२६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन), १ मे (महाराष्ट्र दिन) व १५ ऑगस्ट (स्वातंत्र्य दिन) या कार्यक्रमांमध्ये आणिबाणीच्या काळात बंदीवास सोसावा लागलेल्या व्यक्तींना निमंत्रित करण्याबाबत Invite persons In Republic Day Maharashtra Day Independence Day programs

Invite persons In Republic Day Maharashtra Day Independence Day programs

Invite persons In Republic Day Maharashtra Day Independence Day programs

Inviting Persons Who Were Imprisoned During Emergency To Republic Day, Maharashtra Day, Independence Day programs

Regarding inviting persons who were imprisoned during the Emergency to events on 26th January (Republic Day), 1st May (Maharashtra Day) and 15th August (Independence Day)

२६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन), १ मे (महाराष्ट्र दिन) व १५ ऑगस्ट (स्वातंत्र्य दिन) या कार्यक्रमांमध्ये आणिबाणीच्या काळात बंदीवास सोसावा लागलेल्या व्यक्तींना निमंत्रित करण्याबाबत…

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग

शासन परिपत्रक क्र. संकिर्ण-२०२५/प्र.क्र.३६५/राशि-१ मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक : २१ जानेवारी, २०२६

   शासन परिपत्रक :-

राज्यात २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन), १ मे (महाराष्ट्र दिन) व १५ ऑगस्ट (स्वातंत्र्य दिन) या राष्ट्रीय सणांचे शासकीय कार्यक्रम ध्वजारोहण व ध्वजवंदन करुन साजरे केले जातात. २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन) तसेच १ मे (महाराष्ट्र दिन) रोजी मुंबई येथील मुख्य शासकीय कार्यक्रमाच्या ठिकाणी मा. राज्यपाल महोदय यांच्या हस्ते ध्वजवंदन व १५ ऑगस्ट (स्वातंत्र्य दिन) रोजी मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते. विभागीय व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच जिल्हा उपविभागीय व तालुका मुख्यालयी अनुक्रमे संबंधित प्रांत अधिकारी व तहसीलदार ध्वजारोहण व ध्वजवंदन करतात. या कार्यक्रमांसाठी मा. लोकप्रतिनिधी व इतर मान्यवरांना निमंत्रित केले जाते. या मुख्य शासकीय समारंभाच्या आयोजनाबाबत शासन स्तरावरुन प्रतिवर्षी स्वतंत्ररित्या मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या जातात. या कार्यक्रमांमध्ये आणिबाणीच्या काळात कारावास भोगलेल्या व्यक्तींना निमंत्रित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

२. सन १९७५-७७ च्या आणिबाणीच्या कालावधीमध्ये ज्या व्यक्तींना कारावास भोगावा लागला अशा व्यक्तींचा सन्मान/गौरव करण्याकरीता राज्यातील प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन व स्वातंत्र्य दिन (जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय व ग्रामस्तरीय) या कार्यक्रमांस सन्मानपूर्वक निमंत्रित करण्यात यावे.

३. संबधित विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी आपल्या अधिकार क्षेत्रात प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन व स्वातंत्र्य दिन समारंभ साजरा करतांना वरीलप्रमाणे देण्यात आलेल्या सुचनांनुसार योग्य ती कार्यवाही करण्याबाबत संबंधितांना अवगत करावे.

४. सदर शासन परिपत्रक हे महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा सांकेतांक २०२६०१२११७०४५११४०७ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

शासन परिपत्रक पीडीएफ मध्ये प्राप्त करा या ओळीला स्पर्श करून

उप सचिव, महाराष्ट्र शासन

Invite persons In Republic Day Maharashtra Day Independence Day programs
२६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन), १ मे (महाराष्ट्र दिन) व १५ ऑगस्ट (स्वातंत्र्य दिन) या कार्यक्रमांमध्ये आणिबाणीच्या काळात बंदीवास सोसावा लागलेल्या व्यक्तींना निमंत्रित करण्याबाबत…

Leave a Comment

error: Content is protected !!