Maharashtra Unaided Private Professional Educational Institutions Rules 2025 महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (पूर्ण वेळ व्यावसायिक पदवीपूर्व, पदव्युत्तर पदवी, एकात्मिक किंवा द्वि-पदवी तांत्रिक पाठ्यक्रमांच्या प्रवेशाचे विनियमन) (सुधारणा) नियम, २०२५

Maharashtra Unaided Private Professional Educational Institutions Rules 2025

image 36
Maharashtra Unaided Private Professional Educational Institutions Rules 2025

Maharashtra Unaided Private Professional Educational Institutions Rules 2025

Maharashtra Unaided Private Professional Educational Institutions (Regulation of Admission to the Full Time Professional Undergraduate, Post Graduate, Integrated or Dual Degree Technical Courses) (Amendment) Rules, 2025

महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार-ब
वर्ष ११, अंक ८९]
गुरुवार, जून १९, २०२५/ज्येष्ठ २९, शके १९४७
[पृष्ठ ८, किंमत रुपये ९.००
असाधारण क्रमांक २२०
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
उच्च व तंत्र शिक्षण विभाग मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई ४०० ०३२,

दिनांक १९ जून २०२५

        अधिसूचना

महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन) अधिनियम, २०१५.

क्रमांक नियम-२०२५/प्र.क्र. ६५/तांशि- ४. महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन) अधिनियम, २०१५ (२०१५ चा महा. २८) यांच्या कलम ५ व कलम २३ तसेच कलम ३ चे पोट-कलम (३) यांद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे, महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (पूर्ण वेळ व्यावसायिक पदवीपूर्व, पदव्युत्तर पदवी, एकात्मिक किंवा द्वि-पदवी तांत्रिक पाठ्यक्रमांच्या प्रवेशाचे विनियमन) नियम, २०२४ यामध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी पुढील नियम करीत आहे-
१. या नियमांस, महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (पूर्ण वेळ व्यावसायिक पदवीपूर्व, पदव्युत्तर पदवी, एकात्मिक किंवा द्वि-पदवी तांत्रिक पाठ्यक्रमांच्या प्रवेशाचे विनियमन) (सुधारणा) नियम, २०२५ असे म्हणावे.
२. मुख्य नियमाच्या नियम ९ मधील, पोट-नियम (३) मध्ये,-
(१) ” केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेची (कॅपची) दुसरी व तिसरी फेरी आयोजित करणे.” या शीर्षकाऐवजी, पुढील शीर्षक दाखल करण्यात
येईल :-
केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेची (कॅपची) दुसरी, तिसरी व चौथी फेरी आयोजित करणे.-“;
(२) खंड (क) आणि (ख) ऐवजी, पुढील खंड दाखल करण्यात येईल :-
” (क) दुस-या, तिस-या व चौथ्या फेरीकरिता उपलब्ध असलेल्या जागा, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील. दुस-या, तिस-या व चौथ्या फेरीकरिता पात्र उमेदवारांना, ऑनलाईन पद्धतीने विकल्प नमुना भरण्यास किंवा /आणि मागील फेरीमध्ये भरलेल्या विकल्प नमुन्यामध्ये बदल करण्यास मुभा असेल. या फे-यांमध्ये वाटप करावयाच्या जागा, खालील प्रवर्गात मोडणा-या पात्र उमेदवारांना उपलब्ध करुन देण्यात येतील,-

