National Technology Day

National Technology Day आज राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस आजच्या दिवशी ११ मे १९९८ रोजी भारत सरकारने पोखरण, राजस्थान येथे यशस्वी आण्विक परीक्षा केली. हा दिवस इतिहासात ‘पोखरण अणु चाचणी’ आणि अंतराळातील मोठी प्रगती म्हणून ओळखला जातो.

Din
National Technology Day आज ११ मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस या विशेष दिनावर आधारित प्रश्न मंजुषा सोडवा आणि आकर्षक ई प्रमाणपत्र ई मेलवर प्राप्त करा
राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस
आज ११ मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस,  ११ मे रोजी का साजरा करतात हा दिवस ? जाणून घ्या …..
भारताने तंत्रज्ञानामध्ये केलेल्या प्रगतीची साक्ष देणारा आजचा दिवस असल्याने येणाऱ्या प्रत्येक पिढीला प्रगती करण्याची प्रेरणा देण्यासाठी ११ मे हा दिवस ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस’ म्हणून पाळण्याची घोषणा तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी केली होती.

राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस  National Technology Day अधिक माहिती जाणून घेण्यासाठी फक्त स्पर्श करा
११ मे १९९८ रोजी भारताने एरोस्पेस अभियंता आणि दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली राजस्थान येथील भारतीय लष्कराच्या पोखरण चाचणी क्षेत्रात शक्ती – या आण्विक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीपणे पार पाडली.
दोन दिवसानंतर लगेचच, पोखरण-II  ऑपरेशन शक्ती पुढाकारचा एक भाग म्हणून यशस्वीपणे आणखी दोन आण्विक चाचण्या घेतल्या. या चाचण्यांमुळे भारत राष्ट्रांच्या ‘ न्यूक्लियर क्लब ‘ मध्ये सामील होणारा सहावा देश ठरला आणि नॉन-प्रोलीफरेशन ऑफ न्यूक्लियर वेपन तहामध्ये, भागीदार नसलेला प्रथम देश बनला.  
११ मे १९९८ रोजी संरक्षण संशोधन व विकास संघटना आर्थात DRDO कडून ‘त्रिशूल’ क्षेपणास्त्राची अंतिम चाचणी पूर्ण केली गेली. जे नंतर भारतीय लष्कर आणि भारतीय वायुसेनेत समाविष्ट करण्यात आले. कमी पल्ल्याचे, जलद – प्रतिक्रिया देणारे, जमिनीवरून हवेत मारा करणारे SAM क्षेपणास्त्र ‘त्रिशूल’ हा भारतातील एकात्मिक गाइडेड क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाचा एक भाग होता. National Technology Day
‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन’ म्हणून कोणत्या दिवशी साजरा केला जातो.
उत्तर – ११ मे
‘पोखरण अणु चाचणी’ केंव्हा घेतली ?
उत्तर – ११ मे १९९८
‘पोखरण अणु चाचणी’ घेतली तेंव्हा पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी होते ? 
उत्तर – ‘बरोबर’
११ मे हा दिवस ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस’ म्हणून का पाळल्या जातो ?
उत्तर – भारताने तंत्रज्ञानामध्ये केलेल्या प्रगतीची साक्ष देणारा आजचा दिवस असल्याने येणाऱ्या प्रत्येक पिढीला प्रगती करण्याची प्रेरणा देण्यासाठी ११ मे हा दिवस ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस’ म्हणून पाळण्याची घोषणा केली
‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस’ म्हणून कोणत्या वर्षी पासून पाळल्या जातो ?
उत्तर – सन १९९९ पासून
११ मे १९९८ याच दिवशी भारताने कोणत्या क्षेपणास्त्राची यशस्वीरीत्या चाचणी केली होती.
उत्तर – ‘ऑपरेशन शक्ती’
भारताने बंगळूरच्या राष्ट्रीय एरोस्पेस प्रयोगशाळांनी विकसित केलेले पहिले स्वदेशी विमान ची यशस्वी चाचणी केली.
उत्तर – ‘हंसा-३’
तंत्रज्ञान विकास मंडळ / TDB  यांच्या नेतृत्वात ‘ राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस’ हा दिवस साजरा केला जातो.
उत्तर – बरोबर
‘पोखरण अणु चाचणी’ घेतली टे ठिकाण भारतातील कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर – राजस्थान
सूचना –
सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहेत
तुमचा ईमेल बरोबर नोंदविल्याची खात्री करा
तुम्ही नोंद्विलेल्या ईमेल वर ईप्रमाणपत्र येईल
ईप्रमाणपत्र मिळण्यासाठी ४०% गुण मिळणे अनिवार्य आहे

1 thought on “National Technology Day”

  1. भारताने माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये एक प्रचंड आंदोलन असा प्रगती करून देशामध्ये प्रथम स्थान प्राप्त केलेले आहे

    Reply

Leave a Comment

error: Content is protected !!