Mukhyamantri Mazhi Ladki Bahin Yojana eKYC LINK
Mukhyamantri Mazhi Ladki Bahin Yojana eKYC LINK
Mukhyamantri Mazhi Ladki Bahin Yojana eKYC Process
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana ekyc on mobile
How to do eKYC in Mukhymantri Ladki Bhin Yojna
How to do eKYC in Chief Minister-My Beloved Sister Scheme
Regarding verification and authentication of eligible beneficiary women under the scheme “Chief Minister-My Beloved Sister”. (e-KYC Aadhaar Authentication)
क्र.मबाविआ/मवि/मु.मा.ला. बहीण / E-kyc/ पडताळणी/२०२५-२०२६/का-६/०८१३
दि. २०११/२०१५
विषय-: “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करणेबाबत. (e-KYC Aadhaar Authentication)
संदर्भ :
१. महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्र. मबावि-२०२४/प्र.क्र.१६/कार्या-२. दिनांक २८.०६.२०२४
२. महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्र. मबाधि-२०२५/प्र.क्र.१६७/कार्या-२, दिनांक १८.०१.२०२५
- महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्र. मबाधि-२०२५/प्र.क्र.१६७/कार्या-२, दिनांक १८. ११.२०२५
उपरोक्त् संदर्भिय विषयाच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेंतर्गत ज्या पात्र लाभार्थ्यांकडे त्यांचे पती किंवा वडीलांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांचे आधार क्रमांकावर OTP प्राप्त होण्यास अडचण निर्माण झालेली आहे. अशा पात्र लाभार्थ्यांनी स्वःताचे e-KYC केल्यानंतर त्यांचे पति अथवा वडिल यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र / घटस्फोट प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा मा. न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांचेकडे दिनांक 31.12.2025 पर्यंत जमा करणेबाबत शासनाचे निर्देश आहेत.
या अनुषंगाने आपले अधिनस्त् (CDPO) ग्रामीण / नागरी यांचे मार्फत अंगणवाडी सेविकांकडे प्राप्त झालेले e-KYC अर्ज जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचे कडे दाखल करण्यात यावेत. e-KYC करण्यापासून सूट देण्यास शिफारस देण्याबाबतचा अंगणवाडी सेविका साठीचा नमूना सोबत जोडून पाठविण्यात येत आहे. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी आयुक्त्, महिला व बाल विकास आयुक्तालय, पुणे यांचेकडे स्वयंस्पष्ट शिफारशी सह विहित कालमार्यदेत e-KYC चे अर्ज सादर करावेत.
आयुक्त
महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य, पुणे.
वाचा या ओळीला स्पर्श करून
प्रति,
- जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, (सर्व)
- जिल्हा कार्यक्रम अधिकारी, (जिल्हा परिषद) (सर्व)


ALSO READ –
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसी प्रक्रिया सुरू असताना, अलिकडे काही जिल्ह्यांमध्ये उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्ती, महिलांनी उपस्थित केलेल्या समस्या लक्षात घेता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार ई-केवायसी करण्याची मुदत वाढवून ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेक कुटुंबांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पती किंवा वडिलांचे निधन झाल्यामुळे काही महिलांना संबंधित आधार क्रमांकावर ओटीपी प्राप्त होणे अशक्य झाले आहे. अशा परिस्थितीत अपूर्ण ई-केवायसी प्रक्रियेस मुदतवाढ देणे आवश्यक आहे.
तसेच, ज्या पात्र महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीत किंवा ज्या महिला घटस्फोटित आहेत अशांनी स्वतःची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून संबंधित मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचा आदेश यांची सत्यप्रत सादर करणे आवश्यक राहील.
या अनुषंगाने पात्र महिलांना न्याय मिळावा आणि कोणतीही पात्र महिला तांत्रिक किंवा अपरिहार्य कारणांमुळे योजनेपासून वंचित राहू नये याकरिता ई-केवायसी प्रक्रियेस ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच विस्तारित कालावधीत लाभार्थींनी आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहनही महिला व बाल विकास मंत्री तटकरे यांनी केले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना ई-केवायसी कशी करावी
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या e-KYC साठी
या संकेतस्थळाला भेट द्यावी.
मुखपृष्ठावर असलेल्या e-KYC बॅनरवर क्लिक केल्यावर e KYC फॉर्म उघडेल.
या फॉर्ममध्ये लाभार्थ्याने आपला आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतांक (Captcha Code) नमूद करून, आधार प्रमाणीकरणासाठी संमती देत Send OTP या बटणावर क्लिक करावे. त्यानंतर लाभार्थ्याच्या आधार-लिंक मोबाईल क्रमांकावर OTP येईल. हा OTP टाकून Submit बटणावर क्लिक करावे.
यानंतर प्रणाली तपासेल की लाभार्थ्याची KYC आधीच पूर्ण झाली आहे की नाही.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना अधिक जाणून घ्या या ओळीला स्पर्श करून
- जर आधीच पूर्ण झाली असेल, तर “e-KYC आधीच पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.
जर पूर्ण झाली नसेल, तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत आहे की नाही हे तपासले जाईल.
जर आधार क्रमांक पात्र यादीत असेल, तर पुढील टप्प्याला जाता येईल.
यानंतर लाभार्थ्याने पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक तसेच पडताळणी संकेतांक (Captcha Code) नमूद करावा. संमती दर्शवून Send OTP वर क्लिक करावे. OTP संबंधित मोबाईलवर प्राप्त झाल्यावर तो टाकून Submit बटणावर क्लिक करावा.
त्यानंतर लाभार्थ्याला आपला जात प्रवर्ग निवडावा लागेल आणि खालील बाबी प्रमाणित (Declaration) कराव्या लागतील:
- माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून शासकीय विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत.
- माझ्या कुटुंबातील केवळ १ विवाहित आणि १ अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे.
वरील बाबींची नोंद करून चेक बॉक्सवर क्लिक करावे व Submit बटण दाबावे.
शेवटी, “Success – तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे” असा संदेश