२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जून १९, २०२५/ज्येष्ठ २९, शके १९४७
(एक) दुस-या फेरीकरिता या नियमाच्या पोट-नियम २ च्या खंड (घ) व खंड (ङ) नुसार असलेले उमेदवार आणि तिस-या व चौथ्या फेरीकरिता या नियमाच्या पोट-नियम ३ च्या खंड (ख) च्या उप-खंड (चार) व (पाच) नुसार असलेले उमेदवार :
(दोन) पूर्वीच्या कोणत्याही फेरीत कोणतीही जागा वाटप करण्यात आलेली नाही, असे उमेदवार;
(तीन) पूर्वीच्या फे-यांमध्ये सहभागी झालेले नाहीत (विकल्प नमुना भरलेला नाही) असे उमेदवार.”;
” (ख) (एक) ज्या उमेदवारांना, पहिल्या फेरीमध्ये पहिला पसंतीक्रम, दुस-या फेरीमध्ये पहिले तीन पसंतीक्रम, तिस-या फेरीमध्ये 4 पहिले सहा पसंतीक्रम या व्यतिरिक्त इतर पसंतीक्रमांकावरील जागेचे वाटप करण्यात आले आहे आणि जे प्रवेश निश्चिती केंद्रावर हजर झाले असतील किंवा ज्यांनी ऑनलाईन प्रणालीवर वाटप करण्यात आलेल्या जागेची स्वीकृती करण्यापूर्वी अपलोड केलेल्या कागदपत्रांची स्वयं-पडताळणी केलेली असेल अशा उमेदवारांनी, नंतरच्या फेरीकरिता नवीन विकल्प नमुना भरतांना, त्यांना, पूर्वीच्या फेरीमध्ये वाटप झालेला विकल्प, ते त्यांच्या पसंतीक्रमाच्या यादीत नमूद करण्याची गरज नाहीत. जर अशा उमेदवारांना, एकदा का वरच्या पसंतीक्रमांक वाटप करण्यात आला असेल तर, त्याची आधी वाटप करण्यात आलेली जागा आपोआप रद्द होईल. जर वरच्या पसंतीक्रमानुसार नवीन जागेचे वाटप झालेले नसेल तर, पूर्वीच्या फेरीमधील झालेले वाटप अबाधित राहील ;
(दोन) जर उमेदवारास, दुस-या व तिस-या फेरीमध्ये, अनुक्रमे त्याच्या पहिल्या तीन व पहिल्या सहा पसंतीक्रमानुसार जागेचे वाटप करण्यात आले असेल तर, असे वाटप प्रणालीतून आपोआप गोठविण्यात येईल आणि उमेदवार, अशा प्रकारे वाटप केलेल्या जागेचा स्वीकार करेल. असा उमेदवार, जागेचा स्वीकार केल्यानंतर, केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या (कॅप) पुढील फेरींमध्ये सहभागी होण्यास पात्र असणार नाही. असा उमेदवार, कागदपत्रांच्या पडताळणीसाठी प्रवेश निश्चिती केंद्रावर जाईल किंवा उमेदवार, ऑनलाईन प्रणालीवर अपलोड केलेल्या कागदपत्रांची स्वयं-पडताळणी करू शकेल आणि असा उमेदवार, जागा स्वीकृती शुल्क, ऑनलाईन पद्धतीने प्रदान करतील. त्यानंतर, असे उमेदवार, वाटप करण्यात आलेल्या संस्थेमध्ये हजर होतील आणि वाटप करण्यात आलेल्या जागेवर प्रवेश घेतील. जर उमेदवाराने, प्रवेश निश्चिती केंद्रावर जाऊन कागदपत्रांची पडताळणी केली नाही किंवा प्रवेश निश्चितीसाठी ऑनलाईन प्रणालीवर अपलोड केलेल्या कागदपत्रांची स्वयं-पडताळणी केली नाही तर, तो त्याला वाटप करण्यात आलेल्या जागेवरील त्याचा हक्क आपोआप गमावेल आणि ती जागा, पुढील वाटपासाठी उपलब्ध होईल. अशा प्रकारे केलेले जागा वाटप, अशा उमेदवाराकरिता अंतिम जागा वाटप असेल;
