No Money Charge For Issuing School Leaving Certificates And Mark Sheets To Students शाळा सोडल्याचा दाखला व मार्कलिस्ट विद्यार्थ्यांना देत असताना पैसे घेऊ नयेत

No Money Charge For Issuing School Leaving Certificates And Mark Sheets To Students

image 61
No Money Charge For Issuing School Leaving Certificates And Mark Sheets To Students

No Money Charge For Issuing School Leaving Certificates And Mark Sheets To Students

No money should be charged for issuing school leaving certificates and mark sheets to students.

No payment should be taken while issuing school leaving certificates and marklists to students

No payment should be taken while issuing Transfer certificates and Mark Memo to Pupil

क्र.शिसंमा/संकीर्ण/२०२५/ए-१/विद्या शाखा/२९७७

दि. ०५/०६/२०२५

विषय :- शाळा सोडल्याचा दाखला व मार्कलिस्ट विद्यार्थ्यांना देत असताना रक्कम घेतल्या बाबत..

संदर्भ :- १) श्री. गणेश मोहन गुप्ते यांचा ई-मेल द्वारे प्राप्त अर्ज, दिनांक १७/०५/२०२५.
२) श्री. प्रशांत कोरडे शहरप्रमुख, किनवट, जि. नांदेड यांचे १२/०५/२०२५ रोजीचे पत्र.
३) शासन निर्णय क्रमांकःसंकीर्ण-२०१५/ (५५/१५)/समन्वय कक्ष, दि. ०४ जानेवारी, २०१६.

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपणांस कळविण्यात येते की, “शाळा सोडल्याचा दाखला व मार्कलिस्ट देत असताना रक्कम घेतल्याबाबत च्या तक्रारी संचालनालयास प्राप्त होत आहेत.

सद्यस्थितीत इ.१० वी, ११ वी व १२ वी चे निकाल जाहीर करण्यात आलेले असून विद्यार्थी पुढील शिक्षणाकरीता संबंधित शाळा, महाविद्यालयाकडे शाळा सोडल्याचा दाखला व मार्कलिस्ट यांची मागणी करत आहे.

विशेषतः इंदापूर तालुक्यामधील सर्वच शाळा, महाविद्यालये वरील कागदपत्रे विद्यार्थ्यास देताना प्रति विद्यार्थी २००/- बेकायदेशीरपणे गोळा करत आहे. त्यानुसार आपले अधिनस्त सर्व शाळा, महाविद्यालये यांना अशा प्रकारे विद्यार्थ्यांकडून कोणतीही वसुली विद्यार्थ्यांकडून करण्यात येवू नये याबाबत आपल्या स्तरावरून आदेश देण्यात यावेत. इंदापूर तालुक्यातील ज्या शाळांनी अशा पध्दतीने रक्कम घेतलेली आहे अशा शाळांवर कार्यवाही करण्यात यावी व विद्यार्थ्यांकडून घेतलेले अतिरिक्त पैसे त्यांना परत करण्यात यावेत अशी मागणी तक्रारदाराने संबंधितांना केलेली आहे.

करीता संदर्भ क्र.३ मधील परिपत्रकात नमूद केल्याप्रमाणे शाळा सोडल्याचा दाखला व मार्कलिस्ट विद्यार्थ्यांना देत असताना विद्यार्थ्यांकडून कोणतीही अवैध रक्कम वसूल केल्यास त्याविरुध्द कारवाई करणेबाबत आपल्या स्तरावरुन सर्व संबंधित अधिकारी यांना निर्देश देण्यात यावेत व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनालयास व अर्जदारास ई-मेल द्वारे सादर करण्यात यावा.

(मा.संचालक यांच्या मान्यतेने)

शिक्षण उपसंचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य, पुणे

महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य,पुणे

प्रत माहितीस्तव

१. श्री. गणेश मोहन गुप्ते (अखिल भारतीय ग्राहक पंचायत पदाधिकारी इंदापूर) मु.पो. भवानीनगर, ता. इंदापूर,जि.पुणे-४१३१०४.

२. श्री. प्रशांत कोरडे, शहरप्रमुख, मशाल शिवसेना कार्यालय, कान्हा कॉम्पलेक्स, किनवट, जि. नांदेड-४३१८०४.

३. मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांना सविनय सादर.

प्रति,
१. विभागीय उपसंचालक विभाग सर्व
२. शिक्षणाधिकारी (माध्यमिक), सर्व

Leave a Comment

error: Content is protected !!