Maharashtra Special Public Security Act 2024 महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा अधिनियम २०२४

Maharashtra Special Public Security Act 2024

image 57
Maharashtra Special Public Security Act 2024

Maharashtra Special Public Security Act 2024

Maharashtra Vishesh Jan Suraksha Adhiniyam 2024

Bill to more effectively prevent certain illegal acts by individuals and organizations

Persons And Associations Bill

Bill For Individuals And Organizations

This Bill is to provide for more effective prevention of certain unlawful acts by individuals and organizations and for matters connected therewith or incidental thereto

महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा अधिनियम, २०२४

L. A. BILL No. XXXIII OF 2024.

A BILL

TO PROVIDE FOR MORE EFFECTIVE PREVENTION OF CERTAIN UNLAWFUL ACTIVITIES OF INDIVIDUALS AND ORGANIZATIONS AND FOR MATTERS CONNECTED THEREWITH OR INCIDENTAL THERETO.

सन २०२४ चं विधानसभा विधेयक क्रमांक ३३.

व्यक्ती आणि संघटना यांच्या विवक्षित बेकायदेशीर कृत्यांना अधिक प्रभावीपणे प्रतिबंध करण्यासाठी आणि तत्संबंधित किंवा तदानुषंगिक बाबींकरिता तरतूद करण्यासाठी विधेयक.

ज्याअर्थी, व्यक्ती आणि संघटना यांच्या विवक्षित बेकायदेशीर कृत्यांना अधिक प्रभावीपणे प्रतिबंध करण्यासाठी आणि तत्संबंधित किंवा तदानुषंगिक चाबींकरिता तरतूद करण्यासाठी नवीन कायदा अधिनियमित करणे इष्ट आहे: त्याअर्थी, भारतीय गणराज्याच्या पंचाहत्तराव्या वर्षी, वाद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे:-

१. या अधिनियमास, महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा अधिनियम, २०२४, असे म्हणावे.

संक्षिप्त नाव
२ एच २४०७-१

२. या अधिनियमात, संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर,-

(क) “सल्लागार मंडळ” याचा अर्थ, कलम ५ अन्वये घटित्त केलेले सल्लागार मंडळ, असा आहे;

(ख) “शासन” याचा अर्थ, महाराष्ट्र शासन, असा आहे

(ग) “अधिसूचना” याचा अर्थ, शासकीय राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेली अधिसूचना, असा आहे आणि “अधिसूचित” या शब्दाचा अर्थ तद्नुसार लावण्यात येईल;

(घ) “संघटना” वाचा अर्थ, व्यक्तींचे कोणतेही संयोजन, निकाय किंवा गट, मग तो कोणत्याही विशिष्ट नावाने ओळखला जात असो किंवा नसो आणि मग तो कोणत्याही संबद्ध कायद्याखाली नोंदणी केलेला असो किंवा नसो आणि कोणत्याही लिखित घटनेद्वारे त्याचे नियमन केले जात असो किंवा नसो, असा आहे:

(ङ) “विहित” याचा अर्थ, या अधिनियमान्वये करण्यात आलेल्या नियमांद्वारे विहित केलेले, असा

(च) “बेकायदेशीर कृत्य” याचा अर्थ, एखाद्या व्यक्तीने किंवा संघटनेने केलेले,-

(एक) जे सार्वजनिक सुव्यवस्था, शांतता व प्रशांतता यांस धोका किवा संकट निर्माण करते
असे: किंवा

(दोन) जे सार्वजनिक सुव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करते किंवा ज्याचा हस्तक्षेप करण्याकडे कल आहे असे किया

(तीन) जे न्यायदानात किंवा विधिद्वारा स्थापित संस्थांमध्ये व कर्मचारी वर्गामध्ये हस्तक्षेप करते किंवा ज्याचा हस्तक्षेप करण्याकडे कल आहे असे किंवा

(चार) ने राज्य शासनाच्या किवा केंद्र सरकारच्या दलांसह, कोणत्याही लोकसेवकाला, असा लोकसेवक आणि अशी दले कायदेशीर अधिकारांचा वापर करीत असताना, फौजदारीपात्र बलप्रयोगाद्वारे किंवा फौजदारीपात्र बलप्रयोग दाखवून किंवा अन्यथा, दहशत निर्माण करण्यासाठी रचलेले आहे असे २० किंवा

(पाच) हिंसाचार, विध्वंसक कृतीमध्ये किंवा लोकांमध्ये भीती व धास्ती निर्माण करणा-या अन्य कृतीमध्ये गुंतलेले किंवा त्याचा प्रचार करणारे, किंवा अग्निशस्त्रे, स्फोटके किवा अन्य साधने यांचा वापर करण्यात गुंतलेले किंवा त्यास प्रोत्साहन देणारे किंवा रेल्वे, रस्ते, हवाई किंवा जल यामार्गे होणा-या दळणवळणांमध्ये व्यत्यय आणणारे असे किंवा २५

(सहा) प्रस्थापित कायद्याची व कायद्याद्वारे स्थापन केलेल्या संस्थांची अवज्ञा करण्यास प्रोत्साहन

देणारे किंवा तसे करण्याचा उपदेश देणारे असे किंवा

(सात) वर नमूद केलेली कोणतीही एक अथवा अधिक बेकायदेशीर कृत्ये करण्यासाठी पैसे किंवा वस्तू गोळा करणारे असे,

कोणतेही कृत्य मग ते कृती करून केलेले असो अथवा एकतर तोंडी किंवा लेखी शब्दांद्वारे किवा खुणा करून ३० अथवा दृश्य सादरीकरणाद्वारे किंवा अन्यथा केलेले असो, असा आहे;