(तीन) जर उमेदवारास, अनुक्रमे, दुस-या व तिस-या फेरीमध्ये पहिल्या तीन व पहिल्या सहा पसंतीक्रमांव्यतिरिक्त इतर पसंतीक्रमांवरील जागेचे वाटप करण्यात आले असेल आणि उमेदवार, या वाटपाने संतुष्ट असेल आणि केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या (कॅप) पुढील फेरींमध्ये सहभागी होण्याची त्याची इच्छा नसेल तर, असा उमेदवार, उमेदवाराच्या लॉगीनमधून त्यास देऊ केलेली जागा स्वतः गोठवू शकेल. एकदा का उमेदवाराने वाटप केलेली जागा गोठवली की, असा उमेदवार, कागदपत्रांच्या पडताळणीसाठी प्रवेश निश्चिती केंद्रावर जाईल किंवा उमेदवार, ऑनलाईन प्रणालीवर अपलोड केलेल्या कागदपत्रांची स्वयं-पडताळणी करू शकेल आणि जागा स्वीकृती शुल्काचे प्रदान ऑनलाईन पद्धतीने करील. त्यानंतर, असा उमेदवार, वाटप करण्यात आलेल्या संस्थेमध्ये हजर होईल आणि वाटप करण्यात आलेल्या जागेवर प्रवेश घेईल. अशा उमेदवाराकरिता, अशा प्रकारे केलेले जागा वाटप, अंतिम वाटप असेल. जर अशा उमेदवाराने, जागा स्वीकृतीच्या पुष्टीसाठी प्रवेश निश्चिती केंद्रावर जाऊन कागदपत्रांची पडताळणी केली नाही किंवा ऑनलाईन प्रणालीवर अपलोड केलेल्या कागदपत्रांची स्वयं-पडताळणी केली नाही तर, त्याला वाटप करण्यात आलेल्या जागेवरील त्याचा हक्क आपोआप गमावेल आणि ती जागा पुढील वाटपासाठी उपलब्ध होईल. त्यानंतर, असा उमेदवार, केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या (कॅप) पुढील फेरींमध्ये सहभागी होण्यास पात्र असणार नाही;
(चार) ज्या उमेदवारास, दुस-या व तिस-या फेरीमध्ये उमेदवाराने दिलेल्या अनुक्रमे, पहिल्या तीन व पहिल्या सहा पसंतीक्रमाव्यतिरिक्त, इतर पसंतीक्रमांवरील जागेचे वाटप करण्यात आले असेल आणि त्याने, अशा जागेचा स्वीकार केल्याच्या पुष्टीसाठी प्रवेश निश्चिती केंद्रावर जाऊन किंवा ऑनलाईन प्रणालीवर अपलोड केलेल्या कागदपत्रांची स्वयं-पडताळणी करून जागेचा स्वीकार केला असेल तर, असा उमेदवार, अधिक चांगल्या पसंतीची जागा मिळविण्याकरिता केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या (कॅप) पुढील फे-यांमध्ये सहभागी होण्यास पात्र असेल;
(पाच) ज्या उमेदवारास, दुस-या व तिस-या फेरीमध्ये उमेदवाराने दिलेल्या अनुक्रमे, पहिल्या तीन व पहिल्या सहा पसंतीक्रमाव्यतिरिक्त, इतर पसंतीक्रमांवरील जागेचे वाटप करण्यात आले असेल आणि त्याने, अशा जागेचा स्वीकार केल्याच्या पुष्टीसाठी प्रवेश निश्चिती केंद्रावर हजर न होता किंवा ऑनलाईन प्रणालीवर जागा स्वीकृतीकरिता अपलोड केलेल्या कागदपत्रांची स्वयं-पडताळणी केली नाही तरीही, असा उमेदवार, केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या (कॅप) पुढील फे-यांमध्ये सहभागी होण्यास पात्र असेल.” ;
(३) खंड (ग) मधील, ” तिसरी प्रवेश फेरी” हा मजकूर ज्या ज्या ठिकाणी आला असेल त्या त्या ठिकाणी, त्या मजकुराऐवजी, ” चौथी प्रवेश फेरी” हा मजकूर व्याकरणीक बदलासह दाखल करण्यात येईल.
३. मुख्य नियमाच्या नियम १० मध्ये, पोट-नियम (२) मधील, खंड (एक) च्या उपखंड (घ) ऐवजी, पुढील खंड दाखल करण्यात येईल :-
” (घ) प्रथम वर्ष अभिकल्प पदवी. भारतीय तंत्रज्ञान संस्थेने (आयआयटी) आयोजित केलेल्या अभिकल्प पदवीपूर्व सामाईक प्रवेश परीक्षेच्या (सीईटी) (युसीईईडी) गुणांच्या आधारे आणि त्यानंतर जागा रिक्त राहिल्यास, डी. व्होक. अभ्यासक्रमांच्या गुणांच्या आधारे देण्यात येतील.”.
४. मुख्य नियमाच्या नियम ११ मध्ये, –
