ITI Online Admission Portal Information Time Table Registration Link
ITI Online Admission Portal Information Time Table Registration Link
आयटीआय प्रवेश प्रक्रिया दिनांक ०३ जून २०२४ पासून, जाणून घ्या प्रवेश प्रक्रिया आणि इतर तपशील
💁♀️व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत येणाऱ्या राज्यातील शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील (आयटीआय) विविध ट्रेडसाठी येत्या ३ जूनपासून प्रवेशप्रक्रियेला सुरुवात होणार आहे. संचालनालयाकडून याबाबत सविस्तर वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.
राज्यात एकूण ४१८ शासकीय आणि ५७४ खासगी संस्थांच्या माध्यमातून आयटीआय अभ्यासक्रम राबविले जातात. यामध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षामध्ये १ लाख ४८ हजार ५६८ जागा उपलब्ध आहेत.
शासकीय आयटीआयमध्ये ८० हून अधिक ट्रेडसाठी ९२ हजार २६४ जागा तर खासगी आयटीआयमध्ये ५६ हजार २०४ इतक्या प्रवेशासाठी जागा उपलब्ध आहेत.
नाशिक विभागातील आयटीआयमध्ये सर्वाधिक ३० हजार ८१६ जागा उपलब्ध आहेत. त्याखालोखाल पुणे विभागामध्ये शासकीय आणि खासगी आयटीआयमध्ये २९ हजार प्रवेशाच्या २४८ जागा उपलब्ध आहेत. त्यानंतर नागपूर विभागात २७ हजार ४०८ आणि मुंबई, छत्रपती संभाजीनगर, अमरावती या विभागांमध्ये प्रत्येकी २० हजारांहून अधिक जागा उपलब्ध आहेत.
कृपया अधिक माहितीसाठी व प्रवेश वेळापत्रकसाठी या ओळीला स्पर्श करा
आयटीआय प्रवेश २०२४ अर्ज करा भरावा?
- आयटीआय फॉर्म भरण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट
- ला भेट द्या.
- या ठिकाणी उमेदवारांना नवीन नोंदणी बटण दिसेल, त्यावर क्लिक करावे लागेल.
- यानंतर मोबाइल नंबर, नाव, जन्मतारीख, ईमेल पत्ता इत्यादी सर्व संबंधित तपशील भरावे भरावे लागतील.
- त्यानंतर नोंदणी बटणावर क्लिक करा. एक नोंदणी क्रमांक तसेच पासवर्ड तयार करावा लागले.
- यानंतर लॉगिनवर क्लिक करा आणि वैयक्तिक, शैक्षणिक आणि पालक असे तपशील भरा.
- वरील सर्व स्टेप्स पूर्ण केल्यानंतर एक हमीपत्र तयार केले होईल, त्यावर उमेदवारांनी स्वाक्षरी करावी.
- पुढील स्टेप्समध्ये आवडीचा ट्रेड निवडा आणि पुढील बटणावर क्लिक करा.
- यानंतर उमेदवाराने त्यांच्या श्रेणीनुसार नोंदणी शुल्क भरणे आवश्यक आहे.
- नमूद केलेल्या स्टेप्स पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना शेवटी
सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.