(छ) “बेकायदेशीर संघटना” याचा अर्थ, जी संघटना, कोणतेही बेकायदेशीर कृत्य करण्यामध्ये गुंतलेली आहे किंवा तिच्या उद्दिष्टांनुसार कोणतेही माध्यम, साधन किवा अन्यथा वामार्फत प्रत्यक्षपणे अथवा अप्रत्यक्षपणे बेकायदेशीर कृत्य करण्यास अपप्रेरणा देते किंवा सहाय्य करते किंवा मदत करते, किंवा त्यास प्रोत्साहन देते, अशी कोणतीही संघटना, असा आहे.

image 58
Maharashtra Special Public Security Act 2024

L. A. BILL No. XXXIII OF 2024.

A BILL

to provide for more effective prevention of certain unlawful activities of individuals and organizations and for matters connected therewith or incidental thereto

WHEREAS it is expedient to enact a new law to provide for more effective prevention of certain unlawful activities of individuals and organizations and for matters connected therewith or incidental thereto; it is hereby enacted in the Seventy-fifth Year of the Republic of India, as 10 follows:

  1. This Act may be called the Maharashtra Special Public Security Act. 2024.

Η 2408-1

2

  1. In this Act, unless the context otherwise requires.-

(a) “Advisory Board means the Advisory Board constituted under

section 5:

(b) “Government” means the Government of Maharashtra:

(c) notification” means notification published in the Official s Gazette and the word “notified” shall be construed accordingly:

(d) organization” means any combination, body or group of persons, whether known by any distinctive name or not, and whether registered under any relevant law or not, and whether governed by any written constitution or not; 10

(e) “prescribed” means prescribed by rules made under this Act:

(“unlawful activity” means any action taken by an individual or organization whether by committing an act or by words either spoken or written or by sign or by visible representation or otherwise.-

(A) which constitute a danger or menace to public order, peace is and tranquility; or

(which interferes or tends to interfere with maintenance of public order; or

(iff) which interferes or tends to interfere with the administration. of law or its established institutions and personnel; or 20

(/) which is designed to overawe by criminal force or show of criminal force or otherwise to any public servant including the Forces of the State Government or the Central Government in exercise of the lawful powers of such public servant and Forces; or

(v) of indulging in or propagating, acts of violence, vandalism 26 or other acts generating fear and apprehension in the public, or Indulging in or encouraging the use of firearms, explosives or other devices, or disrupting communications by rail, road, air or water; or

(vi) of encouraging or preaching disobedience to established law and its institutions; or 30

(vi) of collecting money or goods to carry out any one or more unlawful activities mentioned above;

(g) “unlawful organization” means any organization which indulges. in or has in pursuance of its objects abets or assists or gives aid, or encourages directly or indirectly through any medium, devices or 35 otherwise, any unlawful activity.

Declaration of in organic

  1. (1) If the Government is of opinion that any organization is or has become an unlawful organization, it may, by notification in the Official Gazette, declare such an organization to be an unlawful organization.

महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा अधिनियम, २०२४
Maharashtra Special Public Security Act. 2024.

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय विधान भवन, मुंबई

    :: प्रसिध्दी पत्रक ::

सन २०२४ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३३-व्यक्ती आणि संघटना यांच्या विवक्षित बेकायदेशीर कृत्यांना अधिक प्रभावीपणे प्रतिबंध करण्यासाठी आणि तत्संबंधित किंवा तदानुषंगिक बाबींकरिता तरतूद करण्यासाठी विधेयक यावरील सूचना मागविणे

सन २०२४ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३३-

व्यक्ती आणि संघटना यांच्या विवक्षित बेकायदेशीर कृत्यांना अधिक प्रभावीपणे प्रतिबंध करण्यासाठी आणि तत्संबंधित किंवा तदानुषंगिक बाबींकरिता तरतूद करण्यासाठी हे विधेयक

श्री. चंद्रशेखर बावनकुळे, मा. महसूल मंत्री तथा समिती प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली गठित केलेल्या महाराष्ट्र विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांच्या संयुक्त समितीकडे विचारार्थ पाठविण्यात आले आहे. या विधेयकातील विषयाबाबत राज्यातील जनता, विधीमंडळाचे माजी सदस्य तसेच संबंधित विषय क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संस्था / संघटना / NGOs यांचेकडून सूचना/सुधारणा मागविण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. त्यानुसार सूचना/सुधारणा पाठवू इच्छिणाऱ्या उपरोक्त संबंधितांनी आपल्या सूचना/सुधारणा प्रत्येकी तीन प्रतींमध्ये निवेदनाच्या स्वरुपात मंगळवार, दिनांक ०१ एप्रिल, २०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत किंवा त्यापूर्वी पोहोचतील अशा बेताने श्री. जितेंद्र भोळे, सचिव (१) (कार्यभार), महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन, बॅकबे रेक्लमेशन, मुंबई-४०००३२ यांच्याकडे पाठवाव्यात किंवा

उक्त विधेयकाच्या मराठी व इंग्रजी प्रती शासकीय ग्रंथागार, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर आणि व्यवस्थापक, प्रकाशने, शासकीय मुद्रणालय, चर्नी रोड, नेताजी सुभाष मार्ग, मुंबई-४००००४ यांचेकडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच सदरहू विधेयक (मराठी / इंग्रजी) महाराष्ट्र विधानमंडळाच्या www.mls.org.in या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे.

विधान भवन, मुंबई,
दिनांक : ८ मार्च, २०२५

डी.जी.आय.पी.आर-२०२४-२५/६९६१

जितेंद्र भोळे, सचिव (१) (कार्यभार), महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय

Leave a Comment

error: Content is protected !!