(१) केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या (कॅपच्या) पहिल्या, दुस-या आणि तिस-या फेरीद्वारे जागांचे वाटप करणे.”; या शिर्षकाऐवजी, पुढील
शिर्षक दाखल करण्यात येईल :-
” केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या (कॅपच्या) पहिल्या, दुस-या, तिस-या व चौथ्या फेरीद्वारे जागांचे वाटप करणे.” ;
(२) पोट-नियम (१) मधील, ” केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या सर्व (पहिल्या, दुस-या व तिस-या) फे-यांमध्ये ” या मजकुराऐवजी, ” केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या, दुस-या, तिस-या व चौथ्या फे-यांमध्ये” हा मजकूर दाखल करण्यात येईल;
(३) पोट-नियम (३) मधील, ” केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या दुस-या फेरीमध्ये” या शिर्षकाऐवजी, पुढील शिर्षक दाखल करण्यात
येईल :-
” केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या (कॅपच्या) दुस-या व तिस-या फेरीमध्ये “
(४) पोट-नियम (४) मधील, ” केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या तिस-या फेरीमध्ये ” या शिर्षकाऐवजी, पुढील शिर्षक दाखल करण्यात
येईल :-
” केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या (कॅपच्या) चौथ्या फेरीमध्ये “;
(५) पोट-नियम (६) मधील, ” केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या, दुस-या व तिस-या फेरीमधील” या मजकुराऐवजी, ” केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या (कॅपच्या) पहिल्या, दुस-या, तिस-या व चौथ्या फेरीमधील” हा मजकूर दाखल करण्यात येईल;
५. मुख्य नियमाच्या नियम १२ मध्ये, –
(१) खंड (क) मधील, केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या, दुस-या व तिस-या फे-यांमधील” या मजकुराऐवजी, ” केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या (कॅपच्या) पहिल्या, दुस-या, तिस-या व चौथ्या फे-यांमधील” हा मजकूर दाखल करण्यात येईल.
(२) खंड (त) नंतर, पुढील खंड समाविष्ट करण्यात येईल :-
” (थ) सहयोगी/जुळ्या (ट्वीनिंग) पद्धतीने पदवीपूर्व पदवी/पदव्युत्तर पदवी (दुहेरी पदवी/एकात्मिक पदवी) अभ्यासक्रमांसाठीचे
प्रवेश.-
(एक) सहयोगी / जुळ्या (ट्वीनिंग) पद्धतीने पदवीपूर्व पदवी / पदव्युत्तर पदवी / दुहेरी पदवी/एकात्मिक पदवी अभ्यास पाठ्यक्रमांच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेशाची पात्रता, संबंधित व्यावसायिक पदवीपूर्व पदवी/पदव्युत्तर पदवी/दुहेरी पदवी/एकात्मिक पदवी अभ्यास पाठ्यक्रमांच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेश पात्रतेसारखीच असेल आणि ती, यथोचित प्राधिकरणाने वेळोवेळी विहित केलेल्या अतिरिक्त निकषांनुसार असेल.
(दोन) पाश्चिक प्रवेश व अधिसंख्य जागा परदेशी सहयोग व जुळ्या (ट्वीनिंग) अभ्यासक्रमांमध्ये वाटप करण्यास मुभा दिली जाणार नाही.
(तीन) उमेदवार, या अभ्यास पाठ्यक्रमांच्या प्रवेशासाठी सक्षम प्राधिका-याकडे अर्ज करतील.
(चार) या अभ्यास पाठ्यक्रमांचे प्रवेश, या नियमाच्या नियम १३ प्रमाणे संस्थांकडून करण्यात येतील.”.
६. मुख्य नियमाच्या नियम १३ मधील :-
(१) खंड (क) मध्ये, उपलब्ध जागेवर प्रवेश हे पारदर्शक रीतीने” या शब्दानंतर ” केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेच्या (कॅपच्या) फे-यांनंतर ” या शब्दांचा समावेश करण्यात यावा;
