National Science Seminar 2025
National Science Seminar 2025
प्रादेशिक विद्या प्राधिकरण, नागपूर (राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था)
नागपूर
क्र. प्राविधा/प्रशा-३/विमे/ 371/२०२५
दिनांकः-१५/०७/२०२५
प्रति,
१. शिक्षण उपसंचालक, विभाग सर्व
२. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सर्व जिल्हा परिषद, सर्व
३. शिक्षण निरिक्षक, सर्व बृहन्मुबई, (पश्चिम/उत्तर/दक्षिण)
विषयः-अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा २०२५
(National Science Seminar 2025)
संदर्भः-शिक्षणाधिकारी तथा प्रादेशिक समन्वयक, रामन विज्ञान केंद्र नागपूर यांचे पत्र क्र.
NO. RSCN/11014/राविस/2025/01/659 DATE 10th July, 2025.
उपरोक्त विषयाकिंत संदर्भीय पत्राचे अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा २०२५ या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाच्या दृष्टीने मार्गदर्शक सूचना व विषय प्राप्त झालेला आहे. त्यानुसार आपल्या जिल्हयातील शासनमान्य सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांना व संबंधित शिक्षकांना सदर विषय व मार्गदर्शक सूचना कळवून प्रत्येक शासन मान्य शाळेतील इयत्ता ८ वी १० वी पर्यंतचे विद्यार्थी या विज्ञानविषयक उपक्रमात सहभाग घेतील या बाबत तातडीने आवश्यक कार्यवाही करावी. प्रत्येक तालुक्यातून प्रथम शाळास्तरावर, नंतर तालुकास्तरावर सदर स्पर्धेचे आयोजन करणेबाबत आवश्यक पाठपुरावा करावा. जिल्हास्तरावरील
स्पर्धा संपन्न झाल्यानंतर विहित कालमर्यादित विभागस्तरावर आयोजन करण्यात यावे. या उपक्रमास प्राधान्य देऊन आपण केलेल्या, कार्यवाहीचा अहवाल त्वरीत या कार्यालयास सादर करावा.
मार्गदर्शक सूचना :-
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक कांयकारणभाव समजून विश्लेषणात्मक विचाराची जागृती करणे. स्पर्धात्मक वैज्ञानिक दृष्टिकोन वृध्दिगत करुन भावी बेज्ञानिकांना विचारांच्या आदान प्रदानाची संधी उपलब्ध करुन देणे, देशात विखुरलेल्या प्रज्ञावान युवकांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृध्दिंगत करणे ही उद्दिष्टे समोर ठेवून राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद, कोलकत्ता दरवर्षी अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्याचे (National Science Seminar) आयोजन करीत असते.
या वर्षी विज्ञान मेळाव्याचा विषय पुढीलप्रमाणे आहे (National Science Seminar-2025)
अ) इंग्रजी: “Quantum Age Begins: Potentials & Challenges”
च) हिंदी क्वांटम युग का आगाज संभावनाएं और चुनौतिया
क) मराठी: क्वांटम युगाची सुरुवात संभाव्यता व आवाहने
स्पर्धेचे नियम व अटी पत्रात नमुद केलेल्या आहेत.
या वर्षी राष्ट्रीय पातळीवरील विद्यार्थी विज्ञान मेळाव्याचे आयोजन ३० ऑक्टोबर २०२५ ला विश्वेश्वरैया औद्योगिक व प्रौद्योगिकी संग्रहालय, बेंगलुरू येथे करण्यात आलेले असून आपल्या महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी विज्ञान मेळाव्याचे आयोजन पुढील प्रमाणे करण्यात यावे.
१. प्रथम प्रत्येक शाळास्तरावर यास्पर्धेचे आयोजन करण्यात यावे. एक उत्कृष्ट विद्यार्थी तालुकास्तरावर पाठवावा.
२. तालुकास्तरावर दिनांक ०१/०८/२०२५ ते १५/०८/२०२५ दरम्यान एक दिवसाची स्पर्धा आयोजीत करुन प्रत्येक तालुका पातळीवरील गुणानुक्रमे येणा-या दोन विद्यार्थ्यांची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी करण्यात यावी. जिल्हास्तरावरील एक दिवसीय स्पर्धेचे आयोजन प्रत्येक जिल्हयाचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) /शिक्षणनिरीक्षक-मुंबई वींनी दिनांक १६/०८/२०२५ ते ३१/०८/२०२५ या दरम्यान करावे.
