Kshetrabhet Question Paper Answer
Kshetrabhet Question Paper Answer
इयत्ता – १० वी विषय : भूगोल प्रकरण ०१ ले क्षेत्रभेट प्रश्न पत्रिका आदर्श उत्तरासह
प्र.१ दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. गुण ०४
१. नळदूर्ग ………………………… सोडल्यानंतर तेथे मूग, उडीद, आणि इतर पिके दिसली.
अ) पिकधान्याची ब) गळीताची क) कडधान्याची ड) तेलबियांची
उत्तर – क) कडधान्याची
२. तरंगधर्षित मंचावरील पाण्याने वेढलेल्या किल्ल्यांना ………………. म्हणतात.
अ) नळदूर्ग ब) भुईकोट क) जलदुर्ग ड) शीतदुर्ग
उत्तर – क) जलदुर्ग
३. ……………………… रांग ही सह्याद्री पर्वताची पूर्वेकडे पसरलेली एक शाखा आहे.
अ) पालघाट ब) रामघाट क) बालाघाट ड) खंडाळा घाट
उत्तर – क) बालाघाट
४. ……………………. नदीवर उजनी धरणाचा जलाशय आहे.
उत्तर – अ) भीमा
अ) भीमा ब) कावेरी क) कृष्णा ड) गोदावरी
प्र.२ रा योग्य जोड्या जुळवा. गुण ०४
स्तंभ – अ उत्तरे स्तंभ – ब
१. पुणे शहराला पाणी पुरवठा —————– अ) तुळशीबाग
२. झऱ्यातून येणाऱ्या पाण्याचा साठा —————– ब) खडकवासला धरण
३. पुण्यातील महात्मा फुले मंडई —————– क) देवटाके
४ पुण्यातील प्रसिद्ध बाजारपेठ —————– ड) घाऊक व किरकोळ बाजारपेठ
इ) जायकवाडी धरण
उत्तरे – ब) खडकवासला धरण क) देवटाके ड) घाऊक व किरकोळ बाजारपेठ अ) तुळशीबाग
प्र.३ रा पुढील विधाने चूक की बरोबर ते सांगा. (कोणतेही चार) गुण ०४
१. शहरी भागात लोकसंख्येची घनता कमी असते.
उत्तरे – चूक
शहरी भागात लोकसंख्येची घनता जास्त असते, कारण तिथे रोजगाराच्या संधी, चांगल्या सोयीसुविधा आणि इतर आवश्यक गोष्टी उपलब्ध असतात
२. कुलाबा हा समुद्रातील किल्ला आहे.
उत्तरे – बरोबर
कुलाबा किल्ला, ज्याला अलिबाग किल्ला असेही म्हणतात, हा अरबी समुद्रात असलेला एक ऐतिहासिक किल्ला आहे.
३. प्रदेशानुसार व गरजेनुसार विविध क्षेत्रातील लोकांच्या उपजीविकेच्या साधनांत फरक पडतो.
उत्तरे – बरोबर
विविध भौगोलिक प्रदेश आणि लोकांच्या गरजांनुसार, शेती, उद्योग, सेवा यांसारख्या क्षेत्रातील उपजीविकेच्या साधनांमध्ये फरक पडतो.
४. क्षेत्रभेटीचे नियोजन आवश्यक नसते.
उत्तरे – चूक
कोणत्याही क्षेत्रभेटीसाठी योग्य नियोजन, जसे की ठिकाण निवडणे, परवानगी घेणे, आणि उद्दीष्ट ठरवणे, हे आवश्यक असते.
५. विविध क्षेत्रातील पर्जन्यातील फरक वनस्पतीवरून समजतो.
उत्तरे – बरोबर
ज्या भागात जास्त पाऊस पडतो तिथे सदाहरित जंगले आढळतात, तर कमी पावसाच्या प्रदेशात काटेरी झुडपे किंवा शुष्क वनस्पती आढळतात. अशा प्रकारे वनस्पतींच्या प्रकारावरून पर्जन्याचा अंदाज लावता येतो.
१. कृषी भेटी दरम्यान शेतकऱ्याच्या मुलाखतीसाठी प्रश्नावली तयार करा.
उत्तर :
कृषिक्षेत्र भेटीदरम्यान शेतकऱ्याच्या मुलाखतीसाठी प्रश्नावली पुढीलप्रमाणे करता येईलः
१. तुमचे नाव काय आहे?
२. तुमच्या शेतजमिनीचे क्षेत्रफळ किती आहे?
३. तुमच्या शेतात कोणत्या प्रकारची मृदा आहे?
