Issuing service related documents of teachers non teaching employees

Issuing service related documents of teachers non teaching employees
Regarding obtaining service-related entitlement documents of teachers and non-teaching employees
शिक्षण संचालनालय
(माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती इमारत, डॉ. अॅनी बेझंट रोड, पुणे ४११ ००१
e-mail: doesecondary1@gmail.com
website: www.mahdoesecondary.com
जा. क्रमांकःशिसं-मावउमा/शिक्षक-शिक्षकेत्तर/टी-०१/२०२३-२४/ 354० दि. ०३/०७/२०२४
प्रति
१. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व
२. शिक्षणाधिकारी (माध्य) जि. प. सर्व
विषयः- शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे सेवेशी संबंधित हक्काचे दस्तऐवज मिळवून देण्याबाबत.
संदर्भ
‘भाजप शिक्षक आघाडी, पुर्व विदर्भ यांचे दि.१६/६/२०२४ रोजीचे पत्र. (श्री अनिल महादेवराव शिवणकर नागपूर विभागीय अध्यक्ष)
२. महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली १९८१ नियम९,११,१२
३. शिक्षण सेवक शासन निर्णय १३/१०/२०००
उपरोक्त विषयाचे श्री अनिल महादेवराव शिवणकर नागपूर विभागीय अध्यक्ष, भाजप शिक्षक आघाडी, पुर्व विदर्भ यांचे निवेदन संचालनालयास प्राप्त झाले आहे. सदर निवेदनामध्ये खाजगी व अनुदानित व अशःता अनुदानित संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचा-यांना अतिशय महत्वाचे त्यांच्या सेवेशी संबंधित असलेले दस्तऐवज संस्था/मुख्याध्यापकामार्फत देण्याबाबत सर्व विभागानां आदेश देणे बाबत विनंती केली आहे.
सबब खाजगी व अनुदानित व अशःता अनुदानित संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचा-यांना अतिशय महत्वाचे त्यांच्या सेवेशी संबंधित असलेले दस्तऐवज संस्था/मुख्याध्यापकामार्फत देण्याबाबत प्रचलित शासन निर्णय/अधिसूचना/नियम/शासन परिपत्रक व नियमानुसार कार्यवाही करावी.
(महेश पालकर) शिक्षण संचालक, (माध्यमिक व उच्च माध्यमिक) शिक्षण संचालनालय, म.रा.पुणे
प्रत-
१. मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे-१ यांना माहितीस्तव सविनय सादर श्री अनिल महादेवराव शिवणकर नागपूर विभागीय अध्यक्ष, भाजप शिक्षक आघाडी, पुर्व विदर्भ १०५ एंजल वन अपार्टमेंट प्लॉट नं.१०१ दहिपूरा उंटखाना नागपूर ४४००२४