३. प्रत्येक जिल्हयातून गुणानुक्रमे दोन (२) विद्यार्थ्यांची निवड विभागीय स्पर्धेसाठी करण्यात यावी तालुका व जिल्हास्तरावरील विहित नमुन्यात सांख्यिकीय माहितीसह अहवाल शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक यांना तसेच या कार्यालयास दिनांक ०१/०९/२०२५ पर्यंत सादर करावा.
४. प्रत्येक शैक्षणिक विभागात दिनांक ०१/०९/२०२५ ते १५/०९/२०२५ या कालावधीत विद्यार्थी विज्ञान मेळाव्याचे आयोजन शिक्षण उपसंचालक यांनी करुन गुणानुक्रमे फक्त दोन विद्यार्थ्यांची निवड करावी. संबंधित दोन विजेत्यांना राज्यस्तरीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात सहभागी राहण्याच्या सूचना संबंधित शाळांना शिक्षणाधिकारी (माध्यमिक) / शिक्षणनिरीक्षक-मुंबई यांनी द्याव्यात. त्याचप्रमाणे राज्यस्तरीय स्पर्धेकरीता निवडप्प्राप्त विद्यार्थ्यांची/विद्यार्थिनीची यादी पूर्ण नाव, शाळेचे नाव व भाषणाचे माध्यमासह या कार्यालयाकडे दिनांक १७/०९/२०२५ पर्यंत मिळेल या बेताने ई-मेलने तात्काळ पाठवावी.
५. विभाग स्तरावरील निवड झालेल्या विद्यार्थी/विद्यार्थिनींचे प्रत्येकी दोन पासपोर्ट साईज फोटो व भाषणाच्या तीन प्रती तसेच भाषण मराठी/हिंदीतून असल्यास त्यांचे इंग्रजी अनुवाद केलेल्या तीन प्रती राज्यस्तरावरील स्पर्धेचे वेळी सादर करण्याच्या सूचना संबंधित शाळेचे मार्गदर्शक शिक्षक व स्पर्धकाला द्याव्यात.
६. राज्यस्तरीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यामध्ये प्रत्येक विभागातून प्रथम व व्दितीय असे निवड झालेले दोन प्रमाणे आठ विभागातून एकूण सोळा (१६) विद्यार्थी सहभागी करुन घेतल्या जातील, यामधून राष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थी विज्ञान मेळाव्यासाठी राज्यस्तरावरुन गुणानुक्रमे प्रथम येणा-या एका विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल.
७. राज्यस्तरीय विद्यार्थी विज्ञान मेळावा २०२५ चे आयोजन २५ सप्टेबर २०२५ च्या पूर्वी राज्यस्तरावर घेण्याचे प्रस्तावित आहे. याबाचत स्थळ व इतर आवश्यक सूचना तात्काळ कळविण्यात येतील.
८. राष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थी विज्ञान मेळावा २०२५ चे आयोजन ३० ऑक्टोबर २०२५ रोजी विश्वेश्वरैया औद्योगिक व प्रौद्योगिकी संग्रहालय, बेंगलुरू येथे करण्यात आले असून राज्यस्तरावरील एका विद्यार्थ्यांला या संस्थेकडून तसे पत्र घेऊन त्यास्पर्धेत सहभागी व्हावे लागेल. याबाबत लेखी सूचना राज्यस्तरीय स्पर्धेचे दिवशी देण्यात येईल.
९. अधिक माहितीसाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक यांनी पुढील नमुद वेबसाईटवर संपर्क साधावा. Website: www.vismuseum.gov.in
स्पर्धे मध्ये सहभागी विद्यार्थ्यांचे मुल्यांकन खालील प्रमाणे करण्यात येईल.
अखिल भारतीय महाराष्ट्र राज्य विद्यार्थी विज्ञान मेळावा २०२५ नियम व अटी
(तालुका जिल्हास्तरीय व विभागीय स्वरावरील स्पर्धेसाठी नियम व अटी खालीलप्रमाणेच राहतील)
१) संयोजक: राज्य विज्ञान शिक्षण संस्था रवीनगर, नागपूर.