४. या शेतातून वर्षभरात कोणती पिके घेतली जातात?
५. मृदेची सुपीकता वाढावी यासाठी तुम्ही कोणत्या उपाययोजना करता?
६. तुम्ही तुमच्या शेताचे सिंचन व्यवस्थापन कसे करता?
७. तुम्ही पीक उत्पादनांचे विपणन कसे करता?
८.तुम्ही कोणत्या विभागात शेती करता आणि तुमच्या शेताचे एकूण क्षेत्रफळ किती आहे?
९. तुमच्या शेतीमध्ये मुख्य पिके कोणती घेतली जातात?
१०पिकांसाठी कोणती पद्धत (पारंपरिक/आधुनिक) वापरता आणि सिंचनासाठी कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत?
११. शेतीसाठी कोणते खते व कीटकनाशके वापरता?
१२.शेती करताना कोणकोणती कामे करावी लागतात आणि तुम्हाला कधी सुट्टी असते का?
२. क्षेत्रभेटीदरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन कसे कराल ?
उत्तर
क्षेत्रभेटीदरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन पुढील प्रकारे करूः
१. क्षेत्रातील पडलेला कचरा संकलित करण्यासाठी मोठ्या आकाराच्या गोणी व पिशव्या बरोबर नेऊ.
२. क्षेत्रभेटीदरम्यान क्षेत्रभेटीत सामील झालेल्या व्यक्तींकडून कचरा पसरणार नाही याची खबरदारी घेऊ. त्यासाठी क्षेत्रभेटीदरम्यान वापरलेल्या कागदी पिशव्या, ताटल्या, खाद्यपदार्थाची वेष्टने, उरलेले खाद्यपदार्थ इत्यादी एकत्र जमा करू.
३. संबंधित क्षेत्रात माहिती फलक, पथनाट्ये, सूचना फलक इत्यादी साधनांद्वारे स्वच्छतेविषयी जाणीव जागृती वाढवू.
४. संबंधित क्षेत्रातील कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी संबंधित क्षेत्रातील शासकीय अधिकाऱ्यांशी शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार पत्राद्वारे/मुलाखतीद्वारे संपर्क साधू,
५.कचरा योग्य प्रकारे वेगळा करणे (उदा. ओला, सुका, काच, प्लास्टिक).
६.कचऱ्याला पॅक करण्यासाठी कचऱ्याच्या पिशव्या किंवा कंटेनर वापरणे.
७.प्लास्टिक आणि पॅकेजिंग कचरा टाळण्याचा प्रयत्न करणे.
८. कचरा योग्य ठिकाणी विल्हेवाट लावणे किंवा पुनर्वापरासाठी गोळा करणे.
३. क्षेत्रभेटीसाठी तुम्ही कोणते साहित्य घ्याल? ते सांगून समुद्रकिनारी गेल्यावर तुम्ही कोणती काळजी घ्याल ते लिहा.
उत्तर
क्षेत्रभेटीसाठी आम्ही पुढील साहित्य घेऊः
१. माहितीची नोंद करण्यासाठी नोंदवही, पेन, पेन्सिल, मोजपट्टी, कॅमेरा, दुर्बीण इत्यादी.
२. स्थानाच्या दिशा निश्चितीसाठी होकायंत्र व सखोल अभ्यासासाठी नकाशे.
३. क्षेत्रभेटीच्या हेतूनुसार माहिती संकलनासाठी नमुना प्रश्नावली.
४. क्षेत्रातील पाण्याचे, मातीचे, कचऱ्याचे, वनस्पतींचे, दगडांचे नमुने गोळा करण्यासाठी कागदी पिशवी अथवा बंद झाकणाचे डबे. याशिवाय, टोपी, पाण्याची बाटली, प्रथमोपचार पेटी इत्यादी.
समुद्रकिनारी गेल्यावर तुम्ही कोणती काळजी घ्याल
1. समुद्रकिनारी राहणाऱ्या स्थानिकांना पाण्याच्या खोलीचे चांगले ज्ञान असते, त्यामुळे पाण्यात उतरताना त्यांचा सल्ला घ्यावा.
2. समुद्रकिनारी लावलेल्या फलकांवरील सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.
3. भरती-ओहोटीच्या वेळापत्रकाची माहिती घेणे महत्त्वाचे आहे.
4. समुद्रकिनाऱ्यांवरील कठडे किंवा खडकांवर सेल्फी काढण्याचा मोह टाळावा.
5. तसेच, समुद्रात खोलवर पोहायला जाणेही टाळावे.