मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-३” अभियान (सन २०२५-२६) शाळामूल्यांकन वेळापत्रक मुल्यांकन सुविधा ऑनलाईन करण्याचे वेळापत्रक Mukhymantri Mazi Shala Sundar Shala Tappa Three Shala Mulyankan Velapatrak

Mukhymantri Mazi Shala Sundar Shala Tappa Three Shala Mulyankan Velapatrak

Mukhymantri Mazi Shala Sundar Shala Tappa Three Shala Mulyankan Velapatrak

mukhymantri Mazhi Shala Sundar Shala abhiyan tappa tin Shala mulyankan velapatrak

CMMSSS Phase 3

Online assessment schedule Time table

School Evaluation Schedule Schedule for making evaluation facilities online

Schedule for making assessment facilities online

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

“मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान टप्पा-३ (सन २०२५-२६) राबविणे बाबत ..

जा.क्र.शिसंमा/मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा मुदतवाढ/ए-२/विद्या शाखा/२०२५-२६/5733
दि.०२/०१/२०२६

महत्वाचे /कालमर्यादित/ई-मेल व्दारे

विषय :- “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” अभियान टप्पा-३ (सन २०२५-२६)

संदर्भ :-
१. शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण-२०२५/प्र.क्र.१३८/एसडी-६, दिनांक १६/१०/२०२५.
२. शिक्षण आयुक्तालयाचे पत्र क्र. आशिका/मुमंमाशासुशा/२०२५/१४४/१/१५१४२४८ /२०२५, दि.३०/१०/२०२१५
३. शिक्षण आयुक्तालयाचे पत्र क्र. आशिका/मुर्ममाशासुशा/२०२५/१४४/१/१५६९५४३ /२०२५, दि.२८/११/२०२५
४. संचालनालयाचे पत्र जा.क्र. शिसंमा/मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा/ए-२/विद्या शाखा/२०२५-२६/१५७५७४२ दि.०२/१२/२०२५
५. संचालनालयाचे पत्र जा.क्र. शिसंमा/मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा/ए-२/विद्या शाखा/२०२५-२६/५५६४ दि.१०/१२/२०२५.
६. संचालनालयाचे पत्र जा.क्र. शिसंमा/मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा/ए-२/विद्या शाखा/२०२५-२६/५६०६ दि.१५/१२/२०२५
७. शासन निर्णय क्रमांक संकीर्ण२०२५/प्र.क्र.१३८/एसडी-६ दिनांक १५/१२/२०२५
८. संचालनालयाचे पत्र जा.क्र. जा.क्र. शिसंमा/मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा/ए-२/विद्या शाखा/२०२५-२६/५५०७ व ५५०६ दि.१८/१२/२०२५
९. शिक्षण आयुक्तालयाचे पत्र क्र. आशिका/आस्था-१४४/मुममाशासुशा/२०२५/१६१४३५९/२०२५, दि.१९/१२/२०२५.
१०. संचालनालयाचे पत्र क्रमांक जा.क्र. शिसंमा/ मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा मुदतवाढ/ए-२/विद्या शाखा/२०२५-२६/५६६२/दि.१९/१२/२०२५
११. शिक्षण आयुक्तालयाचे पत्र क्र. आशिका/मुमंमाशासुशा/२०२५/आस्था-१४४/१६३५३४१/२०२५, दि.३०/१२/२०२५.
१२. संचालनालयाचे पत्र क्रमांक जा.क्र. शिसंमा/मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा मुदतवाढ/ए-२/विद्या शाखा/२०२५-२६/५७१७/दि.३१/१२/२०२५

उपरोक्त विषयास अनुसरुन आपणांस कळविण्यात येते की, संचालनालयाच्या संदर्भ क्रमांक ४, ५, ८, १० व १२ च्या पत्रान्वये सन २०२५-२६ मध्ये मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-३ या अभियान राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांकरिता राबविण्यात येत आहे. असे सूचित करण्यात आलेले आहे.


शिक्षण आयुक्तालयाच्या संदर्भ क्रमांक २ च्या पत्रान्वये सदर अभियान राबविण्याबाबतच्या सर्वकष सुचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. तसेच संदर्भ क्रमांक ७ च्या शासन निर्णय दिनांक १५/१२/२०२५ अन्वये शाळांच्या गुणांकनाबाबतच्या सुधारित सुचना देण्यात आलेल्या आहेत.

