International Museum Day Quiz With Certificate आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन

International Museum Day Quiz With Certificate

image 23
International Museum Day Quiz With Certificate

International Museum Day Quiz With Certificate

International Museum Day 2025

International Museum Day Celebration

एखाद्या नवख्या शहरात किंवा देशात पाऊल टाकल्यावर आपण पहिल्यांदा जिथे जातो, ती जागा म्हणजे संग्रहालय. कारण संग्रहालय म्हणजे त्या भूमीच्या इतिहासाची, संस्कृतीची आणि ज्ञानपरंपरेची खाण असते. भूतकाळाच्या दालनातून वर्तमानात आणि भविष्याकडे घेऊन जाणारा हा प्रवास केवळ ज्ञानवर्धक नसून अनुभव समृद्ध करणारा असतो.

एखाद्या नवख्या शहरात किंवा देशात पाऊल टाकल्यावर आपण पहिल्यांदा जिथे जातो, ती जागा म्हणजे संग्रहालय. कारण संग्रहालय म्हणजे त्या भूमीच्या इतिहासाची, संस्कृतीची आणि ज्ञानपरंपरेची खाण असते. भूतकाळाच्या दालनातून वर्तमानात आणि भविष्याकडे घेऊन जाणारा हा प्रवास केवळ ज्ञानवर्धक नसून अनुभव समृद्ध करणारा असतो.

इतिहास, भूगोल, विज्ञान अशा विविध विषयांवरील माहिती इथे सहजपणे उपलब्ध होते. त्यामुळेच आज जगभरात संग्रहालये ही केवळ वस्तूंचे साठवण केंद्र नसून सांस्कृतिक देवाणघेवाणीचे, सामाजिक समन्वयाचे आणि शांततेच्या प्रचाराचे प्रभावी माध्यम बनली आहेत.

या भूमिकेच्या अधोरेखेसाठी १८ मे रोजी ‘आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन’ साजरा केला जातो. इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ म्यूझियम्स (ICOM) या संस्थेने १९७७ मध्ये या उपक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर दरवर्षी वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित हा दिवस जगभरात साजरा केला जातो.

यंदा जैवविविधतेचे रक्षण, हवामान बदल आणि सामाजिक असमानता यासारख्या जागतिक समस्यांवर लक्ष केंद्रित करत संग्रहालयांची ‘झपाट्याने बदलणाऱ्या समुदायांमध्ये संग्रहालयांचे भविष्य’ अधोरेखित केली जाणार आहे. संयुक्त राष्ट्रांच्या ‘अजेंडा २०३०’ अंतर्गत ठरवलेल्या ३ महत्त्वाच्या उद्दिष्टांवर चांगले आरोग्य, हवामान कृती आणि जमिनीवरील जीवन या संग्रहालय दिनाचा भर राहणार आहे.

भारताचा संग्रहालय परंपरेत भर घालणारे पहिले संग्रहालय कोलकात्यातील ‘भारतीय संग्रहालय’ होय. भव्य कमानदार पांढऱ्या इमारतीत वसलेले हे संग्रहालय हावडा स्टेशनपासून केवळ चार किलोमीटर अंतरावर आहे. जगातील जुन्या संग्रहालयांपैकी एक म्हणून याची ख्याती आहे.

मात्र संग्रहालये केवळ मोठ्या महानगरांपुरतीच मर्यादित नाहीत. आपले छत्रपती संभाजीनगर शहर ऐतिहासिक वारसा, प्राचीन वास्तू आणि पर्यटनाचे केंद्र आहे येथेही अनेक संग्रहालये आहेत. शालिवाहन राजवटीपासून सुरू झालेल्या इतिहासाच्या पाऊलखुणा आजही इथे जतन झालेल्या आहेत.

वेरूळ, अजिंठा, बीबी का मकबरा, पाणचक्की या पर्यटन स्थळांसोबतच ‘श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज पुरातत्त्व संग्रहालय’ हे इतिहासप्रेमींसाठी एक पर्वणी आहे. विद्यापीठातील इतिहास विभागात असलेले ‘प्राचीन वस्तुसंग्रहालय’, ‘सोनेरी महाल’ आणि खासगी स्वरूपात चालवलेले ‘पुरवार संग्रहालय’ व ‘जगताप संग्रहालय’ यामुळे संभाजीनगर खरेच एक समृद्ध संग्रहालय नगरी वाटते.

राज्यात एवढ्या विविध आणि गुणात्मक संग्रहालयांची एकत्रित उपस्थिती कदाचित दुसऱ्या कोणत्याही शहरात आढळणार नाही. त्यामुळे जर खरोखरच आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन साजरा करायचा असेल, तर आपण या संग्रहालयांना भेट देणे, आपल्या इतिहासाशी नाळ जोडणे, यासारखी गोष्ट दुसरी नाही.

संग्रहालये ही भूतकाळाची सावली नसून उज्वल भविष्याची दिशा दाखवणारी दीपमाळ आहे. ती केवळ वस्तूंची नव्हे, तर संस्कृतीची, शहाणपणाची आणि शांततेची शिदोरी जतन करणारी ठिकाणे आहेत. यावर्षीच्या संग्रहालय दिनी, चला आपल्या सभोवतालच्या संग्रहालयांमध्ये डोकावून पाहूया कदाचित भूतकाळातील एखादी साक्ष जागवेल आपल्या आतली ओळख.

📅 Date: 18th May 2025

🕙 Time: 10:00 AM – 11:00 PM (Open throughout the day)
👥 Eligibility: Open for all

🎁 Rewards: Digital certificates for winners

Online Quiz On International Museum Day 2025

Leave a Comment

error: Content is protected !!