२) मुख्यविषय : अ) इंग्रजी
“Quantum Age Begins: Potentials & Challenges”
ब) हिंदी
क्वांटम युग का आगाज संभावनाएं और चुनौतिया
क) मराठी: क्वांटम युगाची सुरुवात संभाव्यता व आवाहने
३) भाग कोण घेऊ शकतो? इयत्ता ८ वी ते १० वी पर्यंत शिकणारे विद्यार्थी (एका शाळेतून
फक्त एक)
४) भाषा व भाषणात दिला जाणारा कालावधी व पद्वती विद्यार्थी स्वतः भाषण इंग्रजी, हिंदी, मराठी किंवा इतर शासनमान्य भाषेतून देऊ शकतो. विद्यार्थ्याला भाषणासाठी केवळ सहा (6) मिनिटे वेळ देण्यात येईल. भाषण संपताच परीक्षक भाषणाचे विषयावर दोन मिनिटे पर्यंत तीन प्रश्न विचारतील. विद्याध्यांनी त्यापैकी कमीत कमी दोन प्रश्नांची उत्तरे देणे अपेक्षित आहे. स्पर्धकांसाठी भाषणापूर्वी लेखी आशयक्षमता चाचणी परीक्षेचे आयोजन केले
जाईल. ही परीक्षा १० गुणांची असून एकूण २० प्रश्न दिलेले असतील.
५) श्रेणीपट्टी :
१) सादरीकरणातील वैज्ञानिक माहिती
४० गुण
२) नाविन्यपूर्ण दृक साहित्य वापरासाठी
१५ गुण
३) भाषणाचा ओघ
४) प्रश्नांची उत्तरे देण्याची क्षमता
२५ गुण
अ) लेखी आशय क्षमता चाचणी (२० प्रश्नांसाठी) –
१० गुण
ब) भाषणानंतर तोंडी विचारलेल्या प्रश्नांच्या योग्य उत्तरासाठी (३ प्रश्न)-
१० गुण
एकुण गुण
१००
६) चार्ट आणि पोस्टर्स :-
1) भाषणासाठी आवश्यक असलेले चार्ट व पोस्टर्स विद्यार्थ्यांनीच तयार केलेले असावेत.
एका भागावरील चार्ट पोस्टर हा एक चार्ट किंवा पोस्टर म्हणून गणण्यात येईल.
भाषणाच्यावेळी विद्यार्थ्यास त्याचा स्वतःवापर करावा लागेल. सादरीकरणाच्या वेळी इतर कोणीही (पालक शिक्षक अथवा इतर मदतनीस) संबंधित स्पर्धकास मदत करणार नाही.
सर्व चाटर्स व पोस्टर्स एकाच आकाराचे ८५० मिलिमिटर (रूद) व ६०० मिलिमीटर (उंच) असावेत ते दर्शनी ठिकाणी चिकटवलेले/टांगलेले असावेत. त्याचा दिनदर्शिकेप्रमाणे वापर करावा. किंवा.
iii) स्लाईड ३५ मि.मि. आकाराची असून प्लास्टिक फेम मध्ये असावी किंवा
iv) ओव्हेरहे प्रोजेक्टर स्लाईड ए ४ आकाराच्या साईजची असावी. जेणेकरून त्याचे पूर्णतः प्रोजेक्शन होईल किवा
v) संगणक स्लाईडही अॅनिमेशन. पॉप-अॅप्स रोल ओव्हर इत्यादी गुणधर्म असलेली नसावी. एकावेळी एकच स्लाईड विचारात घेतली जाईल
vi) इकसाहित्य, स्लाईड, पोस्टर किंवा चार्ट जास्तीत जास्त पाच असावे त्यापेक्षा जास्त साहित्याचा विचार केला जाणार नाही.
०७) त्रिमितीय प्रतीकृती, व्हिडीओ, फिल्म्स याचा वापर सादरीकरणासाठी मान्य केला जाणार नाही.
०८) पंच (Judges): श्रेणीपध्दतीने विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी स्पर्धेच्या वेळी तीन (३) पंथ असावे. महाविद्यालीन विभाग, विद्यापिठ किंवा संशोधन विभाग, पर्यावरण संस्था या सारख्या शैक्षणिक सस्थामधील
विषयाशी संबंधित मान्यवर व्यक्तीना शक्यतो पंचाचे कामे सोपवावे.
सहभागी शाळेतील, क. महावीद्यालयातील/सस्थेतील शिक्षकांची पंच म्हणून निवड करू नये.