भाग चार व-२२०-१अ
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जून १९, २०२५/ज्येष्ठ २९, शके १९४७
(२) खंड (ग) मध्ये, ” अधिसूचीत करावीत व ” व या शब्दानंतर ” अंतिम कॅप फेरीच्या जागा वाटपाच्या दिनांकापर्यंत” या शब्दांचा समावेश करण्यात यावा;
(३) खंड (घ) मध्ये, पुढील परंतुक जादा दाखल करण्यात येईल;
” परंतु, जर उमेदवार कोणत्याही कारणास्तव संबंधित संस्थेकडे थेट अर्ज सादर करू शकत नसेल, तर उमेदवाराला सक्षम प्राधिकरणाच्या संकेतस्थळाद्वारे अंतिम कॅप फेरीच्या जागा वाटपाच्या दिनांकापर्यंत अर्ज करण्याची संधी असेल. हे अर्ज कॅप फेरी IV च्या वाटप प्रक्रियेनंतर संबंधित संस्थांना पाठवले जातील. संबंधित संस्था परस्पर गुणवत्तेच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करताना अशा अजर्जाचा विचार करेल.”
७. मुख्य नियमाच्या नियम १५ मधील, खंड (क) व (ख) ऐवजी, पुढील खंड दाखल करण्यात येईल:-
” (क) उमेदवार, प्रवेश रद्द करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करील आणि प्रवेश रद्द करण्यासाठी असलेल्या प्रणालीद्वारे निर्मित अर्जाची यथोचित स्वाक्षरित प्रत संस्थेला सादर करील. उमेदवाराने एकदा का प्रवेश रद्द करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने विनंती सादर केली की, त्याचा प्रवेश रद्द झाला असे समजण्यात येईल. उमेदवाराने प्रवेश रद्द करण्यासाठी असलेल्या प्रणालीद्वारे निर्मित अर्जाची यथोचित स्वाक्षरित प्रत संस्थेला सादर केलेली असो किंवा नसो, हे विचारात न घेता, संस्था, उमेदवाराने प्रवेश रद्द करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सादर केलेली विनंती अंतिम समजेल. अशा प्रकारे रद्द करण्यात आल्यावर, उमेदवार त्या जागेवरील हक्क गमावेल आणि अशी जागा पुढील वाटपासाठी उपलब्ध होईल. जर उमेदवाराने, सक्षम प्राधिकरणाने विनिर्दिष्ट केलेल्या पूर्ण शुल्क परताव्याच्या प्रवेश रद्द करण्याच्या अंतिम दिनांकापूर्वी किंवा त्या दिनांकास प्रवेश रद्द केला असेल तर, संस्था, प्रणालीद्वारे निर्मित अर्जाची यथोचित स्वाक्षरित प्रत संस्थेला सादर केल्याच्या दोन दिवसांच्या आत, प्रक्रिया शुल्क म्हणून रुपये एक हजार फक्त वजा करून उर्वरित पूर्ण शुल्काचा परतावा उमेदवारास करील आणि त्यास त्याची सर्व मूळ प्रमाणपत्रे परत करील.
(ख) उमेदवाराने, सक्षम प्राधिका-याने विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे पूर्ण शुल्क परताव्यासह प्रवेश रद्द करण्याच्या अंतिम दिनांकानंतर प्रवेश रद्द करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला असेल तर, तो/ती, प्रतिभूती ठेव व अनामत ठेव याव्यतिरिक्त कोणत्याही शुल्क परताव्यास हक्कदार असणार नाही. अंतिम दिनांकानंतर प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश रद्द करण्याची लिंक निष्क्रिय करण्यात येईल. गुणवत्ता यादी दिनांकानंतर (कट ऑफ) उमेदवारास संस्थेतील प्रवेश रद्द करण्यासाठी संस्थेकडे अर्ज सादर करावा लागेल;”.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

