मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” अभियान टप्पा-३ (सन २०२५-२६) राबविणे बाबत Implementation Of Mukhymantri Mazi Shala Sundar Shala Tappa Tin

Implementation Of Mukhymantri Mazi Shala Sundar Shala Tappa Tin

Implementation Of Mukhymantri Mazi Shala Sundar Shala Tappa Tin

Regarding the implementation of “Chief Minister, My School, Beautiful School” campaign Phase-3 (Year 2025-26)

“मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” अभियान टप्पा-३ (सन २०२५-२६) राबविणे बाबत ..

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

“मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-३” अभियान (सन २०२५-२६)

१.शाळामूल्यांकन वेळापत्रक :

अ) शाळा स्तरावरुन माहिती अंतिम करण्याचा सोमवार, दि.०१/१२/२०२५ ते शुक्रवार दि. १९/१२/२०२५

ब) केंद्रस्तर/युआरसीः
दि.२०/१२/२०२५ शनिवार (माहिती अंतिम झाली त्यांच्याकरीता) ते दि.०९/०१/२०२६ शुक्रवार सायं.०५.०० वा. पर्यंत

क) तालुका : दि.२२/१२/२०२५ सोमवार (केंद्र/युआरसी पातळीवरुन अंतिम झालेली) ते दि.१६/०१/२०२६ शुक्रवार सायं. ०५.०० वाजेपर्यंत

ड) जिल्हा : दि ०१/०१/२०२६ गुरुवार (तालुका पातळीवरुन अंतिम झालेल्या शाळांचे मूल्यांकन) ते दि.२२/०१/२०२६

गुरुवार सायं. ०५.०० वा.पर्यत

इ) मनपाः दि.०१/०१/२०२६ गुरुवार (ब्लॉक पातळीवरुन अंतिम झालेल्या शाळांचे मूल्यांकन) ते दि. २२/०१/२०२६

गुरुवार सायं. ०५.०० वा. पर्यत

ई) विभाग : दि.१५/०१/२०२६ गुरुवार ते दि. २८/०१/२०२६ बुधवार सायं.०५.०० वाजेपर्यत

उ) राज्य : दि. २७/०१/२०२६ मंगळवार ते दि.०३/०२/२०२६ मंगळवार सायं. ०५.०० वाजेपर्यत

२. मुल्यांकन सुविधा ऑनलाईन करण्याचे वेळापत्रक –

Implementation Of Mukhymantri Mazi Shala Sundar Shala Tappa Tin
Implementation Of Mukhymantri Mazi Shala Sundar Shala Tappa Tin

केंद्र सर्व : प्रत्येक सहभागी शाळांचे मूल्यांकन करणे अभिप्रेत आहे.

तालुका : प्रत्येक केंद्रातून प्रत्येक गटातून पहिली १ शाळा तालुक्याने मूल्यांकनासाठी घ्यावी, त्या मधून निवड होईल.

जिल्हा : तालुक्यातील पहिली १ शाळा प्रत्येक गटातून १ शाळा जिल्हा समितीने मूल्यांकन करावे, त्या मधून निवड होईल.

मनपा : युआरसीमधील पहिली १ शाळा प्रत्येक गटातून १ शाळा समितीने मूल्यांकन करावे, त्या मधून निवड होईल.

विभाग : जिल्हयातील पहिली १ शाळा प्रत्येक गटाकरीता मूल्यांकनासाठी घ्यावी, त्या मधून निवड होईल.

राज्यस्तर : प्रत्येक विभागातील प्रथम क्रमांकामधील शाळांमधून प्रत्येक गटातील १ शाळा मूल्यांकनासाठी घ्यावी, त्या मधून निवड होईल.

महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे

क्र. आशिका/मुमंमाशासुशा/२०२५/१४४/

दिनांक: /10/2025

विषय : “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” अभियान टप्पा-३ (सन २०२५-२६) राबविणे बाबत ..

संदर्भ : १. शासन निर्णय, क्रमांकः मुमंअ २०२३/प्र.क्र.११४/एसडी-६, दिनांक ३० नोव्हेंबर, २०२३

२. शासन निर्णय, क्रमांकः मुमंअ २०२४/प्र.क्र.५२/एससी-६, दिनांक २६ जुलै, २०२४

३. शासन निर्णय, क्रमांकः संकीर्ण-२०२५/प्र.क्र.१३८/एसडी-६, दिनांक १६ ऑक्टोबर, २०२५

संदर्भ क्र.१ वरील शासन निर्णयान्वये (संदर्भ : १. शासन निर्णय, क्रमांकः मुमंअ २०२३/प्र.क्र.११४/एसडी-६, दिनांक ३० नोव्हेंबर, २०२३ शासन निर्णय वाचा या ओळीला स्पर्श करून ) सन २०२३-२४ मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अनोखे स्पर्धात्मक अभियान राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरीता दि.०१.०१.२०२४ ते दि.१५.०२.२०२४ या कालावधीत राबविण्यात आले. या अभियानास विद्यार्थी व शिक्षकांबरोबरच माजी विद्यार्थी, पालक व शिक्षणप्रेमी नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. जवळपास ९५% शाळांमधील सुमारे २ कोटी विद्यार्थी या अभियानांतर्गत विविध उपक्रमात सहभागी झाले होते. त्यामुळे हे अभियान मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरले. या अभियानातील काही उपक्रमांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये देखील झाली आहे.

