Martyrs Day
Martyrs Day
Observance of two minutes of silence on January 30, 2025 at 11:00 AM as “Martyrs’ Day”
hutatma Divas
दिनांक ३० जानेवारी, २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून हा दिवस ” हुतात्मा दिन” म्हणून पाळण्याबाबत.
महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग
शासन परिपत्रक क्रमांक: GAD-49022/2/2025/GAD(DSEK-29)
मंत्रालय, मुंबई
दिनांक : १५ जानेवारी, २०२५.
वाचा :- केंद्र शासनाच्या गृह विभागाचे क्र.२/१०/२०२४-Public, दिनांक ०१.०१.२०२५ चे पत्र.
परिपत्रक
देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी दिनांक ३० जानेवारी रोजी दरवर्षी संपूर्ण देशभर दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून त्यांना आदरांजली वाहण्यात येते. त्यानुसार यावर्षीही गुरुवार, दिनांक ३० जानेवारी, २०२५ रोजी सकाळी ठिक ११.०० वाजता दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात यावा, गुरुवार, दिनांक ३० जानेवारी, २०२५ रोजी सकाळी ठिक ११.०० वाजता पाळण्यात यावयाच्या मौन (स्तब्धता) ची सुरुवात होण्यापूर्वी सकाळी ठिक १०.५९ पासून ११.०० वाजेपर्यन्त इशारा भोंगा वाजविण्यात येईल. सदर इशारा भोगा संपल्यानंतर सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालये/आस्थापना/शैक्षणिक संस्था/विद्यापीठे या मधील अधिकारी/कर्मचारी/ शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी तसेच नागरिक आदी सर्वांनी दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळावे, सकाळी ठिक ११.०२ मिनिटांनी मौन (स्तब्धता) संपल्यासंबंधीचा इशारा भोगा सकाळी ठिक ११.०३ मिनिटांपर्यन्त वाजविण्यात येईल.
२. जेथे भोंग्याची व्यवस्था नसेल तेथे वरीलप्रमाणे सकाळी ठिक ११.०० वाजता मौन (स्तब्धता) पाळण्याबाबत योग्य ते निदेश संबंधितांना देण्यात यावेत व हुतात्म्यांना आदरांजली गंभीरपणे व योग्य त्या आदराने मौन (स्तब्धता) पाळून देण्यात येईल याची दक्षता घेण्यात यावी.
३. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२५०११५१६३३०८९००७ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने
अवर सचिव, महाराष्ट्र शासन
प्रति,
१. मा राज्यपाल यांचे प्रधान सचिव, मलबार हिल, मुंबई
२. मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई,
३. मा. उपमुख्यमंत्री (नगरविकास व गृहनिर्माण) / (वित्त व नियोजन) यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई
४. सर्व मा. मंत्री / राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, स्वीय सहायक मंत्रालय, मुंबई.
५. मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई.
६. सर्व मा. अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव, मंत्रालय, मुंबई