Maha School GIS Mobile App Link सर्व शाळांचे जिओ टॅगिंग मोबाईल ॲप वर करणेबाबत

Maha School GIS Mobile App Link

IMG 20250430 194839
Maha School GIS Mobile App Link

Maha School GIS Mobile App Link

महाराष्ट्र शासन

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती इमारत, डॉअॅनी बेझंट रोड., पुणे

क्र. आशिका/२०२५/एमआरसेंक / इंगव्ह. १४३/1195807/2025

दि. ३०/०४/२०२५

विषय : राज्यातील सर्व शाळांचे जिओ टॅगिंग करणेबाबत… “Maha School GIS” मोबाईल अॅप

संदर्भ

: १. महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लीकेशन सेंटर (MRSAC) सोबत दि.०४.०२.२०२५ रोजीचा करारनामा

२. शासन परिपत्रक क्रमांक: ईगव्ह-२०२५/प्र.क्र.७/संगणक, दिनांक २३ एप्रिल, २०२५

विषयांकित प्रकरणी, संदर्भ क्र. (२) वरील शासन परिपत्रकाचे अवलोकन व्हावे. (सोबत प्रत)

महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लीकेशन सेंटर या संस्थेद्वारे शालेय शिक्षण विभागातील सर्व प्रकारच्या शाळांचे भौतिक ठिकाण छायाचित्रासह टंग करुन भौगोलिक तंत्रज्ञानाद्वारे (geospatial technology) सर्व माहिती एकत्रित करण्याकरीता Mobile App: “Maha School GIS” अॅप विकसित करण्यात आले आहे.

सदर मोबाईल अॅप मध्ये शाळांना त्यांचा युडायस कोड किंवा युडयस प्लस मधील संबंधीत शाळांच्या मुख्याध्यापक यांनी नोंदविलेला मोबाईल क्रमांक टाकून लॉगिन करावयाचे आहे. त्यानंतर शाळेची युडयस प्लस मध्ये भरलेली माहिती या अॅपमध्ये दिसेल. त्यानंतर शाळेचे GIS Location (Latitude & Longitude with time stamp) Capture करुन शाळेचे नावासह फोटो, शाळेची संपूर्ण इमारत, किचन शेड, मुलांचे व मुलींचे स्वच्छतागृह सुविधा, पिण्याच्या पाण्याची सुविधा असे फोटो समाविष्ट करुन संबंधीत शाळेच्या मुख्याध्यापक यांनी शाळेच्या आवारात उपस्थित राहून फोटो / माहिती अद्ययावत करावयाची आहे.

सर्व शाळा /अंगणवाड्या केंद्र (MRSAC) व्दारे जिओ टॅगिंग करून छयाचिासह मॅप करणे संदर्भात वित्तीय व प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.
दिनांक:-२७ मार्च, २०२५ चे परिपत्रक वाचा या ओळीला स्पर्श करून

या संदर्भात दिनांक १७.०४.२०२५ रोजीच्या व्हीसीव्दारे बैठकीमध्ये सर्व क्षेत्रिय कार्यालयांना अॅपच्या वापराबाबत डेमो व इतर सर्व आवश्यक त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार “Maha School GIS” मोबाईल अॅप, युजर मॅन्यूअल व व्हिडिओ लिक ही सर्व शाळांपर्यंत पोहचविण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार सर्व शाळांकडून दिनांक १९.०४.२०२५ पासून सदरची माहिती भरुन पाठविण्याबाबत क्षेत्रिय अधिका-यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. सदर बैठकीसाठी समग्र शिक्षा अभियानांतर्गत कार्यरत जिल्हा प्रोग्रामर तसेच तालुका एमआयएस कॉर्डिनेटर हे देखील उपस्थित होते. जिल्हा प्रोग्रामर व तालुका एमआयएस कॉर्डिनेटर यांच्या मदतीने सर्व शाळा मॅप होतील याची शिक्षणाधिकारी यांनी दक्षता घ्यावी.

School Mapping चा अहवाल पाहण्याची सुविधा
https://geoportal.mrsac.org.in/schoolmapping

या लिंकव्दारे Reports या टॅबवर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. या रिपोर्टमध्ये एकूण शाळा, त्यापैकी मॅप/अनमॅप शाळा यांचा जिल्हा/तालुका/शाळानिहाय सविस्तर अहवाल उपलब्ध आहे. जिल्हयातील अनमॅप शाळांच्या रिपोर्टनुसार संबंधीत शिक्षणाधिकारी यांनी दररोज आढावा घेऊन सर्व शाळांचे मॅपिंग पूर्ण करावयाचे आहे.

प्रत्येक शाळा व्यवस्थित व योग्य ठिकाणी मॅप झाली आहे या बाबतची खात्री
https://geoportal.mrsac.org.in/schoolmapping

या लिंकवर करावी. शाळेचे नोंदविलेले ठिकाणामध्ये तफावत दिसून येत असल्यास सदर शाळेची माहिती पुन्हा नव्याने मॅप करावी. त्यासाठी पूर्वी मॅप केलेली माहिती डिलीट करण्याची आवश्यकता नाही, नव्याने शाळा मॅप केल्यानंतर पूर्वीच्या माहितीवर नवीन मॅप केलेली माहिती ओव्हरराईट होते व नव्याने भरलेली माहिती मॅप होते,

राज्यातील सर्व शाळांचे Geo Tagging करण्याबाबत.
दिनांक :- २३ एप्रिल, २०२५ चे परिपत्रक / शासन निर्णय वाचा या ओळीला स्पर्श करून

विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी नियमित आढावा घेऊन विभागातील सर्व शाळांचे मंपिंग पूर्ण झालेबाबत खात्री करावी. विभागातील मॅप व अनमॅप शाळांची यादी दिलेल्या लिंक वरुन उपलब्ध करुन घेऊन आढावा घ्यावा. व त्यानुसार राज्यातील सर्व शाळांचे मॅपिंग विहित कालमर्यादेत पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी.

परिपत्रक या ओळीला स्पर्श करून पीडीएफ मध्ये प्राप्त करा

(सचिन्द्र प्रताप सिंह, भा.प्र.से.) आयुक्त, शिक्षण महाराष्ट्र राज्य, पुणे

IMG 20250430 194852
Maha School GIS Mobile App Link

प्रति,
१. शिक्षण संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय, मध्यवर्ती इमारत, पुणे
२. शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
३. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)
४. शिक्षणाधिकारी (मनपा) (सर्व)
५. शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक) जिल्हा परिषद, सर्व
६. गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती (सर्व)

IMG 20250430 194902
Maha School GIS Mobile App Link

Leave a Comment

error: Content is protected !!