संदर्भ : २. शासन निर्णय, क्रमांकः मुमंअ २०२४/प्र.क्र.५२/एससी-६, दिनांक २६ जुलै, २०२४ शासन निर्णय वाचा या ओळीला स्पर्श करून

२/-तसेच संदर्भाधीन शासन निर्णय क्रमांक ०२ अन्वये सन २०२४-२५ (टप्पा-२)मध्ये सदर अभियान राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरीता दि.२९.०७.२०२४ ते दि.१५.०९.२०२४ या कालावधीत राबविण्यात आले. या अभियानात जवळपास ९७,६२८ शाळांनी या अभियानांतर्गत विविध उपक्रमात सहभागी झाले होते. त्यामुळे हे अभियान मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरले.

संदर्भ : ३. शासन निर्णय, क्रमांकः संकीर्ण-२०२५/प्र.क्र.१३८/एसडी-६, दिनांक १६ ऑक्टोबर, २०२५ शासन निर्णय वाचा या ओळीला स्पर्श करून

३/-संदर्भ क्र.३ वरील शासन निणर्यान्वये शासनाने सन २०२५-२६ मध्ये देखील “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा-टप्पा ३” हे स्पर्धात्मक अभियान काही नवनवीन उपक्रमांसह राबविण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

१. दि.२४ ऑक्टोबर, २०२५ ते दि.०२ नोव्हेंबर, २०२५ हा कालावधी अभियानाच्या पूर्व तयारीसाठी असेल. या कालावधीत अभियानाची माहिती सर्व शाळांमध्ये पोहोचेल याची सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी दक्षता घ्यावी.

२. “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा-३” या अभियानाचा कालावधी दि. ३ नोव्हेंबर २०२५ ते दि.३१ डिसेंबर २०२५ या दरम्यान निश्चित करण्यात आला आहे.

३. शाळा मूल्यांकनासाठी अ) पायाभूत सुविधा ३८गुण ब) शासन ध्येयधोरण अंमलबजावणी १०१गुण का शैक्षणिक संपादणूक ६१ गुण यानुसार एकूण २०० गुणांसाठी मूल्यांकन करण्यात येईल.

४. वरील संपूर्ण अभियान कार्यकाळात समिती बैठका आयोजन, शासन निर्णयाची अंमलबजावणी, शासनाच्या वेळोवेळी येणा-या सूचनांची अंमलबजावणी समिती अध्यक्षांच्या नेतृत्वात पूर्ण करणे निर्णयाची सर्व कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याची जबाबदारी सदस्य सचिव समिती यांची राहील, नजिकच्या नियंत्रण अधिका-यांनी अभियानाच्या यशस्वीते करीता सर्वतोपरी प्रयत्न करणे अपेक्षित आहे.

५. अभियानाकरीता मंजूर करण्यात आलेला निधी कोषागारातून आहरित करणे, सर्व क्षेत्रिय कार्यालयांना आवश्यकतेनुसार आयुक्त यांचे मान्यतेने वितरित करणे, निधीचा विनियोग योग्य पध्दतीने होत आहे याची शहानिशा करणे शासनाकडून आवश्यकत्या निधी करिता पाठपुरावा करणे या सर्वबाबीसाठी लेखाधिकारी, प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे यांनी संचालक (प्राथमिक) यांच्या सनियंत्रणाखाली सदर कामकाज विहित मुदतीत पूर्ण करावे.

६. अभियानाची राज्यस्तरावरील व्यापक प्रचार-प्रसिध्दी सर्व घटकांपर्यंत करण्याबाबतची जबाबदारी संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे यांच्याकडे देण्यात येत आहे.

७. तालुका/जिल्हा/मनपा/विभागस्तरावर राज्यस्तरावरील कार्यालयांमध्ये अभियान कक्षाची निर्मिती करण्यात यावी, अनुक्रमे सदर जबाबदारी गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), प्रशासन अधिकारी (मनपा), विभागीय शिक्षाण उपसंचालक व राज्यस्तरावर सहसंचालक (अंदाज व नियोजन) यांची राहील.

८. सरल प्रणाली मधील शाळा पोर्टलवर शाळांना माहिती भरणेसाठी तसेच शाळेचे मूल्यांकनाकरीता व्यवस्था करण्यात येत आहे. प्रत्येक शाळा स्तरावर शाळा लॉगिनमध्ये या अभियानाच्या मूल्यांकनाची प्रश्नावली समोर पीडीएफ/छायाचित्र व त्यासमोर शब्दांत विवरण नमूद करण्याची सुविधा देण्यात येत आहे. तसेच त्याचे यूजरमॅन्युअल (User Manual) तयार करुन ते संकेतस्थाळावर यथावकाश उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या अभियानामध्ये शाळा स्तरावरुन माहिती अंतिम करणे तसेच शाळा मूल्यांकन याबाबतचे सविस्तर वेळापत्रक स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.

तरी, वरील प्रमाणे सोपविण्यात आलेल्या जबाबदारीनुसार व कार्यपध्दतीनुसार कामकाजाचे अचूक नियोजन करुन सदर टप्पा-३ अभियान हे यशस्वीरित्या पार पाडले जाईल याची सर्वांनी वैयक्तिकरित्या दक्षता घ्यावी.

परिपत्रक पीडीएफ प्रत लिंक

आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे

This page has been viewed 1182 times.

Leave a Comment

error: Content is protected !!