Nipun Utsav Karyakram

Nipun Utsav Karyakram

IMG 20241224 205440
Nipun Utsav Karyakram

Nipun Utsav Karyakram

Nipun Utsav Karyakram 2024 Link

Implementation of Nipun Utsav

Implementation of Nipun Utsav by visiting mother parent groups from 26th December 2024 to 11th January 2025 under Nipun Maharashtra Program

प्रति,
१) विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)
२) प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)
३) शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद (सर्व)
४) निपुण नोडल अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)
५) निपुण नोडल अधिकारी, डाएट (सर्व)
६) प्रशासन अधिकारी, महानगरपालिका (सर्व)

विषय : ‘ग्रीष्मकालीन शिबिर’ स्वयंसेवकांमार्फत राबविण्यास सहकार्य करण्याबाबत.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे व प्रथम संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ग्रीष्मकालीन शिबिर’ राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर दिनांक ७ मे २०२५ रोजी दुपारी २.३० वाजता तालुका व केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यासाठी ऑनलाईन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

YouTube माध्यमातून सहभाग :
गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख मुख्याध्यापक व टेक्नोसेवी शिक्षक.

या चर्चासत्रात प्रथम संस्थेमार्फत ‘ग्रीष्मकालीन शिबिर’ विषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी सदर उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आपल्या स्तरावरून आवश्यक ते सहकार्य करण्यात यावे.

चर्चासत्राची माहिती:
🔹 दिनांक : ७ मे २०२५
🔹 वेळ : दुपारी २.३० वाजता

🔹 लिंक :

राज्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक आणि पालक यांना सदर YouTube लिंकद्वारे चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी आपल्या स्तरावरून सूचित करावे.

मार्गदर्शक अधिकारी:
(राहूल रेखावार भा.प्र.से.)
संचालक,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

(डॉ. कमलादेवी आवटे)
उपसंचालक,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

जा.क्र/राशैसंप्रपम/मभावि/स्वयंसंस्था/प्रथम/२०२५/०२६९२

दिनांक : ०६/०५/२०२५

विषय-ग्रीष्म कालीन शिबीर प्रथम स्वयंसेवी संस्थे मार्फत राबविणेबाबत.

implementing the summer camp through a voluntary organization Pratham

संदर्भ- या कार्यालयाचे मान्यता पत्र जा.क्र/राशैसंप्रपम/मभावि/स्वयंसंस्था/प्रथम/२०२५/०२६४९,

दिनांक : ०४/०५/२०२५

उपरोक्त संदर्भीय विषयान्वये राज्यातील दुसरी ते पाचवीच्या वर्गातील शालेय विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता वृध्दींगत करण्याकरीता निपुण महाराष्ट्र अभियानंतर्गत विविध कृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रम अंतर्गत इयत्ता ३ री ते ६ वीच्या विद्यार्थ्यांना वाचन आणि भागाकाराची उदाहरणे सोडविता यावीत यासाठी शालेय वेळेव्यतिरिक्त वेळ वापरणे आणि सुटीच्या कालावधीचा सदूपयोग करता यावा, याअनुषंगाने विद्यार्थ्यांना अपेक्षित अध्ययन स्तरावर आणण्यासाठी प्रथम संस्थे मार्फत गाव व शाळा पातळीवर ग्रीष्मकालीन शिबीर आयोजित करणे प्रस्तावित होते.

त्यानुषंगाने दि. २४ फेब्रुवारी २०२५ रोजीच्या गाभा समितीच्या सभेत प्रथम संस्थेने दाखल केलेल्या ग्रीष्म कालीन शिबीर प्रस्तावास सन २०२४-२५ या वर्षातील मे ते १५ जून या कालावधीसाठी अटी व शर्तीच्या अधीन राहून, उपक्रमाच्या अंमलबजावणीस मान्यता देण्यात आली आहे. (मान्यता पत्राची प्रत सोबत जोडली आहे.)

तरी सदर संस्थेस उपक्रम राबविण्यासंदर्भात सहकार्य करण्याबाबत आपल्या अधिनस्थ यंत्रणेस अवगत करावे.

