Minimum Age Of a Child For School Admission Fixed
Minimum Age Of Child For School Admission Fixed
Minimum Age Of a Child For School Admission Fixed
Minimum Age Of a Child For School Admission Fixed
शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत.
दिनांक : १८ सप्टेंबर, २०२०
संदर्भ:-
१) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. पीआरई-२०१०/(११५)/प्राशि-१, दिनांक ११ जून, २०१०
२) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.: आरटीई-९८१४/प्र.क्र.१६०/एस.डी-१, दिनांक २१ जानेवारी, २०१५, दिनांक २३ जानेवारी, २०१५, दिनांक २५ जानेवारी, २०१७
३) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र.: आरटीई-२०१९/प्र.क्र.११९/एस.डी.-१, दि.२५ जुलै, २०१९
४) शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र क्र.प्राशिसं/आरटीई-५२०/बालकाचे वय/२०२०/९०९, दि.१८ फेब्रुवारी, २०२०
प्रस्तावना:-
शासनाने दि.११ जून, २०१० च्या शासन निर्णयान्वये शाळा प्रवेशाबाबतची कार्यपध्दती निश्चित केलेली आहे. सदर शासन निर्णयात प्रवेशाबाबतच्या इतर तरतूदीबरोबरच शाळा प्रवेशासाठी बालकाचे वयाबाबतची तरतूद आहे. सदर तरतूदीनुसार इयत्ता १ ली मधील प्रवेशासाठीची वयोमर्यादा ६ वर्षे निश्चित केलेली होती. तथापि, ५ वर्षे पूर्ण झालेले बालक इयत्ता १ ली मधील प्रवेशासाठी पात्र राहतील, असे आदेशात नमूद केले होते. राज्यात राज्य मंडळाचा अभ्यासक्रम राबविणाऱ्या शाळा, सी.बी.एस.ई., आय.सी.एस.ई., आय.बी. अशा विविध प्रकारच्या शाळा आहेत. सदर सर्व प्रकारच्या शाळांमध्ये प्रवेशाच्या वेळेस इयत्ता १ ली साठी वेगवेगळी वयोमर्यादा वेगवेगळ्या दिनांकास ग्राह्य धरुन प्रवेश दिले जात होते. तसेच पूर्व प्राथमिकसाठी वर्गातील प्रवेशासाठी निश्चित अशी वयाची अट अस्तित्वात नव्हती. या बाबी विचारात घेऊन यामध्ये एकवाक्यता आणण्यासाठी उपाययोजना सुचविण्यासाठी शिक्षण संचालक (प्राथमिक) यांच्या अध्यक्षतेखाली एकसदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली होती. सदर समितीने दिलेल्या शिफारशीनुसार शासन निर्णय दिनांक २१/०१/२०१५ व दि.२३/०१/२०१५ च्या शुध्दीपत्रकान्वये ३१ जुलै हा मानिव दिनांक गृहीत धरुन बालकाचे किमान वय पूर्व प्राथमिक (इयत्ता १ ली पूर्वीचा ३ रा वर्ग) (प्ले-ग्रुप/नर्सरीसाठी) साठी ३ वर्षे पूर्ण व इयत्ता १ ली साठी ६ वर्षे पूर्ण असे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. शासन निर्णय दि.२५/०१/२०१७ अन्वये
शाळा प्रवेशासाठी ३० सप्टेंबर हा मानिव दिनांक घोषित करण्यात आलेला आहे. तसेच शासन निर्णय दि.२५/०७/२०१९ अन्वये शाळा प्रवेशासाठी बालकांच्या किमान वयामध्ये जास्तीत जास्त १५ दिवसांची शिथिलता देण्याचे अधिकार मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत.
शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दि. १८/०२/२०२० रोजीच्या पत्रान्वये बालकांच्या किमान वयामध्ये शिथिलता आणण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता. त्यास अनुसरुन शाळा प्रवेशासाठी बालकांच्या किमान वयामध्ये शिथिलता देण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती. याबाबतचा शासन निर्णय खालीलप्रमाणे आहे.
शासन निर्णय:-
सदर शासन निर्णयान्वये पूर्व प्राथमिक व इयत्ता १ ली मधील शाळा प्रवेशासाठीचे किमान वय खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे:-
अ.क्र. प्रवेशाचा वर्ग किमान वय वर्ष वयाबाबत मानिव दिनांक अंमलबजावणी वर्ष
१ प्ले ग्रुप / नर्सरी (इ.१ ली पूर्वीचा ३ रा वर्ग) ३+ ३१ डिसेंबर २०२१-२२ पासून
२ इयत्ता १ ली ६+ ३१ डिसेंबर २०२१-२२ पासून
२. सदर आदेश राज्यातील सर्व प्रकारच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना लागू राहतील.
३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२००९१८१६११११९५२१ असा आहे. सदर शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
शासन निर्णय पीडीएफमध्ये हवा असल्यास या ओळीला स्पर्श करा
उप सचिव, महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शासन निर्णय क्रमांक: आरटीई-२०१८/प्र.क्र.१८०/एस.डी-१
मंत्रालय, मुंबई
जा. क्र. आरटीई २५%/२०२५/८09/1343
दि. ०७-०३-२०२५ 10 MAR 2025
विषय: पूर्व प्राथमिक व इयत्ता पहिली मधील शाळा प्रवेशाचे किमान वय निश्चित करणेबाबत.
संदर्भ : १) माहिती अधिकार नागरी समूह यांचा दि. ०३-०२-२०२५ चा अर्ज.
२) शासन निर्णय दि. १८-०९-२०२०.
उपरोक्त विषयी आपणास कळविण्यात येते की, शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय शासन निर्णय दि. १८ सप्टेंबर, २०२० नुसार प्ले ग्रुप, नर्सरी, इ. १ली पूर्वीचा तिसरा वर्ग किमान वय ३+ वया बाबत मानीव दिनांक डिसेंबर व इयत्ता पहिलीसाठी ६+ वयाबाबत मानीय दिनांक ३१ डिसेंबर हा निश्चित करण्याचे निर्देश आहेत परंतु माहिती अधिकार नागरी समूह या संस्थेने दिनांक ०३-०२-२०२५ नुसार उपरोक्त शासन निर्णयाचे पुणे जिल्हयातील शाळा पालन करत नसल्याचे तक्रार दाखल केल्या आहेत.
तरी सदर तक्रारीच्या अनुषंगाने व शासन निर्णयातील तरतुदीप्रमाणे शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय याची अंमलबजावणी करणे बाबत शाळांना सक्त ताकीद देण्यात यावी शाळा शासन निर्णयाची अंमलबजावणी करत नसतील तर शाळांवर बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायदा, २००९ मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात यावी,
सोबत माहिती अधिकार नागरिक समूह यांचा तक्रार अर्ज.
(शरद गोसावी)
शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे-०१,
प्राथमिक शिक्षण संचालनालय
प्रति,
१. विभागीय शिक्षण उपसंचालक, पुणे.
२. प्रशासन अधिकारी, पुणे मनपा.
३. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद, पुणे.
४. प्रशासन अधिकारी, पिंपरी चिंचवड मनपा,