Todays Update Cabinet Decisions
Todays Update Cabinet Decisions
Maharashtra Govt Mantrimandal Nirnay
महाराष्ट्र शासन राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय
महाराष्ट्र शासन मंत्रीमंडळ निर्णय
या पूर्वीचे सर्व बैठक मंत्रीमंडळ निर्णय वाचा या ओळीला स्पर्श करून
महाराष्ट्र राज्याचे मा. मंत्री आणि मा. राज्यमंत्री यांची राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री/ सह-पालकमंत्री म्हणून नियुक्ती करणेबाबत.
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांकः जिपामं-१३२४/प्र.क्र.४७/र.-व-का.-२.मुंबई.
तारीख : १८ जानेवारी २०२५.
वाचा :-
१) शासन अधिसूचना, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक एमआयएन-२०२४/प्र.क्र.२२७/राशि-१, दि. १०.१२.२०२४.
२) शासन अधिसूचना, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक संकीर्ण-२०२४/प्र.क्र.२१५/राशि-१, दि. १९.१२.२०२४.
३) शासन अधिसूचना, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक शाकानि-२०२४/प्र.क्र.८६ (१)/र.-व-का.-१, दि. २१.१२.२०२४.
शासन निर्णय
महाराष्ट्र राज्याचे मा. मंत्री आणि मा. राज्यमंत्री यांची, पुढील तक्त्यातील स्तंभ (२) मध्ये नमूद जिल्ह्यांचे पालकमंत्री/सह-पालकमंत्री म्हणून, उक्त जिल्ह्यांच्या नावांसमोर स्तंभ (३) मध्ये निर्दिष्ट केल्याप्रमाणे, याद्वारे, नियुक्ती करण्यात येत आहे:-
अ.क्र.
जिल्हा
मा. मंत्री आणि मा. राज्यमंत्री यांचे नाव
(१)(२)(३)
१. गडचिरोली
२. श्री. देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस, मा. मुख्यमंत्री
३. ठाणे श्री. एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे, मा. उप मुख्यमंत्री
४ मुंबई शहर श्री. एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे, मा. उप मुख्यमंत्री
५ पुणे श्री. अजित आशाताई अनंतराव पवार, मा. उप मुख्यमंत्री
६. बीड श्री. अजित आशाताई अनंतराव पवार, मा. उप मुख्यमंत्री
७. नागपूर
श्री. चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे
८. अमरावती
श्री. चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे
९ अहिल्यानगर श्री. राधाकृष्ण सिंधुताई एकनाथराव विखे-पाटील
९. वाशिम श्री. हसन सकिना मियालाल मुश्रीफ
पुढे संपूर्ण यादी वाचण्यासाठी या ओळीला स्पर्श करा
Maharashtra State Hon. Minister and Hon. Regarding the appointment of Ministers of State as Guardian Ministers/Co-Guardian Ministers of districts in the State
दिनांक ०७ जानेवारी २०२५
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
👉 मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त) :
शासनाच्या प्रचलित सार्वजनिक खाजगी सहभाग धोरण-२०१४ मध्ये सुधारणा करणार (सार्वजनिक बांधकाम विभाग
– १ एप्रिल २०२५ पासून राज्यात सर्व वाहनांसाठी फास्ट-टॅग अनिवार्य
महाराष्ट्र शासन कार्यनियमावलीत सुधारणा करणार (सामान्य प्रशासन विभाग)
– शासकीय कारभार अधिक पारदर्शक, गतिमान, लोकाभिमुख करण्यासाठी बदल
– मंत्रिमंडळापुढे आणावयाची प्रकरणे, मा. मुख्यमंत्री यांच्या मान्यतेसाठी सादर करायची प्रकरणे, मा. राज्यपाल यांच्या मान्यतेसाठी सादर करावयाची प्रकरणे, मंत्रिपरिषद व मंत्रिमंडळाची कार्यपद्धती इत्यादी बाबींसंदर्भात तरतुदी
गुरुवार, २ जानेवारी २०२५
मंत्रिमंडळ निर्णय
• आकारी पड जमिनी मूळ खातेदारांना परत केल्या जाणार; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील सुधारणा विधेयक
• शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतन, भत्यांसाठी मुंबई जिल्हा बँकेत खाते उघडण्यास मान्यता
व्यक्तीला आधार, तसा आता पायाभूत सुविधा प्रकल्पालासुद्धा युनिक आयडी
सर्व समाज विकास महामंडळे एका आयटी प्लॅटफॉर्मवर आणणार, ई-कॅबिनेटचेही सुतोवाच
Decision of Cabinet meeting
Todays Update Cabinet Decisions
Update Cabinet Decisions
Government of Maharashtra Today’s Update Cabinet Decisions
Maharashtra Govt Mantrimandal List
अधिसूचना
महाराष्ट्र शासन कार्यनियमावली.
क्रमांक : शाकानि-२०२४/प्र.क्र.८६ (१)/रवका-१. महाराष्ट्र शासनाच्या कार्यनियमावलीतील नियम ५ च्या उपबंधास अनुसरून, महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी मुख्यमंत्री यांच्या सल्ल्याने खाली पहिल्या स्तंभात ज्या मंत्र्यांची नावे नमूद केली आहेत, त्यांना त्या प्रत्येकाच्या नावासमोर, दुसऱ्या स्तंभात विनिर्दिष्ट विभाग किंवा विभागाचे भाग यांचा प्रभार सोपवून त्याप्रमाणे, शासनाचे कामकाज नेमून देत आहेतः
अ.क्र.
मंत्र्यांची नावे (१)
विभाग किंवा त्यांचे भाग (२)
१. श्री. देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस, मुख्यमंत्री
गृह, ऊर्जा (अपांरपारिक ऊर्जा वगळून), विधी व न्याय, सामान्य प्रशासन, माहिती व जनसंपर्क (आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना विवक्षितपणे नेमून न दिलेले विभाग किंवा विषय)
२. श्री. एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे, उपमुख्यमंत्री
नगरविकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
३. श्री. अजित आशाताई अनंतराव पवार, उपमुख्यमंत्री
वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क
४. श्री. चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे
महसूल
५. श्री. राधाकृष्ण सिंधूताई एकनाथराव विखे-पाटील
जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ)
६. श्री. हसन सकिना मियालाल मुश्रीफ
वैद्यकीय शिक्षण
७. श्री. चंद्रकांत (दादा) सरस्वती बच्चू पाटील
उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य