०९) मेळाव्यातील भाषणे एकादिवसाच्या कालावधीत चाळीस विद्यार्थ्यांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे भाषणे असु नये.
१०) गुणवत्ताक्रम :- नियम ४,५ व ६ मध्ये दिलेल्या गुणविभाजन व निकषा नुसार गुणवत्ता यादी तयारी
करावी, पंचाचा निर्णय अखेरचा राहील. गुणवत्ता यादीत प्रत्येक क्रमांकावर एक आणि फक्त एकच स्पर्धक विद्यार्थी असावा.
११) राज्यस्तरीय पारितोषीके प्रथम पारीतोषीक (फक्त १) रूपये ३५००/-
उत्तेजनार्थ पारीतोषीक (फक्त ६) रूपये १५००/-
१२) राष्ट्रीय स्तरावरील पारितोषिके :-
०१. फक्त एक दरमहा रूपये २०००/- दोन वर्षाकरीता एन.सी.एस.एम. शिष्यवृत्ती.
०२. विशेष पारितोषिके (एकूण गुणानुक्रमे ९) दरमहा रूपये १०००/- दोन वर्षाकरीता
एन.सी.एस.एम. शिष्यवृत्ती.
०३. सहभागी विद्यार्थाना विज्ञान पुस्तके व साहित्य दिले जाईल.
१३) राष्ट्रीयस्तरावरील विद्यार्थी विज्ञान मेळावा दिनांक ३० ऑक्टोबर २०२५ रोजी विश्वेश्वरैया औद्योगिक व प्रौद्योगिकी संग्रहालय, बेंगलुरू येथे आयोजीत करण्यात येईल.
१४) विशेष सुचना: विषय सादरी करणाच्या वेळी कोणत्याही शाळेतील शिक्षक/मदतनीस यांना सहभागी विद्यार्थाना मदत करण्यासाठी व्यासपीठावर परवानगी देण्यात येणार नाही. यात अपंग विद्यार्थी बाबत अपवाद असेल,
राष्ट्रीय स्पर्धेत राज्यस्तरीय स्पर्धेतून गुणानुक्रमे प्रथम आलेल्या एका विद्यार्थ्यास भाग घेता येईल. वरील ठिकाणी फक्त संबंधित एका शिक्षकाला स्पर्धकासोबत जाता येईल. राष्ट्रीय स्पर्धाकरीता निवड प्राप्त विद्यार्थी व शिक्षकाचा येण्याजाण्याचा फक्त प्रवास खर्च (बस किया द्वितीय श्रेणी रेल्वे भाडे) आयोजकाकडून संबंधित ठिकाणी देण्यात येईल.
राज्य स्तरावर संहभागी विद्यार्थ्यास (बस किंवा द्वितीय श्रेणी रेल्वे भाडे) प्रवास भाडे राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर कडून देण्यात येईल. तथापी शिक्षकांचा प्रवास व दैनिक भत्ता खर्च संबधित शाळानी त्यांच्या आस्थापनेवरून करावा.
सोबत :- अधिक माहितीसाठी National Science Seminar-2025 माहितीपत्र.
टिपः राज्यस्तरीय सहभागी विद्याथ्यांनी त्यांचे सोबत शाळेच्या मुख्याध्यापकाने प्रमाणित केलेली जन्मतारीख पुरावा व एस.टी. बस किंवा रेल्वे (व्दितीय श्रेणी) प्रवास भाडयाचे तिकिटे सोबत आणावे.
परिपत्रक पीडीएफ मध्ये प्राप्त करा या ओळीला स्पर्श करून
संचालक
राज्य विज्ञान शिक्षण संस्था (प्रादेशिक विद्या प्राधिकरण) रविनगर, नागपुर
प्रत : माहितीस्तव सविनय सादर
१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, विस्तारभवन, मुबई-३२
२. मा. ओयुक्त (शिक्षण), आयुक्त कार्यालय महाराष्ट्र राज्य, पूणे.
३. मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महारष्ट्र, सदाशिव पेठ,पूणे.
४. मा. शिक्षण संचालक, (माध्यमिक व उच्च माध्यमिक), शिक्षण संचालनालय,
महाराष्ट्र राज्य, पुणे.
५. मा. शिक्षण संचालक, (प्राथमिक) शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पूणे,