LINK TO GIVE FEEDBACK ON DRAFT STATE CURRICULUM FRAMEWORK SCHOOL EDUCATION 2024 SCF SE

LINK TO GIVE FEEDBACK ON DRAFT STATE CURRICULUM FRAMEWORK SCHOOL EDUCATION 2024 SCF SE

IMG 20240522 193458

राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण)- 2024 SCF-SE मसुद्यावर प्रतिक्रिया नोंदविण्यासाठी LINK

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र

708, सदाशिव पेठ, कुमठेकर मार्ग, पुणे

प्रसिद्धी निवेदन- (२२/०५/२०२४)

इयत्ता ३री ते १२वी इयत्तांचा पाठ्यक्रम तयार करणेसाठी मार्गदर्शक, राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण)- २०२४ मसुदा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे मार्फत तयार करण्यात आला आहे. सदर मसुदा परिषदेच्या LINK या संकेतस्थळावर दिनांक. २३/०५/२०२४ पासून जनतेच्या प्रतिक्रियांसाठी खुला करण्यात आला आहे.

राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण)- २०२४ मसुद्याबाबत सर्व समाज घटक, शिक्षक, पालक, शिक्षण तज्ञ, शैक्षणिक प्रशासन यांनी आपले अभिप्राय दिनांक. ०३/०६/२०२४ पर्यंत खालील लिंक वर नोंदवावेत अथवा पोस्टाने पाठवावेत असे आवाहन करण्यात येत आहे.

अभिप्राय नोंदवत असतांना त्यामध्ये आपले नाव, मोबाइल नं. इमेल, पत्ता, कार्यालय, जिल्हा इत्यादी तपशील देण्यात यावा. तसेच अभिप्राय व सूचना सप्रमाण व सकारण नोंदविल्या जाव्यात त्यामध्ये क्षेत्र, विषय, स्तर, पृष्ठ क्रमांक, मूळ मसूद्यातील तपशील, आवश्यक बदल, बदलाचे कारण, कोणत्या मुद्यामध्ये दुरुस्ती आवश्यक वाटते याचा तपशील, सुधारित मजकूर कसा असावा, यांचा समावेश असावा.

टीप : पोस्टाने अभिप्राय पाठवणार असल्यास त्यावर SCF-SE राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण)- २०२४ बाबत अभिप्राय (अभ्यासक्रम विकसन विभागासाठी) असे ठळक अक्षरात लिहून, वरील पत्त्यावर पाठवावेत.

अभिप्राय नोंदवण्याचा कालावधी दिनांक २३/०५/२०२४ ते ०३/०६/२०२४

अभिप्राय नोंदविण्यासाठी LINK

(राहूल रेखावार, भा.प्र.से.) संचालक 2110724 राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.

1 thought on “LINK TO GIVE FEEDBACK ON DRAFT STATE CURRICULUM FRAMEWORK SCHOOL EDUCATION 2024 SCF SE”

  1. Respect ,
    I think that class 8 till 10 Science and math’s subject must in English for marathi medium school so that student can easily understand in junior college
    And syllabus must be less as per CBSE borad Kindly accept my request for students betterment

    Reply

Leave a Comment

error: Content is protected !!