बैठक क्रमांक सदर ऑउट ऑफ टर्न परीक्षेसाठी ज्या त्या कनिष्ठ महाविद्यालय/शाळांना उपलब्ध करून दिले जातील. सदर विद्यार्थ्याचे गुण ऑनलाईन पध्दतीने “Out of Turn marks” या Option द्वारे नोंदविण्याची कार्यवाही शाळा व क. महाविद्यालयानी उपरोक्त पद्धती प्रमाणेच Maker ब Checker Login चा वापर करून करावयाची आहे.

९. अतिविलंब शुल्काच्या मुदतीमध्ये आवेदनपत्रे भरलेल्या व या गुणांच्या Online System मध्ये ज्या विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक (Additional Seat No) उपलब्ध झालेले नाहीत, अथवा विषयबदल केला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचे गुण प्रचलीत पद्धतीने निर्धारित तारखेस विभागीय मंडळाकडे जमा करावयाचे आहेत.

STEPS IN ONLINE INTERNAL/GRADE MARKS

SUBMISSION HSC/SSC

START

Login with existing User name and password

If Maker User is not available Add one user & assign him as maker

Login with MAKER user & download blank Mark List for Exam

After exam, enter marks with MAKER login in mark/grade menu

After entry of all marks for any of the subject is completed. Send these marks to CHECKER by pressing “SEND FOR APPROVAL TO CHECKER” button

Login with CHECKER login. Check & approve each page, marks entered by MAKER

After all pages approve CHECKER. Submit all pages by to board by clicking on “SEND FOR BOARD APPROVEAL” link

Take final subject wise printouts and submit to divisional board with signature and stamps on given date

Finish

IMG 20250110 212743
ONLINE INTERNAL GRADE MARKS SUBMISSION HSC SSC EXAM

Leave a Comment

error: Content is protected !!