Nav Bharat Saksharta Karyakram FLNAT ULLAS

Nav Bharat Saksharta Karyakram FLNAT ULLAS
जा.क्र. शिसंयो/ योजना-3/नभासाका / FLNAT 2026/2025-26/02304
दिनांक : 12/03/2026.
प्रति,
1) शिक्षणाधिकारी (योजना), जिल्हा परिषद (सर्व)
2) शिक्षण निरीक्षक, मुंबई (दक्षिण/पश्चिम/उत्तर)
3) शिक्षणाधिकारी/प्रशासनाधिकारी, मनपा/नपा (सर्व)
विषय :- उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत पायाभूत साक्षरता व मूल्यमापन चाचणी (FLNAT) परीक्षा सुधारित दिनांक 29 मार्च 2026 बाबत...
संदर्भ :-
1) शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांचे पत्र F.No. 6-1/2023-AE-2 दि. 20/02/2026.
2) अवर सचिव आणि समन्वयक शालेय शिक्षण व साक्षरता विभाग भारत सरकार, नवी दिल्ली यांच्याशी झालेली चर्चा दि. 10/3/2026.
उपरोक्त विषयानुसार, केंद्र शासनाच्या शिक्षण विभाग व साक्षरता विभागाचे पत्र व शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये राज्यास दिलेले भौतिक उद्दिष्ट 6.20 लक्ष गाठण्याच्या अनुषंगाने भारत सरकारच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाची अवर सचिव यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार आपल्या राज्याचे यावर्षी दिलेले उद्दिष्ट प्रयत्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनुसार दिनांक 15 मार्च, 2026 रोजी घेण्यात येणारी परीक्षा ही आता रविवार दिनांक 29 मार्च, 2026 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळात घेण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.
करण्यात आलेले आहे.
तरी असाक्षर नोंदणी व जोडणी (Tagging) चे कामकाज तात्काळ 100% पूर्ण करण्यात यावे. साक्षरता वर्ग नियमित सुरू ठेवावेत. साक्षरता वर्गांना भेटी द्याव्यात. FLNAT प्रश्नपत्रिकांचा पुरेसा सराव करून घ्यावा. पायाभूत साक्षरता व मूल्यमापन चाचणी (FLNAT) परीक्षेस नोंदणी झालेले, पूर्वीच्या परीक्षेस उपस्थित न राहू शकलेले व कामगिरीत सुधारणा आवश्यक (Need Improvement) शेरा प्राप्त असे सर्व 100% असाक्षर प्रविष्ट होतील यासाठी प्रयत्न करावेत.
(कृष्णकुमार पाटील)
शिक्षण संचालक, शिक्षण संचालनालय (योजना), महाराष्ट्र राज्य, पुणे.
प्रत माहितीस्तव सविनय सादर :
- मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई-32.
- मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे.
- मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.
प्रत माहितीस्तव : - विभागीय उपसंचालक (सर्व)
- राज्य साक्षरता केंद्र, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.

ALSO READ –
विषय :- उल्लास - नव भारत साक्षरता कार्यक्रम FLNAT २०२६ ची पूर्वतयारी संदर्भाने मूल्यमापन प्रश्नपत्रिका सरावाबाबत.
संदर्भ :- मा. संचालक, शिक्षण संचालनालय (योजना) म.रा. पुणे यांचे जा.क्र. शिसंयो/योजना-३/नभासाका/FLNAT २०२६/२०२५-२६/०२२७० दि. ०६.०३.२०२६
उपरोक्त विषयी व संदर्भिय पत्रान्वये, केंद्र पुरस्कृत उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमाची अंमलबजावणी राज्यामध्ये सन २०२२-२३ ते सन २०२६-२७ या कालावधीत केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सुरु आहे. सन २०२५-२६ या वर्षातील दुसरी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यांकन (FLNAT) परीक्षेचे आयोजन राज्यातील UDIES प्राप्त शाळांमधून रविवार दिनांक १५ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या वेळेत केले आहे.
या परीक्षेचे FLNAT पूर्वतयारी म्हणून राज्य साक्षरता केंद्र, SCERT पुणे यांच्याद्वारे सराव प्रश्नपत्रिका व आदर्श उत्तरपत्रिका तयार करण्यात आलेल्या आहेत. सदरील प्रश्नपत्रिका या स्क्रीनवर दाखवण्यात याव्यात. (प्रश्नपत्रिकांची प्रिंट काढण्याची आवश्यकता नाही) व पेजवर उत्तरे नोंदविण्याच्या सूचना देण्यात याव्यात. सदर प्रश्नपत्रिका खालील लिंकवर उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
असाक्षरांच्या प्रश्नपत्रिका सराव घेतल्याने परीक्षेसाठी त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यास मदत होईल व परीक्षा देणे असाक्षरांना सोपे होईल. त्यामुळे आपण आपल्या स्तरावरुन सराव प्रश्नपत्रिका व आदर्श उत्तरपत्रिका ई मेल व WhatsApp ग्रुपच्या माध्यमातून नियमित सर्व शाळांपर्यंत पोहचतील याबाबत दक्षता घ्यावी व शाळांना भेटी देऊन प्रश्नपत्रिका सरावाबाबत नियमित आढावा घ्यावा.
