Muslim candidates wearing burqa allowing in class 12th examination

Muslim candidates wearing burqa allowing in class 12th examination इयत्ता १२ वी परीक्षेस मुस्लिम परीक्षार्थींना बुरखा घालून परीक्षा देण्यास परवानगी देण्याबाबत

image 2

Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education, Pune

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे

क्र.रा.म./परीक्षा-५/१७22 दिनांकः-१५/०२/२०२०

प्रति,

विभागीय सचिव,

पुणे विभागीय मंडळ पुणे

विषयः- इयत्ता १२ वी परीक्षेस मुस्लिम परीक्षार्थींना बुरखा घालून परीक्षा देण्यास परवानगी देण्याबाबत…

संदर्भः-

१. राज्य मंडळाचे क्र.रा.मं/परीक्षा-५/१०१२, दिनांक २७/०२/२०१७ चे पत्र

२. बेग मोमिना मिर्झा अखतर या विद्यार्थिनीचा दिनांक १४/२/२०२० रोजीचा ईमेल

उपरोक्त विषयाबाबत आपणास कळविण्यात येते की, कु.बेग मोमिना मिर्झा अखतर ही विद्यार्थिनी फेब्रु-मार्च २०२० ३.१२ परीक्षेत आपल्या विभागीय मंडळामार्फत प्रविष्ठ होणार आहे. सदर विद्यार्थीनीने परीक्षेच्या वेळी बुरखा परिधान करून परीक्षा देण्यास परवानगी मिळावी अशी विनंती संदर्भ क्र.२ नुसार या कार्यालयास केली आहे.

मंडळामार्फत आयोजित इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी परीक्षेस मुस्लिम परीक्षार्थी विद्यार्थीनींना परीक्षेच्या वेळी बुरखा परिधान करून परीक्षा देण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच परीक्षेच्या वेळी आवश्यकता वाटल्यास प्रकरणपरत्वे तपासणीसाठी महिला पोलिस अधिकारी किंवा महिला शिक्षक कर्मचारी यांची नेमणूक करण्यासंदर्भात सर्व केंद्रसंचालकांना सूचित करण्यात यावे. तसेच याप्रकरणी कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत याची कटाक्षाने दक्षता घ्यावी व त्यानुसार कार्यवाही करण्यात यावी असे संदर्भ क्र. १ नुसार कळविण्यात आलेले आहे.

तरी बेग मोमिना मिर्झा अखतर या विद्यार्थिनीचा अर्ज पुढील कार्यवाहीसाठी आपल्या विभागीय मंडळास पाठविण्यात येत आहे. सदर अर्जाबाबत दिनांक २७/०२/२०१७ रोजीच्या पत्रानुसार उचित कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्यमंडळास सादर करावा.

सचिव,

राज्य मंडळ, पुणे

प्रत –

१) विभागीय सचिव, अन्य विभागीय मंडळे

२) कु. बेग मोमिना मिर्झा अखतर, आकुर्डी, पुणे

मित्रांनो  Click to Download    टिचकी मारा १५ सेकंद थांबा त्यानंतर   Download File वर टिचकी मारा    
Download File

Leave a Comment

error: Content is protected !!