संतोष पु. खोरगडे,
शासनाचे सहसचिव.

image 38
Maharashtra Unaided Private Professional Educational Institutions Rules 2025

HIGHER AND TECHNICAL EDUCATION DEPARTMENT
NOTIFICATION
Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032, dated the 19th June 2025.


MAHARASHTRA UNAIDED PRIVATE PROFESSIONAL EDUCATIONAL INSTITUTIONS (REGULATION OF ADMISSIONS AND FEES) ACT, 2015.


No.Niyam-2025/C.R.65/TE-4.- In exercise of the powers conferred by Section 5 and Section 23 read with sub-section (3) of Section 3 of the Maharashtra Unaided Private Professional Educational Institutions (Regulation of Admissions and Fees) Act, 2015 (Mah. XXVIII of 2015), the Government of Maharashtra hereby makes the following rules to amend the Maharashtra Unaided Private Professional Educational Institutions (Regulation of Admission to the Full Time Professional Undergraduate, Post Graduate, Integrated or Dual Degree Technical Courses) Rules, 2024, namely:-

  1. These rules may be called the Maharashtra Unaided Private Professional Educational Institutions (Regulation of Admission to the Full Time Professional Undergraduate, Post Graduate, Integrated or Dual Degree Technical Courses) (Amendment) Rules, 2025.
  2. In rule 9 of the principal Rules, in sub-rule (3).-
    (1) for the heading” Conduct of CAP Rounds II and III.-” the following heading shall be substituted, namely :-
    “Conduct of CAP Rounds II, III and IV.-“;
    (2) for clauses (a) and (b), the following clauses shall be substituted, namely :-
    “(a) The seats available for Rounds II, III and IV shall be published on the website by the CET Cell. The candidates eligible for respective Rounds II, III and IV are allowed to fill in and/or edit online option form filled in by the candidate for the previous round. The seats to be allotted during these rounds shall be available to the Eligible Candidate falling under the following categories.-
    (i) candidates as per the clauses (d) and (e) of sub-rule (2) of this rule for Round-II and candidates as per the sub-clauses (iv) and (v) of clause (b) sub-rule (3) of this rule for Rounds III and IV;
    (ii) candidates who have not been allotted any seat in any of the previous rounds;
    (iii) candidates who did not participate (failure of filling option form) in previous rounds.”; “
    (b) (1) Candidates, who have been allotted seat other than first preference in Round-I, first three preferences in Round-II, first six preferences in Round-III and reported to ARC or self-scrutinised the document uploaded in online application system for confirmation of seat acceptance, whilst filling fresh option form for subsequent Round, he need not fill the preference already allotted to the candidate in the previous round. Once upward preference is allotted to such candidate, his earlier seat allotment shall stand automatically cancelled. In the event of no such upward preference is allotted, his previous allotment stands retained;
    (ii) If a candidate is allotted the seat as per his first three and six preferences, in Round-II and Round-III, respectively, such allotment shall be auto freezed and the candidate shall accept the allotment so made. After the acceptance such candidate shall not be eligible for participation in the subsequent CAP rounds. Such candidates shall then report to the ARC for verification of documents or the candidate may scrutinize the document uploaded in online application system himself and such candidate shall make payment of seat acceptance fee by online mode. Thereafter such candidates shall report to the allotted institute and seek admission to the allotted seat. If the candidate does not report to ARC or fails to carry out self scrutiny of the document uploaded in online application system for confirmation of seat acceptance, then his claim on the allotted seat shall stand forfeited automatically and the seat shall become available for fresh allotment. The allotment so made shall be the final allotment for such candidate;
    (iii) Candidate who have been allotted seat other than the first three and six preferences given by the candidate in Round-II and Round-III, respectively and if the candidate is satisfied with such allotment and do not wish to participate in further CAP rounds, such candidate may freeze the offered seat through candidate’s login. Once the candidate freezes the allotted seat, such candidate shall then report to the ARC or the candidate may scrutinize the document uploaded in online application system himself and make payment of seat acceptance fee by online mode. Thereafter, such candidate shall report to the allotted institute and seek admission on the allotted seat. For such candidate, the allotment so made shall be the final allotment. If such candidate does not report to ARC or fails to carry out self-scrutiny of the document uploaded in online application system for confirmation of seat acceptance, his claim on the allotted seat shall stand forfeited automatically and the seat shall become available for fresh allotment. Such candidate shall then be not eligible for participation in the subsequent CAP rounds;
    (iv) Candidate who have been allotted seat in other than the first three and six preferences given by the candidate in Round-II and Round-III, respectively and accepted the seat by reporting to ARC or by self-scrutinising the document uploaded in online application system for confirmation of seat acceptance, shall be eligible for participation in the subsequent rounds for betterment;(v) Candidate who have been allotted seat in other than the first three and six preferences given by the candidate in Round-II and Round-III, respectively and not accepted the seat by not reporting to ARC or fails to carry out self-scrutiny of the document uploaded in online application system for confirmation of seat acceptance shall be eligible for participation in the subsequent rounds.”;