सोबत : प्रश्नपत्रिका सराव लिंक-
आदर्श उत्तरपत्रिका लिंक
अधिक माहितीसाठी SCERT च्या maa.ac.in या वेबसाईटला भेट द्यावी.
ALSO READ –
Organisation of Second Foundational Literacy and Numeracy Assessment Test (FLNAT) for the FY 2024-25 under ULLAS Nav Bharat Saksharta Karyakram on 23rd March, 2025
विषय :- केंद्रपुरस्कृत उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत (ULLAS – NBSK) सन २०२४-२५ मध्ये आयोजित करावयाच्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (FLNAT) बाबत.
महोदय,
उपरोक्त संदर्भीय विषयान्वये, राज्यातील सर्व जिल्हयांमध्ये रविवार दि. २३/०३/२०२५ रोजी सकाळी १०.०० ते सायं. ५.०० या वेळेत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (FLNAT) चे आयोजन करण्याबाबत निर्देश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार आपल्या जिल्हयातील विविध केद्रावर मार्गदर्शन व नियोजनानुसार सदर चाचणीचे आयोजन करण्यात यावे.
आपल्या जिल्हयातील विविध परीक्षा केंद्रांवर प्रविष्ट होणा-या परीक्षार्थीची अचूक संख्या पुढील नमुन्यात दि.२८/०२/२०२५ (सोमवार) पर्यंत विनाविलंब या कार्यालयास सादर करावी. सदर माहिती केंद्रशासनास सादर करावयाची असल्याने विलंब टाळावा.
दि.२३/०३/२०२५ रोजी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (FLNAT) परीक्षेला प्रविष्ट होणा-या असाक्षरांची संख्या
दि.२३/०३/२०२५ रोजी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (FLNAT) परीक्षेला प्रविष्ट होणा-या साक्षरांची संख्या
अ.क्र. जिल्हा स्त्री पुरुष तृतीपंथी एकूण
Details of Learners FLNAT under ULLAS
शिक्षण संचालक,
शिक्षण संचालनालय (योजना) तथा
सदस्य सचिव, राज्य साक्षरता अभियान प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे
प्रति,
१) शिक्षणाधिकारी (योजना) जिल्हा परिषद (सबै)
२) शिक्षण निरीक्षक, मुंबई (दक्षिण पश्चिम/उत्तर)
३) शिक्षणाधिकारी प्रशासनाधिकारी, मनपा/नपा (सबै)
ULLAS NBSK Survey
F. No. 6-1/2023-AE-2
Government of India
Ministry of Education
Department of School Education & Literacy (Adult Education Bureau)
Shastri Bhawan, New Delhi, Dated, the 18th February, 2025
Subject: Organisation of Second Foundational Literacy and Numeracy Assessment Test (FLNAT) for the FY 2024-25 under ULLAS Nav Bharat Saksharta Karyakram on 23rd March, 2025 – Reg.
Madam/Sir,
The Centrally Sponsored Scheme ULLAS – Nav Bharat Saksharta Karyakram” is being implemented since FY 2022-23. The 1st Foundational Literacy and Numeracy Assessment Test (FLNAT) for the year 2024-25 was conducted successfully in the country on 22.09.2024, to access the neo-literates and certify them as Literate.
- The 2nd FLNAT under ULLAS Nav Bharat Saaksharta Karyakram for FY 2024-25 to assess three skills, i.e. Reading with understanding, Writing and Numeracy will be held on 23rd March, 2025 (Sunday) in all States/UTs from 10.00 A.M. to 5.00 P.M. in the schools registered under UDISE in offline mode.
- Sets of Questions Answer Booklets (QABs) in English and Hindi languages, prepared and provided by NIOS, along with Learning Outcomes for Assessment and Question-wise instructions will be circulated to all States/UTs shortly.
- All States/UTs are requested to organize FLNAT on 23rd March, 2025, between 10.00 A.M. to 5.00 P.M. in offline mode. All necessary arrangements for the Assessment Test (FLNAT) shall be made by the respective States and UTS.
- All the States and UTs may kindly confirm the organisation of FLNAT on the aforesaid date, not later than 28.02.2025, positively. Registration process may be started for assessment of each learner in the prescribed format (enclosed), immediately. The final numbers may be communicated latest by 10.03.2025 in the Google Form Link:
- https://forms.gle/GFSK1RPyXcaXc2JE7. It should be Appreciated that all learners as per target should participate in the assessment to achieve maximum impact.
- This issues with the approval of Competent Authority.
Encl.: As Above.
Yours faithfully,
Director DoSEL, Government of India
To
The Additional Chief Secretary/Principal Secretary/Secretary, Department of School Education
All States and UTs