Increasing Financial Assistance Divyang From Rs 1500 To Rs 2500
Increasing Financial Assistance Divyang From Rs 1500 To Rs 2500
Divyang Arthasahayya Wadh
Regarding increasing the financial assistance for disabled beneficiaries from Rs. 1500/- to Rs. 2500/-.
संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेंतर्गतच्या दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य रुपये १५००/- वरुन रुपये २५००/- इतके करण्याबाबत.
महाराष्ट्र शासन
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्रमांकः विसयो-२०२५/प्रक्र. ६९/विसयो., मुंबई-४०० ०३२.
दिनांक :- १५ सप्टेंबर, २०२५.
वाचा :-
१. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्र. विसयो २०१८/ प्र.क्र.६२/विसयो, दिनांक २०.०८.२०१९,
२. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्र. विसयो-२०२०/ प्र.क्र.१००/विसयो, दिनांक ०३.०५.२०२१.
३. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्र. विसयो-२०२२/ प्र.क्र.८७/विसयो, दिनांक २२.०६.२०२३.
४. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्र. विसयो-२०२२/ प्र.क्र.१२०/विसयो, दिनांक ०५.०७.२०२३.
प्रस्तावना :-
संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रवणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेंतर्गतच्या दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्याबाबत मा. लोकप्रतिनिधी, विविध दिव्यांग संघटना व स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून शासनाकडे वारंवार मागणी व पाठपुरावा करण्यात येत आहे. यासंदर्भात सन २०२५-२६ च्या पावसाळी अधिवेशनामध्ये शासनातर्फे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य रुपये १५००/- वरुन रुपये २५००/- इतके करण्याबाबतची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुषंगाने सदरहू योजनेंतर्गत पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना देण्यात येणारे अर्थसहाय्य रुपये १५००/- वरुन रुपये २५००/- इतके करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुषंगाने दिनांक ०३/०९/२०२५ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाल्यानुसार खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे.
शासन निर्णय
संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे मासिक अर्थसहाय्य रुपये १५००/- वरुन दरमहा रुपये २५००/- करण्यास याद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे.
२. विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण सर्वसाधारण / अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी करण्यात आलेल्या मंजूर तरतूदीमधून करण्यात येईल.
३. सदर अर्थसहाय्यातील वाढ ही संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजनेतील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना लागू राहील.
४. विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी.बी.टी. पोर्टलद्वारे थेट त्यांच्या आधार संलग्न खात्यात करण्यात येईल.
५. सदरची वाढ ही माहे ऑक्टोबर, २०२५ पासून लागू राहील.
६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २०२५०९१५१५४४५७३०२२ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने सांक्षाकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,
शासन निर्णय पीडीएफ प्रत लिंक
अवर सचिव, महाराष्ट्र शासन