Online Application Link For D L Ed Admission
Online Application Link For D L Ed Admission
Online Apply Link For D Ed Admission 2025-2026
D.L.Ed First Year Online Admission Process Link
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
डी.एल.एड प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेश सन २०२५-२६ (शासकीय कोटा)
प्रसिद्धी निवेदन
शैक्षणिक वर्ष सन २०२५-२६ साठी डी.एल.एड. प्रथम वर्षाचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत आहे. याबाबतचे वेळापत्रक, ऑनलाईन अर्ज भरणेबाबतच्या सविस्तर सूचना, प्रवेश नियमावली व अध्यापक विद्यालयाची यादी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे
www.maa.ac.in
या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
१. दि. २६.०५.२०२५ पासून
🌐 👇
www.maa.ac.in
या संकेतस्थळावर अर्ज भरण्यास सुरुवात होईल.
२. अर्ज भरण्यासाठी उमेदवाराचा स्वतःचा Email ID असणे बंधनकारक आहे.
३. प्रवेश अर्ज शुल्क – खुला संवर्ग रु. २००/-, खुला संवर्ग वगळून अन्य संवर्ग रु.१००/- असे राहील.
४. उमेदवारास एकापेक्षा जास्त माध्यमासाठी अर्ज करावयाचा असेल तर प्रत्येक माध्यमाच्या संवर्गानुसार स्वतंत्र आवेदनपत्र शुल्क भरावे लागेल.
५. प्रवेश अर्ज शुल्क स्वीकारण्याची पद्धती प्रवेश अर्ज शुल्क ऑनलाईन / payment gateway /Ewallet स्वतःचे किंवा नातेवाईकाच्या क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड याद्वारेच स्वीकारलें जाईल.
६. प्रवेश पात्रता- प्रवेशास इच्छुक असणारे कला, वाणिज्य, विज्ञान व एम.सी.व्ही.सी शाखेतील पात्र उमेदवार इ. १२ वी खुल्या संवर्गासाठी किमान ४९.५ टक्के गुण व खुला संवर्ग वगळून अन्य संवर्गासाठी किमान ४४.५ टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
७. व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश घेणा-या उमेदवारांनी ऑनलाईन प्रक्रियेतील अर्ज भरणे बंधनकारक आहे.
८. उमेदवारांना प्रवेश अर्ज भरताना तांत्रिक अडचणी असल्यास अशा अडचणी स्वतःच्या registered ई-मेलवरून support@deledadmission.in या ई-मेलवर पाठवाव्यात.
९. प्रवेशाबाबतचे वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाईल.
याबाबत वर्तमानपत्रात पुन्हा स्वतंत्र जाहिरात दिली जाणार नाही. त्यासाठी उमेदवाराने वेळोवेळी संकेतस्थळ पाहणे आवश्यक आहे.
दि. २०/०५/२०२५
स्थळ – पुणे
स्वा/-
राहूल रेखावार (भा.प्र.से)
संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे अध्यक्ष,
तथा
राज्यस्तरीय डी.एल.एड प्रवेश निवड, निर्णय व प्रवेश संनियंत्रण समिती, पुणे
Also Read 👇
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
Email:preserviceedudept@maa.ac.in
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र ५०८, सदाशिव पेठ, कुमठेकर मार्ग, पुणे ४११०३०
जा.क्र. राशैसंप्रपम/सेवापूर्व शिक्षण/प्रवेश कक्ष/२०२५-२६/०२८७४
दि.१४/०५/२०२५
प्रति,
१) विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)
२) प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)
३) शिक्षण निरीक्षक मुंबई (दक्षिण)
विषय :- डी.एल.एड प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक वर्ष सन २०२५-२६ साठी अध्यापक विद्यालयांची ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करणेबाबत…..
संदर्भ : राज्यस्तरीय डी.एल. एड प्रवेश निवड, निर्णय व संनियंत्रण समिती ऑनलाईन सभा दि.१३/०५/२०२५
डी.एल.एड. प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०२५-२६ सुरु होणेपूर्वी अध्यापक विद्यालयांची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करणे बंधनकारक आहे. या प्रक्रियेस संदर्गीय समेत मान्यता मिळालेली आहे. करिता शैक्षणिक वर्ष सन २०२५-२६ करिता अध्यापक विद्यालयाच्या ऑनलाईन नोंदणी करणेसंदर्भातील सूबना पुढीलप्रमाणे आहेत.
१. अध्यापक विद्यालयांची ऑनलाईन फब्दतीने नोंदणी करणेबाबतची Link दि.१५/०५/२०२५ ते २२/०५/२०२५ याच कालावधीत सुरु राहील.
२. प्राचार्य, अध्यापक विद्यालय यांनी
https://www.maa.ac.in
या संकेतस्थळावर
३. प्राचार्य, अध्यापक विद्यालय यांनी Login वर Click करून आपल्या अध्यापक विद्यालयाचे UserID व Password वापरून Login करावे.
४. Login केल्यानंतर संबंधित अध्यापक विद्यालयाची माहिती Display होईल. यामधील बदल न करावयाची (NonEditable) माहिती संबंधित अध्यापक विद्यालयाच्या NCTE मान्यता पत्राप्रमाणे असलेबाबतची खात्री करावी. यामध्ये तफावत असल्यास संबंधित पुराव्यासह support@deledadmission.in या ई-मेल चर कळविण्यात यावे.
५. संबंधित अध्यापक विद्यालयाची बदल करावयाची (Editable) माहिती अद्ययावत करून Save करावी,
६. विहित कालावधीत अध्यापक विद्यालयाची नोंदणी न केल्यास या अध्यापक विद्यालयास शैक्षणिक वर्ष सन २०२५-२६ च्या डी.एल.एड प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत समाविष्ट केले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
करिता शैक्षणिक वर्ष रान २०२५-२६ मधील डी.एल.एड प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील उपरोकाप्रमाणे अध्यापक विद्यालय ऑनलाईन नोंदणीबाबत सूचना आपल्या कार्यक्षेत्रातील अध्यापक विद्यालयांना देण्यात याव्यात.
मूळ टिपणी मा. संचालक यांनी मान्य केलेली आहे.
उपसंचालक (सेवापूर्व शिक्षण) राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे