सामान्य प्रशासन विभागातील दरवर्षी सेवानिवृत्त स्वेच्छा सेवानिवृत्त होणा-या अधिकारी कर्मचारी यांना स्मृतिचिन्ह देण्याबाबत Mementos To Retired Employees

Mementos To Retired Employees

Mementos To Retired Employees

Regarding giving mementos to retired/voluntarily retired officers/employees

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Join Now

सामान्य प्रशासन विभागातील दरवर्षी सेवानिवृत्त / स्वेच्छा सेवानिवृत्त होणा-या अधिकारी/ कर्मचारी यांना स्मृतिचिन्ह देण्याबाबत…

दिनांक: १४ जानेवारी, २०२६

प्रस्तावना :-
सामान्य प्रशासन विभागामधून दरवर्षी सेवानिवृत्त / स्वेच्छा सेवानिवृत्त होणा-या अधिकारी/कर्मचारी यांना शासन सेवेतील त्यांच्या योगदानाबद्दल एक आठवण म्हणून स्मृतिचिन्ह देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुषंगाने शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे:-

    शासन निर्णय :-

सामान्य प्रशासन विभागामधून दरवर्षी सेवानिवृत्त / स्वेच्छा सेवानिवृत्त होणा-या अधिकारी/कर्मचारी यांना शासन सेवेतील त्यांच्या योगदानाबद्दल एक आठवण म्हणून स्मृतिचिन्ह प्रदान करण्याकरीता मान्यता देण्यात येत असून, त्यानुसार दरवर्षी विभागाच्या आवश्यकतेनुसार स्मृतिचिन्ह खरेदी करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

०२. सदर स्मृतिचिन्ह खरेदी करण्याकरीता होणा-या खर्चाबाबत वित्त विभाग, शासन निर्णय दि.१७.०४.२०१५, वित्तीय अधिकार नियम पुस्तिका, १९७८ मधील परिच्छेद क्र. ८ नुसार वित्त विभागाच्या व्यय शाखेच्या अनौपचारीक संदर्भ क्र. ६७३/व्यय-४, दि.१०.११.२०२५ अन्वये प्राप्त मान्यतेच्या अनुषंगाने प्रस्तुत शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.

०३. सदर स्मृतिचिन्हांची खरेदी करण्याकरीता उद्योग, उर्जा व कामगार विभाग, शासन निर्णय, दि.०१.१२.२०१६ अन्वये, शासकीय विभागांनी करावयाच्या कार्यालयीन खरेदीसाठीच्या कार्यपद्धतीच्या सुधारीत नियमपुस्तिकेतील विहित कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात येईल.

०४. सदर स्मृतिचिन्हांच्या खरेदीचा खर्च “मागणी क्र.ए-०४, २०५२-सचिवालय सर्वसाधारण सेवा, (०९०) सचिवालय, (००) (०१) सामान्य प्रशासन विभाग, (१३) कार्यालयीन खर्च, (२०५२ ००२५)” या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा व मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.

०५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला असून, त्याचा संकेताक २०२६०११४१७३८०५५६०७ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

शासन निर्णय पीडीएफ प्रत लिंक

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक :- संकीर्ण-११२५/प्र.क्र.४५/गृहव्य, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

सामान्य प्रशासन विभागातील दरवर्षी सेवानिवृत्त स्वेच्छा सेवानिवृत्त होणा-या अधिकारी कर्मचारी यांना स्मृतिचिन्ह देण्याबाबत Mementos To Retired Employees
सामान्य प्रशासन विभागातील दरवर्षी सेवानिवृत्त स्वेच्छा सेवानिवृत्त होणा-या अधिकारी कर्मचारी यांना स्मृतिचिन्ह देण्याबाबत Mementos To Retired Employees

Leave a Comment

error: Content is protected !!