उक्त प्रकरणी दोन्ही शासन निर्णयातील सुचना आपले स्तरावर सविस्तर गुणांकन करणाऱ्या समितीच्या निदर्शनास आणून द्याव्यात. तसेच दिनांक १६/१०/२०२५ च्या शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक ४ मध्ये नमूद उपक्रमाबाबत शाळेमध्ये राबविण्यात येणाऱ्या केंद्र व राज्य शासनाच्या उपक्रम/अभियान/योजनांची अद्ययावत स्थिती गुणांकन करताना विचारात घेण्यात यावी.


तथापि, दिनांक ०२/०१/२०२६ रोजी ५०३० शाळांनी माहिती अपूर्ण भरलेली आहे. (जिल्हानिहाय दिनांक ०२/०१/२०२६ रोजीचा अहवाल सोबत जोडला आहे.) प्रलंबित शाळांनी माहिती अंतिम करण्यास दिनांक ०४/०१/२०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. तरी सर्व शाळांनी माहिती अंतिम होईल याची दक्षता घेण्यात यावी.


केंद्रस्तरावर मूल्यांकन बाबतची माहिती दिलेली आहे. केंद्र स्तरावर विहित कालावधीत दिनांक ०९ जानेवारीपर्यंत शाळांचे मूल्यांकन पूर्ण करण्यात यावे. (सोबत अहवाल जोडला आहे.)


सदर अभियान कालमर्यादित आहे सदर काम वेळेत पूर्ण होण्याबाबत आपल्या स्तरावरुन आपल्या जिल्हयातील सर्व शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक/प्राचार्य यांची व्ही.सी.आयोजित करून मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-३ अभियानामध्ये माहिती भरण्यास सूचित करावे. तसेच आपल्या अधिनस्त सर्व १०० टक्के शाळा अभियानात माहिती भरतील याची दक्षता घ्यावी.

शिक्षण उपसंचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक)
महाराष्ट्र शासन
शिक्षण संचालनालय
(माध्यमिक व उच्च माध्यमिक)
महाराष्ट्र राज्य, पुणे

महत्वाची सूचना

  1. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा-3 मध्ये दिनांक 19.12.2025 रोजीच्या पत्रान्वये निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार शाळांना माहिती भरुन अंतिम करण्यासाठी दिनांक 29/12/2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती.
  2. तथापि, अदयापही ब-याच शाळांची माहिती अंतिम झालेली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शाळांना माहिती अंतिम (Finalize) करण्यासाठी दिनांक 01/01/2026 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे, याची नोंद घ्यावी.
  3. तसेच शाळांनी माहिती भरण्यासाठी शेवटच्या दिवसापर्यंत वाट न पाहता तातडीने दिलेल्या मुदतीत माहिती अंतिम (Finalize) करावी.

महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे

क्र. आशिका/मुर्ममाशासुशा/२०२५/१४४/

दिनांक: /11/2025

विषय : “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान टप्पा-३ (सन २०२५-२६) राबविणे बाबत ..

संदर्भ : १. शासन निर्णय, क्रमांकः संकीर्ण-२०२५/प्र.क्र.१३८/एसडी-६, दिनांक १६ ऑक्टोबर, २०२५ २. क्र. आशिका/मुमंमाशासुशा/२०२५/१४४/१/१५१४२४८/२०२५, दि. ३०/१०/२०२५

सन २०२३-२४ मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अनोखे स्पर्धात्मक अभियान राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरीता दि. ०१.०१.२०२४ ते दि. १५.०२.२०२५ या कालावधीत राबविण्यात आले. या अभियानास विद्यार्थी व शिक्षकांबरोबरच माजी विद्यार्थी, पालक व शिक्षणप्रेमी नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. जवळपास ९५% शाळांमधील सुमारे २ कोटी विद्यार्थी या अभियानांतर्गत विविध उपक्रमात सहभागी झाले होते. त्यामुळे हे अभियान मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरले. या अभियानातील काही उपक्रमांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये देखील झाली आहे.

२/- सन २०२४-२५ (टप्पा-२) मध्ये सदर अभियान राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरीता दि.२९.०७.२०२४ ते दि. १५.०९.२०२४ या कालावधीत राबविण्यात आले. या अभियानात जवळपास ९७,६२८ शाळांनी या अभियानांतर्गत विविध उपक्रमात सहभागी झाले होते. त्यामुळे हे अभियान मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरले.

३/-संदर्भ क्र.१ वरील शासन निणर्यान्वये शासनाने सन २०२५-२६ मध्ये देखील “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा-टप्पा ३” या अभियानाचा कालावधी दि. ०३ नोव्हेंबर २०२५ ते दि.३१ डिसेंबर २०२५ यादरम्यान राबविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सदर अभियान राबविण्याबाबत सूचना संदर्भीय पत्र क्र. २ अन्वये देण्यात आलेल्या आहेत.

४/- या अभियानामध्ये शाळा स्तरावरुन माहिती अंतिम करणे, केंद्र, तालुका, जिल्हा, मनपा, विभाग, राज्य स्तर यानुसार शाळा मूल्यांकनाचे वेळापत्रक तयार करुन ते सोबत जोडले आहे. शासन निर्णय, दि. १६/१०/२०२५ अन्वये निश्चित केलेल्या मूल्यांकन समितीकडून शाळांचे मूल्यांकन दिलेल्या वेळापत्रकानुसार पूर्ण करुन माहिती अंतिम करावयाची आहे.

५/- सदर अभियान हे अत्यंत कालमर्यादित स्वरुपाचे असून त्याचा मा. मुख्यमंत्री कार्यालयाकडून वेळोवेळी आढावा घेण्यात येतो. त्यामुळे सोबत जोडलेल्या वेळापत्रकामध्ये कोणत्याही परिस्थितीत बदल केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. तसेच शाळांकडून वा इतर कोणत्याही स्तरावर एकदा भरलेली माहिती ही अंतिम असेल, त्यामध्ये पुन्हा बदल करण्याची सुविधा उपलब्ध होणार नाही. याची देखील नोंद घ्यावी. याबाबत आपल्या स्तरावरुन सर्व संबंधितांना सूचित करावे.

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा तीन शाळा नोंदणी लिंक

https://education.maharashtra.gov.in/schoolMMSSS/users/login/4

वरीलप्रमाणे सोपविण्यात आलेल्या जबाबदारीनुसार व कार्यपद्धतीनुसार विहित वेळापत्रकाप्रमाणे कामकाजाचे अचूक नियोजन करुन सदर टप्पा-३ अभियान हे यशस्वीरित्या पार पाडले जाईल याची सर्वांनी वैयक्तिकरित्या दक्षता घ्यावी.

🏫 मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-३” अभियान (सन २०२५-२६)
शाळामूल्यांकन वेळापत्रक
मुल्यांकन सुविधा ऑनलाईन करण्याचे वेळापत्रक वाचण्यासाठी किंवा पीडीएफ मध्ये प्राप्त करण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा

परिपत्रक पीडीएफ प्रत लिंक

आयुक्त, शिक्षण
महाराष्ट्र राज्य, पुणे

Mukhymantri Mazi Shala Sundar Shala Tappa Three Shala Mulyankan Velapatrak
Mukhymantri Mazi Shala Sundar Shala Tappa Three Shala Mulyankan Velapatrak

प्रति,

१) संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.
२) आयुक्त, मनपा (सर्व)
३) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)
४) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), शिक्षण संचालनालय, पुणे
५) शिक्षण संचालक (प्राथमिक), शिक्षण संचालनालय, पुणे
६) शिक्षण संचालक (योजना), शिक्षण संचालनालय, पुणे.
विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)
८) प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)
९) शिक्षणाधिकारी/प्रशासन अधिकारी, महानगरपालिका (सर्व)
१०) शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक/योजना) जिल्हापरिषद (सर्व)
११) शिक्षणनिरीक्षक (दक्षिण/पश्चिम/उत्तर) बृहन्मुंबई
१२) मुख्याधिकारी, नगरपालिका (सर्व)
१३) गटविकास अधिकारी, पंचायत समिती (सर्व)

This page has been viewed 2008 times.

Leave a Comment

error: Content is protected !!