परिपत्रक पीडीएफ मध्ये या ओळीला स्पर्श करून प्राप्त करू शकता

राहूल रेखावार (भा.प्र.से.) संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

प्रती,१. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सर्व जिल्हे२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद, सर्व जिल्हे३. प्रशासकीय अधिकारी/प्रशासन अधिकारी, महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभाग, सर्व जिल्हे४. मुख्याधिकारी नगरपालिका प्राथमिक शिक्षण विभाग, सर्व

प्रत माहितीस्तव कार्यवाहीसाठी

१. विभागीय शिक्षण उपसंचालक, (सर्व)

२. प्रथम एज्युकेशन फौंडेशन, नरीमन पॉईट, मुंबई

IMG 20250507 054543
Nipun Utsav Karyakram

विषय : निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमता पडताळणीच्या नोंदी करणेबाबत… 

संदर्भ : शासन निर्णय क्र. संकीर्ण २०२१/प्र.क्र.१७९/ एसडी-६, दिनांक: ०५ मार्च, २०२५.

उपरोक्त संदर्भीय शासन निर्णयान्वये, दि.०५ मार्च २०२५ ते ३० जून २०२५ या कालावधीत राज्यातील दुसरी ते पाचवीच्या वर्गातील शालेय विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता वृद्धींगत करण्याकरिता निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

Action Program Under Nipun Maharashtra Abhiyan विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी राज्यात निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम राबविणेबाबत अधिक जाणून घ्या या ओळीला स्पर्श करून

याअंतर्गत विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमता पडताळणीची नोंद दिनांक २० मार्च, ०५ एप्रिल, २० एप्रिल, ०५ मे, २० मे, १५ जून व ३० जून २०२५ या तारखांना VSK च्या Bot वर कराव्यात.

शिक्षकांनी Bot वर विद्यार्थ्यांच्या नोंदी करण्यासंदर्भाने अधिक माहिती घेण्यासाठी

या लिंक वरील व्हिडिओ पहावा.

तरी उपरोक्तप्रमाणे, आपल्या अधिनस्त इ. २ री ते ५ वी च्या सर्व शिक्षक व मुख्याध्यापक यांना विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमता पडताळणीची नोंद करण्यासाठी आपल्या स्तरावरून आदेशीत करावे.


(राहूल रेखावार भा.प्र.से.)
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

प्रति, १. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सर्व२. शिक्षणाधिकारी (प्राथ. व माध्य.), जि. प. सर्व ३. शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी, म.न.पा. सर्व ४. शिक्षण निरीक्षण, मुंबई (पश्चिम, उत्तर व दक्षिण) 

Also Read 👇

IMG 20241224 205137
Nipun Utsav Karyakram

महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,

दिनांक :- २४/१२/२०२४

विषयः निपुण महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत दिनांक 26 डिसेंबर 2024 ते 11 जानेवारी 2025 दरम्यान माता पालक गटांना भेटी देऊन निपुण उत्सव राबविणे बाबत

निपुण भारत अभियान अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी माता पालक गटांची स्थापना करणे व सहभागी करून घेणे याबाबत यापूर्वी आदेशित करण्यात आले आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्येही पुणे जिल्ह्यातील प्रत्येक शाळा अंतर्गत, गाव पातळीवर, वाडी, वस्तीवर माता पालक गटाची बांधणी झालेली आहे. राज्यस्तरावरून पाठवण्यात येत असलेल्या आयडिया व्हिडिओच्या मदतीने माता गटाचे कार्य सुरू आहे असे शाळांनी भरलेल्या माता पालक गटाच्या प्राप्त माहिती द्वारा दिसून येते. निपुण महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देखील 26 डिसेंबर 2024 ते 11 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये राज्यभर निपुण उत्सव राबवण्यात येणार आहे.
१) निपुण उत्सव राबवण्याकरिता 26 डिसेंबर 2024 ते 11 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये आपण स्वतः व आपल्या अधिनस्त असलेल्या सर्व पर्यवेक्षीय अधिकारी, उपशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख गट साधन व विशेष साधन व्यक्ती, विशेष शिक्षक सर्व साधन व्यक्ती यांनी किमान १० शाळा भेटी कराव्यात.

