NMMS EXAM 2025
NMMS EXAM 2025
NMMS EXAM 2025 UPDATE
NMMS EXAM 2025 ONLINE APPLY LINK
NMMS EXAM 2025 ONLINE REGISTRATION LINK
NMMS EXAM 2025 -2026 Notification
जाहीर प्रकटन
दिनांक : १०/१०/२०२५
दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेचे ऑनलाईन शाळा नोंदणी व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर भरण्याच्या वेळापत्रकात खालीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे.
अ.क्र.तपशिल
१ नियमित शुल्कासह
पूर्वीची दिनांक
१२/०९/२०२५ ते ११/१०/२०२५
सुधारित दिनांक
१२/०९/२०२५ ते २१/१०/२०२५
२ विलंब शुल्कासह
१२/१०/२०२५ ते २१/१०/२०२५
सुधारित दिनांक
२२/१०/२०२५ ते ३०/१०/२०२५
३ अतिविलंब शुल्कासह
२२/१०/२०२५ ते ३०/१०/२०२५
अतिविलंब शुल्कासह आवेदनपत्रे भरणे लागू राहणार नाही
(शाळा/संस्था जबाबदार असेल तर)
दिनांक ३०/१०/२०२५ नंतर कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरता येणार नाही, याची नोंद घेण्यात यावी.
(अनुराधा ओक)
आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे-४.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
जाहीर प्रकटन
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे-४ यांचेमार्फत सन २०२५-२६ साठी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) इ. ८ वी साठी दि. २१ डिसेंबर, २०२५ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये घेण्यात येणार होती.
तथापि महाराष्ट्र लोकसेवा आयागामार्फत महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा रविवार, दि. २१ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेली आहे.
त्यामुळे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) इ. ८ वी साठी परीक्षा दि. २१ डिसेंबर, २०२५ ऐवजी दि. २८ डिसेंबर, २०२५ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये घेण्यात येणार आहे.
आयुक्त
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे-०४.
दि.:- ०७/१०/२०२५
Also Read 👇
परीक्षा प्राधान्य
अधिसूचना
जा.क्र. मरापप/NMMS/इ.८वी/२०२५-२६/५५५० दि. ११/०९/२०२५
विषय :- राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२५-२६ इ.८ वी साठी परीक्षा रविवार, दिनांक २१ डिसेंबर, २०२५ अधिसूचना.
NMMS / एन एम एम एस परीक्षेच्या दर्जेदार अभ्यास साहित्यासाठी भक्कम परीक्षा तयारीसाठी आणि उज्वल यशासाठी आपल्या समुहात सामील व्हा
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेची ऑनलाईन आवेदनपत्रे परिषदेच्या
व
या संकेतस्थळावर दिनांक १२ सप्टेंबर, २०२५ पासून उपलब्ध होणार आहेत. सदर परीक्षेची सर्व माहिती, माहितीपत्रक व ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्याच्या सूचना परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत.
माहितीपत्रक
आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे-०४. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,
महाराष्ट्र राज्य माध्य. व उच्च माध्य. शिक्षण मंडळ कार्यालय, इमारत दुसरा व चौथा मजला, सर्व्हे नं. ८३२ ए, भांबुर्डा, शिवाजी नगर, पुणे- ४११००४
प्रति,
१. शिक्षणाधिकारी (माध्यमिक/योजना) जिल्हा परिषद–(सर्व)
२. शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई (दक्षिण/पश्चिम/उत्तर विभाग)
३. प्रशासन अधिकारी / शिक्षण प्रमुख / शिक्षणाधिकारी, म.न.पा. शिक्षण मंडळ
४. गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती (सर्व)