    (3) in clause (c), for the word and letters” Round III” wherever they occurred, the word and letters” Round IV” shall be substituted.
  3. In rule 10 of the principal Rules, in sub-rule (2), in clause (i) for sub-clause (d), the following clause shall be substituted, namely :-
    “(d) First Year Design. On the basis of score of the Undergraduate Common Entrance Examination (CET) for Design (UCEED) examination conducted by the Indian Institute of Technology (IIT) and then if the seats remain vacant, on the basis of D. Voc. marks.”;
  4. In rule 11 of the principal Rules,-
    (1) for the heading” Allotment of seats by CAP Rounds I, II and III.-” the following heading shall be substituted, namely :-
    Allotment of seats by CAP Rounds I, II, III and IV.-“;
    (2) in sub-rule (1), for the letters and words” CAP Rounds I, II and III” the words and letters “CAP Rounds I, II, III and IV” shall be substituted;
    (3) in sub-rule (3), for the heading” CAP Round II”, the following heading shall be substituted, namely :-
    “CAP Rounds II and III”;
    (4) in sub-rule (4), for the heading” In CAP Round III.-” the following heading shall be substituted namely :-
    “In CAP Round IV.-” (5) in sub-rule (6), for the letters and words” CAP Round I, II and III” the letters and words ” CAP Rounds I, II, III and IV” shall be substituted.
  5. In rule 12 of the principal Rules,-
    (1) in clause (a) for the words and letters” CAP Rounds I, II and III” the words and letters ” CAP Rounds I, II, III and IV” shall be substituted;
    (2) after clause (p), following clause shall be inserted, namely :-
    (q) Admission to Under Graduate/Post Graduate Dual Degree/Integrated Courses through collaborative / twinning mode.-
    (1) Eligibility for admission to First Year of Under Graduate/Post Graduate /Dual Degree/Integrated Courses through collaborative/twinning mode shall be same as admission to first year of respective professional Under Graduate/Post Graduate Dual Degree /Integrated Courses and it is as per the additional norms, if any, prescribed from time to time by the Appropriate Authority.
    (ii) Lateral Entry and supernumerary seats shall not be allowed in Foreign Collaboration and Twinning Programme.
    (iii) Candidates shall apply for admissions to these courses to the Competent Authority.
    (iv) Admissions to these courses shall be made by the institutes, as per rule 13 of these rules.”;
  6. In rule 13 of the principal Rules,-
    (i) in clause (a), after the words “Admissions shall be made in a transparent manner the words “after the CAP Rounds” shall be inserted;
    (ii) in clause (c), after the words ” Institution shall invite applications” the words ” till the date of allotment of final CAP Round” shall be inserted;
    (iii) after clause (d), following proviso shall be added, namely :-
    ” Provided that, in case candidate is unable to submit the application directly to the concerned institution for any reason, the candidate shall have the opportunity to apply through the website of the Competent Authority till the date of allotment of final CAP Round. These applications will be forwarded to the respective institutions after the allotment process of CAP Round-IV. The concerned institution shall consider such applications while preparing the Inter-Se-Merit.”.
  7. In rule 15 of the principal Rules, for clauses (a) and (b), the following clauses shall be substituted, namely :-
    “(a) The Candidate shall apply online for cancellation and submit duly signed copy of system generated application for cancellation of admission, to the Institution. Once the candidate submits online request for cancellation, his admission shall be treated as cancelled. The Institute shall consider the online request made by candidate for cancellation as final, irrespective of whether he has submitted duly signed copy of system generated application to the Institute. Upon such cancellation, the candidate shall lose the claim on the seat and such seat shall become available for further allotment. If the candidate cancels admission on or before the last day for cancellation of seats with full fees refund as specified by the Competent Authority, the Institute shall refund the entire fees to the candidate after deduction of rupees one thousand only towards processing charges and return all his original documents submitted to the Institute within two days from submission of duly signed copy of system generated application to the Institute.
    (b) Candidate shall not be entitled to any refund of his/her fee except the Security Deposit and Caution Money Deposit if the online cancellation is effected by the candidate after the last day for cancellation of seats with full fee refund as specified by the Competent Authority. Link for online cancellation for admission shall be deactivated after cut-off date. Candidate has to apply for cancellation of admission to the institute by submitting application to the Institute after the cut-off date;”.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

SANTOSH P. KHORGADE,
Joint Secretary to Government.

Leave a Comment

error: Content is protected !!