निपुण महाराष्ट्र अभियान २०२५ अंतर्गत अध्ययन क्षमता पडताळणी नमुना परिशिष्ट ३ इयत्ता ३ री ४थी ५ वी विषय मराठी वाचन लेखन संख्या ज्ञान संख्यावरील क्रया

२) मुख्याध्यापक, शिक्षक समवेत गावात माता पालक गटांना भेटी द्यावेत प्रत्येक अधिकारी कर्मचारी यांनी किमान तीन गावातील सर्व माता पालक गटांना भेट द्यावी. यात माता गटांना भेटून प्रोत्साहन द्यावयाचे आहे आणि त्या करत असलेल्या उल्लेखनीय कामासाठी त्यांचे कौतुक करायचे आहे. निपुणचे लक्ष्य साध्य करण्यासाठी मुलांच्या शिक्षणात माता पालक गटाचा नियमित सहभाग निरंतर राहील यासाठी प्रयत्न करावे.

निपुण महाराष्ट्र अभियान २०२५ अध्ययन क्षमता पडताळणी अहवाल इयत्ता दुसरी ते पाचवी

३) उर्वरित गावात माता पालक गटात, लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, यांच्या समावेत मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका यांनी आपल्या उपलब्ध वेळेनुसार सदर कालावधीमध्ये भेटी द्याव्यात.

४) काही जिल्ह्यात व तालुक्यामध्ये प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे प्रतिनिधी कार्यरत आहेत त्यांनी गटशिक्षणाधिकारी कार्यालयासोबत संपर्क साधून संयुक्त भेट करावी.

५) माता पालक गटांना भेटी देत असताना माता पालक गटाच्या सदस्या सोबत साप्ताहिक मीटिंग, माता गटांची शालेय मासिक कार्यशाळा, आयडिया व्हिडिओ इत्यादी विषयावर चर्चा करावी.

Nipun Maharashtra Program 2024

सोबत दिलेली प्रश्नावली चर्चा घडवून आणण्याकरिता उपयोगी ठरेल.

(a) प्रत्येक गावात वाडी, वस्तीनिहाय माता पालक गट तयार झाले आहे क? या वर्षांमध्ये झालेल्या गटांचे पुनर्बाधणी मध्ये इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या माता या गटांमध्ये सहभागी झाले आहे का?

(b) प्रत्येक माता पालक गटाला प्रत्येक आठवड्यात आयडी व्हिडिओ मिळतात का ?

(c) गावातील सर्व माता पालक गट आठवड्यातून किमान एकदा भेटून आयडिया व्हिडिओ मध्ये सांगितल्याप्रमाणे काम करतात का?

(d) आपल्या मुलांनी निपुण व्हावे याबद्दल मातांना नेमके काय वाटते?

(e) माता पालक गटांसोबत भेटी देणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांनी मातांना आयडिया व्हिडिओ मधील काही टास्क करून दाखवावा.

(f) शिक्षक व इतर मंडळी या माता पालक गटांना कसे सहकार्य करत आहेत याबाबत चर्चा करावी.

(g) प्रत्येक शाळेत निपुण प्रतिज्ञा व निपुणची उद्दिष्ट दर्शनी ठिकाणी लावण्यात आले आहे का हे पाहणे व माता पालक गटासंबंधी शाळेमध्ये माहितीसाठी स्वतंत्र रजिस्टर केले आहे का हे पाहणे.

(h) माता गटात काय काय गमती जमती होतात हे चर्चेतून समजून घेणे.

(i) गटभेटीदरम्यान गटाचे काम दाखवणारे निवडक फोटो व्हिडिओ मातांच्या परवानगीने घेण्याचा प्रयत्न करणे.
(j) वरील सर्व मुद्द्यांचे गावातील माता पालक भेटीदरम्यान चर्चा करावी व या भेटीदरम्यानची आपली चर्चा व निरीक्षणे याबाबत संकलन माहितीचे नोंदणी राज्यस्तरावर दिलेल्या लिंक द्वारे अनिवार्यपणे नोंदवावी.

(k) निपुण उत्सव 2024-25 माहिती संकलन लिंक –

६) माता पालक गटाच्या भेटीच्या संकलित अहवालावर जिल्हा व तालुकास्तरावर चर्चा करण्यात यावी.

IMG 20241224 203504
Nipun Utsav Karyakram

संदर्भः १) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय संकीर्ण-2021/प्र.क्र/१७९/ एस.डी. सहा/दिनांक 29/6/22
२) दिनांक 20 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता विभाग स्तरावर आयोजित केलेली ऑनलाइन बैठक मध्ये दिल्या गेलेल्या सूचना

CIRCULAR PDF LINK

Leave a Comment

error: Content is protected !!