Mantralaya Entry Pass On DG PRAVESH APP
Mantralaya Incoming Pass On DG PRAVESH APP
Mantralaya Pravesh Pass On DG PRAVESH APP
मंत्रालयातील प्रवेशाचा पास आता अॅपवर
Ministry Admission Pass now on DG PRAVESH APP
Government of Maharashtra Ministry Mantralaya
असा मिळेल पास…
DG PRAVESH APP डीजी प्रवेश ॲप वर नोंदणीनंतर एक क्रमांक किंवा कोड मिळणार आहे. मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ हा कोड अथवा क्रमांक स्कॅन करावा लागणार आहे. त्यानंतर ओळखपत्र दिले जाईल. एफआरएस प्रणालीद्वारे त्या व्यक्तीची ओळख तपासली जाणार आहे. त्यानंतर त्याला प्रवेश दिला जाणार आहे, अशी माहिती मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिली.
सामान्यांना ताटकळण्याची गरज राहणार नाही
Also Read –
Today’s Update Cabinet Decisions
महाराष्ट्र राज्याच्या विविध भागातून दररोज मंत्रालयात हजारो लोक येत असतात. त्यांना मंत्रालयात प्रवेशासाठी पास बंधनकारक आहे. तो मिळवण्यासाठी आणि त्यानंतर प्रवेशासाठी लोकांना दोन ते अडीच तास रांगेत ताटकळत राहावे लागते. तसेच सुरक्षा यंत्रणेवरही ताण पडतो. मात्र, नवीन वर्षात लोकांचा हा त्रास कमी होणार आहे. यासाठी शासनाकडून डीजी प्रवेश नावाचे अॅप DG PRAVESH APP तयार करण्यात येत असून, महिनाभरात ही सुविधा सुरू होणार आहे.
Mantralaya Gatepass DG PRAVESH APP Link
डीजी प्रवेश नावाचे अॅप DG PRAVESH APP या अॅपच्या माध्यमातून लोकांना घरबसल्या मंत्रालयाचा प्रवेश पास काढता येणार आहे. कॅबिनेट बैठकीच्या दिवशी मंत्रालयात येणाऱ्यांचा आकडा ५ हजारावर जातो. दुपारी दोननंतर मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी खिडकीवरून आधार कार्डच्या आधारे प्रवेश पास दिला जातो. त्यानंतर पोलिसांकडून तपासणी करून मंत्रालयातील गार्डन गेटमधून लोकांना प्रवेश दिला जातो.
Mantralaya Visitor Pass DG PRAVESH APP Registration
Also Read –
खिडकीवर पास काढण्यासाठी आणि मंत्रालयात आत जाण्यासाठी दोन्हीकडे साधारण एक ते दीड किमीपर्यंतची रांग लागलेली असते. सुरक्षा यंत्रणेवरही मोठा ताण पडत आहे. तो अॅपमुळे कमी होईल, असा अधिकाऱ्यांचा दावा आहे. दरम्यान, १ जानेवारी २०२५ पासून मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या प्रवेशासाठी एफआरएस प्रणाली (फेशियल रेकग्निशन सिस्टम) facial recognition system सुरू होत आहे. यासाठी मंत्रालयातील प्रत्येक गेटवर साधारण २९ ठिकाणरी फ्लॅप बॅरियर बसविण्यात आले आहेत.
Also Read –