Mention Of Religion On Students School Leaving Certificate
Mention Of Religion On Students School Leaving Certificate
Regarding the mention of religion before the tribe on the school leaving certificate of a tribal student
विषय :- आदिवासी विद्यार्थ्याच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जमातीपुढे होणाऱ्या धर्माच्या उल्लेखाबाबत…
संदर्भ : ०१) शासन परिपत्रक क्र. एसटीसी-१०९९/प्र.क्र.३१/का-१० दि.१२/०१/२०००
०२) पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी, १८ शिक्षण विभाग प्राथमिक जा.क्र. शिक्षण /आस्था / १ । कावि/२५८/२०२० दिनांक : 29/०९/२०२० परिपत्रक
महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग यांचेकडील शासन परिपत्रक क्र. एसटीसी-१०९९/प्र.क्र.३१/का-१० दिनांक १२ जानेवारी २००० च्या परिपत्रकानुसार अनुसुचीत जमातीच्या व्यक्तींना जातीचा दाखला देताना हिंदू-भिल, हिंद ठाकूर, हिंदू-कोकणी, हिंदू-वारली, हिंदू-कातकरी, हिंदू-कोळी महादेव असा उल्लेख करुन दाखला दिला जातो या नोंदी शाळा सोडल्याच्या दाखल्या मध्ये सर्वसाधारणपणे आढळून येतात. या नोंदीचाच उल्लेख जातीच्या दाखल्यात करण्यात येत असतो. अशा प्रकारे नोंदी करुन जो जातीचा दाखला दिला जातो तो दाखला वैद्य समजला जात नाही.
सबब सदर परिपत्रकान्वये सर्व संबधित मुख्याध्यापकांना निर्देशीत करण्यात येते की जातीचा दाखला देताना शासन परिपत्रक क्र. एसटीसी-१०९९/प्र.क्र.३१/का-१० दि.१२ जानेवारी २००० नुसार योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.
प्रशासन अधिकारी शिक्षण विभाग प्राथमिक पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी
