Indian Language Festival Activities

Indian Language Festival Activities

Indian Language Festival Activities

Bharatiya Bhasha Utsav Upkram

विषय-: भारतीय भाषा उत्सवाच्या अनुषंगाने विविध उपक्रम आयोजित करणे बाबत.
संदर्भ :
१. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग भारत सरकारचे शिक्षण मंत्रालय यांचे पत्र दि. २२.११.२०२४
२. मा. संचालक यांनी प्रस्तुत विभागाची मान्य केलेली टिपणी दि.०२/१२/२०२४.


उपरोक्त संदर्भीय विषयान्वये कळविण्यात येते की, ११ डिसेंबर २०२४ रोजी आदरणीय महाकवी सुब्रमण्य भारती यांच्या जयंती निमित्त शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय भारत सरकार तर्फे दिनांक ०४ ते ११ डिसेंबर २०२४ या कालावधीत भारतीय भाषा उत्सव सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या वर्षीचा विषय आहे “भाषांच्या माध्यमातून एकता” (“Unity through Languages”/ “भाषाओं के माध्यम से एकता'”). हा उत्सव महाकवी भारती यांना श्रद्धांजली देण्यासाठी आणि आपल्या राष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत अंतर्भूत असलेल्या भाषिक विविधतेचा प्रचार आणि उत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात येत आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) २०२० भाषांचे महत्त्व (मातृभाषेवर आधारित शिक्षण आणि बहुभाषिकता) आणि आपल्या देशाच्या भाषिक वारशाचे मूल्य आणि अनेक भाषांबद्दल अभिमान आणि कौतुकाची भावना वाढविणाऱ्या शिक्षणासाठी एक समग्र दृष्टीकोन विकसित करण्यावर भर देतो. जे आपला समाज समृद्ध करतात.
NEP २०२० आणि या वर्षीच्या भारतीय भाषा उत्सवाच्या अनुषंगाने दि. ०४ ते ११ डिसेंबर २०२४ या कालावधीत विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा आणि शैक्षणिक उपक्रम शाळा, तालुका/केंद्र, जिल्हा व राज्य स्तरावर खालील उद्देशांच्या पूर्तीसाठी आयोजित करण्यात येत आहे.
आपली सांस्कृतिक ओळख जपण्यासाठी आणि नागरिकांमध्ये एकता वाढवण्यासाठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करणे.
शालेय स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये भारतीय भाषा आणि साहित्याबद्दल सखोल कृतज्ञता वाढवणे.
बहुभाषिकतेला व भारतीय भाषेतून शिक्षण आणि संशोधन यांना प्रोत्साहन देणे.
‘भाषाप्रेमींची नवीन पिढी तयार करणे व त्यांना प्रोत्साहन देणे.
उपरोक्त संदर्भानुसार एक आठवडा चालणाऱ्या या उत्सवाच्या अनुषंगाने राज्यातील सर्व शाळा, केंद्र (CRC) व तालुका (BRC) स्तरांवर “भाषांच्या माध्यमातून एकता” या विषयावर आधारित विविध उपक्रम, कार्यशाळा किंवा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे बाबत संबंधिताना आदेशित करण्यात यावे. जिल्हा स्तरावर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व शिक्षण अधिकारी कार्यालय यांनी परस्पर सहकार्याने आपल्या स्थानिक परिस्थितीचा विचार करून सोबत जोडलेल्या परिशिष्ट १ नुसार उपक्रम आयोजित करून दिनांक ०४ ते १० या कालावधीत भारतीय भाषा उत्सव साजरा करावा. शाळा, केंद्र, तालुका व जिल्हा स्तरावर भारतीय भाषा उत्सावांतर्गत आयोजित विविध उपक्रमांची माहिती अहवाल, फोटो संकलित करून SCERT, पुणे तर्फे देण्यात आलेल्या गुगल लिंक मध्ये भरावी. गुगल लिंक whatsapp गटावर शेअर करण्यात येईल. तसेच या कार्यक्रमास आपल्या स्तरावरून Facebook, whatsapp व इतर समाज मध्यमावरून प्रसिद्धी देण्यात यावी.
राज्य स्तरावर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे तर्फे दि. ११.१२.२०२४ रोजी ‘भारतीय भाषा उत्सव’ साजरा करण्यात येत आहे. या दिवशी सोबत जोडलेल्या परिशिष्ट १ नुसार ऑनलाईन youtube वर मान्यवरांचे मार्गदर्शन व शिक्षणतज्ज्ञ, नामवंत लेखक / साहित्यिक यांच्या व्याख्यानाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. youtube लिंक डायट प्राचार्य / ऑफिसर या whatsapp गटावर शेअर करण्यात येईल. आपल्या जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील सर्व अधिकारी, शिक्षक, पालक, विद्यार्थी यांना या कार्यक्रमाची youtube लिंक शेअर करून त्यांना हा कार्यक्रम youtube वर पाहण्यासाठी आपल्या स्तरावरून सूचित करावे.

(भारतीय भाषा उत्सवाच्या अनुषंगाने संकल्पना नोट व उपक्रमांची यादी परिशिष्ट १ मध्ये देण्यात आली आहे.)
सोबतः संकल्पना नोट व उपक्रमांची यादी (परिशिष्ट १)

Circular pdf Copy

संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.

परिशिष्ट – ०१
संकल्पना नोट
भारतीय भाषा उत्सव- शालेय शिक्षणासाठी भारतीय भाषा उत्सव
विषयः भाषांच्या माध्यमातून एकता
“आपली मातृभाषा आपल्या आईप्रमाणेच आपले जीवन घडवते” श्री. नरेंद्र मोदी (माननीय पंतप्रधान, मन की बात दिनांक २७ फेब्रुवारी २०२२ ची मालिका)
भारत हे विविधतेतील एकतेचे उदाहरण आहे. सामायिक भौगोलिक विस्तारामध्ये सामान्य भाषिक वैशिष्ट्यांनी बांधलेल्या असंख्य भाषांच्या सहअस्तित्वाद्वारे भारत याचे उत्तम उदाहरण देतो, ही सामायिक वैशिष्ट्ये आणि भारतीय भाषांमधील भाषिक सुसंगतता देशाच्या सांस्कृतिक समृद्धीवर भर देते आणि त्याच्या आंतरिक ऐक्याला अधोरेखित करते. ही सुसंगतता केवळ भारताच्या विविधतेवर प्रकाश टाकत नाही तर त्याच्या एकात्म अस्मितेचा पुरावा देखील आहे. भारतीय भाषांमधील सामायिक भाषिक वैशिष्ट्ये एका समान उत्पत्तीकडे निर्देश करतात, जे त्यांचे परस्परसंबंध आणि सहस्राब्दी वर्षातील अनुकूलता प्रतिबिंबित करतात. ही उत्क्रांती भारताच्या सर्वसमावेशक ओळखीमध्ये योगदान देऊन सांस्कृतिक आणि भाषिक बहुलता सुसंवादीपणे कशी वाढू शकते हे दाखवते.
हा भाषिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी आणि साजरा करण्यासाठी, भारतीय भाषेचे शिक्षणाच्या सर्व स्तरांमध्ये एकीकरण करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) २०२० मध्ये भारतीय भाषेचा समावेश अभ्यासक्रमात अनिवार्य करून, लहानपणापासूनच बहुभाषिक दृष्टिकोनाला चालना देण्यावर भर देण्यात आला आहे. शिक्षणाचे माध्यम म्हणून मातृभाषा आणि प्रादेशिक भाषांच्या वापरास प्रोत्साहन देऊन हे धोरण प्रत्येक स्तरावर भारतीय भाषेची वाढ आणि विकास सुनिश्चित करते, भाषिक विविधता आणि सांस्कृतिक समृद्धतेसाठी भारताच्या वचनबद्धतेला बळकटी देते. याव्यतिरिक्त अलीकडील संशोधन बहुभाषिकतेचे बोधात्मक फायदे देखील अधोरेखित करते, अनेक भाषा शिकण्याच्या महत्त्वास समर्थन देते.
भाषिक ऐक्य आणि सांस्कृतिक जतनाचे महत्त्व लक्षात घेऊन भारतीय भाषा उत्सव दरवर्षी ११ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. श्री. सुब्रमण्य भारती ज्यांना “महाकवी भारती” म्हणूनही ओळखले जाते ते एक आदरणीय तमिळ कवी, बहुभाषिक, लेखक, पत्रकार आणि भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वपूर्ण व्यक्ती आहेत यांच्या जयंती स्मरणार्थ हा कार्यक्रम साजरा केला जातो.
या वर्षीच्या भारतीय भाषा उत्सवाचा विषय “भाषांच्या माध्यमातून एकता” (“Unity through Languages” / “भाषाओं के माध्यम से एकता”) आहे. भारतातील वैविध्यपूर्ण भाषिक परंपरा राष्ट्रीय

भारतीय भाषा उत्सव साजरा करण्यासाठी सुचविलेल्या उपक्रमांची यादीः
स्तर सुचविलेले उपक्रम

पुढे संपूर्ण परिपत्रक वाचण्यासाठी या ओळीला स्पर्श करा

Leave a Comment

error: Content is protected !!